Daily Archives: August 24, 2019

आर्थिक डोस

देशाच्या अर्थव्यवस्थेतील मंदी दूर सारण्यासाठी मोदी सरकारने तातडीने काही पावले उचलल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या काल संध्याकाळच्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट झाले. बँकांना सत्तर हजार कोटींची मदत, आणखी पाच लाख कोटींचे साह्य, भांडवली गुंतवणुकीवरील, विदेशी गुंतवणूकदारांवरील वाडीव अधिभार हटवणे, आदींबरोबरच सध्या मंदीची सर्वाधिक झळ बसलेल्या वाहन उद्योगासाठीही त्यांनी काही सवलती जाहीर केल्या. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कधी नव्हे अशी मंदी आल्याची कबुली नीती ... Read More »

सैन्यदल प्रमुखाची घोषणा झाली, पण…

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) सध्या जगात सर्वदूर राष्ट्रीय सुरक्षा ऐरणीवर आली आहे. जागतिक स्तरावरील अस्थिर आर्थिक वातावरणात सुदृढ, सक्षम, संघटित भारताची प्रतिमा, सीडीएसच्या नवनियुक्तीमुळे अजूनच झळाळून उठेल. बदलत्या जागतिक राजकारण व सामरिक समीकरणाला तोंड देण्यासाठी आणि अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा आयामांचा सामना करण्यासाठी आम्ही सुदृढ, संघटित आणि सक्षम आहोत. आपली संरक्षणदले देशाची शान आहेत, त्यांच्या समन्वयासाठी मी एक मोठी घोषणा ... Read More »

सांताक्रु्रझ, सांत आंद्रे ९ दिवस तहानलेले

>> कालापूरची जलवाहिनी फुटल्याने भीषण संकट >> माशेल, कुंभारजुवेला अखेर पाणीपुरवठा सुरू तिसवाडी तालुक्याला पाणीपुरवठा करणारी केरये – खांडेपार येथील मुख्य जलवाहिनी फुटल्यानंतर सांताक्रुझ आणि सांत आंद्रे या मतदारसंघांना पुरवठा करणार्‍या मुख्य जलवाहिनीला कालापूर येथे पडलेले भगदाड दुरुस्त करण्यात काल यश न आल्याने या भागातील जनतेला सलग ९ दिवस भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला. दरम्यान, कुंभारजुवे, माशेल, बाणस्तारी व आसपासच्या ... Read More »

बँकांना देणार ७० हजार कोटी : सितारमण

>> भारताची अर्थव्यवस्था भक्कम असल्याचा दावा देशात सुरू असलेल्या मंदीच्या वातावरणाला तोंड देण्यासाठी सरकारने अखेर पावले उचलायला सुरूवात केली आहे. सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी तब्बल ७० हजार कोटींचे पॅकेज तसेच ‘कॅश फ्लो’ वाढवण्यासाठी ५ लाख कोटी देणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी काल केली. तसेच आरबीआयच्या रेपो दराच्या कपातीचा थेट ङ्गायदा ग्राहकांना व्हावा यासाठी पावले उचलण्यात येणार आहेत. ... Read More »

पर्वरीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

>> दोन दलालांना अटक, ४ मुलींची सुटका पर्वरी पोलिसांनी गुरुवारी रात्री सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करताना दोन दलालांना अटक केली तर तिसरा संशयित पोलिसांच्या तावडीतून सुटला. मोनू विजय पालसिंग (३२, नवी दिल्ली) व शिवकुमार भगवती प्रसाद (३०, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे असून जीवन ऊर्फ सौरभ मेहरा (नवी दिल्ली) हा फरार आहे. या कारवाईवेळी संशयितांच्या ताब्यातील ४ मुलींची पोलिसांनी सुटका ... Read More »

मिरामार समुद्रात मच्छीमारी ट्रॉलरची वाळूच्या टेकड्यांना धडक

मिरामार येथे समुद्रातील मांडवी नदीच्या तोंडावरील वाळूच्या टेकड्यांना एक मच्छीमारी बोट धडकण्याची दुर्घटना काल पहाटे घडली. सुदैवाने या दुर्घटनेत मच्छीमारी बोटीवरील ८ मच्छीमार बचावले आहेत. ओशियन स्टार ही मच्छीमारी बोट (ट्रॉलर) पहाटे ४.३० वाजता मच्छीमारीसाठी समुद्रात जात असताना मिरामार येथील वाळूच्या टेकड्यांना धडकली. यामुळे बोटीच्या लाकडी फळ्यांची हानी झाल्याने पाणी बोटीमध्ये घुसले. या दुर्घटनाग्रस्त बोटीवरील मच्छीमारांना दुसर्‍या बोटीतून सुरक्षित स्थळी ... Read More »

विशेष व्यक्ती अद्याप हक्कापासून वंचित

विशेष व्यक्तींना अपंगत्व कायदा, २०१६ खाली जे हक्क मिळायला हवे होते ते अद्याप अधिसूचित करण्यात आलेले नसल्याने ह्या विशेष व्यक्तींना आपल्या हक्कापासून अद्याप वंचित रहावे लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर आता हे हक्क अधिसूचित करण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. विशेष व्यक्तींना अपंगत्त्व कायदा, २०१६ खाली जे हक्क देण्यात आलेले आहेत ते आता अधिसूचित करण्यात येणार आहेत. Read More »

मये तळ्यावर गोव्यातील पहिले ‘बंजी जंपिंग’

>> मुख्यमंत्र्यांहस्ते मंगळवारी २७ रोजी उद्घाटन गोव्यातील पहिल्या बंजी जंपिंग स्थळ उत्तर गोव्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ मये तळे येथे सुरू करण्यात येणार आहे. येत्या २७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या साहसी पर्यटन सेवेचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती काल पर्यटन खात्यातील सूत्रांनी दिली. मयें तळे येथील बंजी जंपिंग स्थळावर तब्बल ५५ मीटर एवढ्या उंचीवरून उडी मारण्याची ... Read More »

साई प्रणिथने रचला इतिहास

प्रकाश पदुकोण यांनी १९८३ साली पदक जिंकल्यानंतर तब्बल ३६ वर्षांनी भारताच्या बी. साई प्रणिथने इतिहास रचताना विश्‍व अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताला पदक मिळवून देणारा पहिला खेळाडू होण्याचा मान मिळविला. जागतिक क्रमवारीत १९व्या स्थानावर असलेल्या प्रणिथने चौथ्या स्थानावरील इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टी याचा २४-२२, २१-१४ असा पराभव केला. तत्पूर्वी महिला एकेरीत पी.व्ही. सिंधूने तैवानच्या द्वितीय मानांकित ताय त्झू यिंग या बलाढ्य ... Read More »

पहिल्या डावात भारताच्या २९७ धावा

>> रवींद्र जडेजाचे झुंजार अर्धशतक अजिंक्य रहाणे व हनुमा विहारी यांनी पाचव्या गड्यासाठी केलेल्या ८३ धावांच्या भागीदारीनंतर रवींद्र जडेजा व इशांत शर्मा यांनी आठव्या गड्यासाठी जोडलेल्या ६० धावांच्या बळावर टीम इंडियाने वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात सर्वबाद २९७ धावा केल्या आहेत. पहिल्या दिवशी भारताने चहापानापर्यंत ४ बाद १३४ धावांपर्यंत मजल मारली होती. रहाणे ४९ व विहारी १८ धावांवर खेळत ... Read More »