Daily Archives: August 23, 2019

आता पुढे काय?

एक नव्हे, दोन नव्हे, सतत सात दिवस तिसवाडी आणि परिसरातील नागरिकांची पाण्याअभावी दाणादाण उडवलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाची फोंडा – पणजी मुख्य जलवाहिनी अखेर सातव्या दिवशी कशीबशी दुरुस्त झाली आणि कुर्टीहून प्रक्रियाकृत पाणी पणजीपर्यंत येऊन थडकले. या सात दिवसांमध्ये नागरिकांची जी काही गैरसोय झाली तिची सांगता सोय नाही! कोणी परिसरातील विहिरी धुंडाळल्या, कोणी पावसाचे पाणी छत्रीद्वारे पागोळ्यांतून गोळा केले, ... Read More »

दूध उत्पादकांसाठी गोवा डेअरीचा डोलारा सांभाळा

शंभू भाऊ बांदेकर प्रतिवर्षी सहकार सप्ताह धुमधडाक्यात साजरा केला जातो. मंत्री, अधिकारी आणि समाजकार्यकर्ते सहकार चळवळीसंबंधी सविस्तर बोलून आम जनतेची सहकाराशी नाळ जोडण्याचा प्रयत्न करतात. जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून सहकारक्षेत्र स्वच्छ करण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे आणि तमाम दूध उत्पादकांच्या उन्नतीसाठी डेअरीचा डोलारा सांभाळणे हे सरकारने गांभीर्याने घेतले पाहिजे. गोव्यात सहकारक्षेत्राशी नाव सांगणार्‍या दोन नावाजत्या संस्था ... Read More »

पूरग्रस्तांना भरपाईसाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवा

>> पश्‍चिम विभागीय परिषदेत केले मार्गदर्शन गोव्यासह महाराष्ट्र व गुजरातमध्ये पुरामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीबद्दल केंद्र सरकारला चिंता असून राज्य सरकारांनी लवकरात लवकर नुकसानीचा अंदाजित अहवाल तयार करून केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल येथे केली. पणजी येथे आयोजित पश्चिम विभागीय परिषदेची २४ वी बैठक अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल पणजीत झाली. या बैठकीत मार्गदर्शन ... Read More »

चिदंबरमना ५ दिवसांची कोठडी

आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अटक केलेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना जामीन नाकारण्यात आला असून त्यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या राउज ऍव्हेन्यू कोर्टाने हा निर्णय दिला. यावेळी कोर्टाबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, कोर्टाने चिदंबरम यांना दररोज अर्धा तास कुटुंबीय आणि वकिलांना भेटण्याची परवानगी दिली आहे. तीन तास कसून चौकशी ... Read More »

राज यांची ईडीकडून साडेआठ तास चौकशी

कोहिनूर मिल प्रकरणी ईडीने काल राज ठाकरे यांची तब्बल साडे आठ तास चौकशी केली. मात्र, चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयातून बाहेर आल्यानंतर राज यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्याचे टाळले. केवळ स्मित हास्य करून ते निघून गेले. दरम्यान, राज यांची आज पुन्हा चौकशी होणार नाही. परंतु, याप्रकरणाशी संबंधित इतरांची चौकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. काल सकाळी ११.३० वाजता राज ठाकरे कुटुंबासह ईडी कार्यालयात हजर ... Read More »

दीनदयाळ आरोग्य योजनेखाली इस्पितळांना ४३ कोटींचे वितरण

आरोग्य खात्याच्या दीनदयाळ आरोग्य सेवा योजनेखाली या वर्षी खासगी इस्पितळांना रुग्णांच्या उपचारार्थ आत्तापर्यंत ४३ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. सरकारच्यावतीने दीनदयाळ आरोग्य सेवा योजना चालविण्यात येत असल्याने सुमारे २० ते २५ कोटी रुपयांची बचत झाल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी काल दिली. गत तीन वर्षांपासून दीनदयाळ आरोग्य सेवा योजना राबविण्यात येत आहे. दोन वर्षे ही योजना विमा योजनेच्या माध्यमातून चालविण्यात ... Read More »

कालापूर येथे जलवाहिनी फुटल्याने लोकांचे हाल

>> सांताक्रुझ, कुडका, बांबोळीला अजूनही पाण्याची प्रतीक्षा >> कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे संकट राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम करणार्‍या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे कालापूर – सांताक्रुझ येथे प्रमुख जलवाहिनी फुटल्याने गेल्या आठ दिवसांपासून पाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या बांबोळी, कुडका, सांताक्रुझ आदी भागातील लोकांचे पाण्याविना अनंत हाल झाले. दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक आमदार टोनी फर्नांडिस यांनी रुद्रावतार धारण करत ठेकेदार व पाणीपुरवठा खात्याच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले. केरये ... Read More »

टीम इंडिया अडखळली

वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी चहापानासाठी पावसामुळे खेळ लवकर थांबविण्यात आला त्यावेळी टीम इंडिया ४ बाद १३४ अशी संघर्ष करत होती. वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डर याने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. मयंक अगरवाल, चेतेश्‍वर पुजारा व कर्णधार विराट कोहली यांना स्वस्तात माघारी पाठवून विंडीजने भारताची ३ बाद २५ अशी केविलवाणी स्थिती केली. राहुलने यानंतर अजिंक्य ... Read More »

कांगारूंचा १७९ धावांत खुर्दा

जोफ्रा आर्चरने ४५ धावांत घेतलेल्या सहा बळींच्या जोरावर इंग्लंडने तिसर्‍या ऍशेस कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ५२.१ षटकांत १७९ धावांत संपवला. स्टुअर्ट ब्रॉडने दोन तर ख्रिस वोक्स व स्टोक्सने प्रत्येकी १ बळी घेत आर्चरला सुरेख साथ दिली. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (६१) याने आपले तिसावे व मार्नस लाबुशेन (७४) याने तिसरे कसोटी अर्धशतक लगावले. वॉर्नरने आपल्या खेळीत सात तर ... Read More »

श्रीलंकेची सावध सुरुवात

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी श्रीलंकेने २ बाद ८५ धावा केल्या आहेत. पावसामुळे शुभारंभी दिनी केवळ ३६.३ षटकांचा खेळ होऊ शकला. कर्णधार दिमुथ करुणारत्ने ४९ धावा करून आपल्या २३व्या कसोटी अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असून माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने अजून खाते उघडलेले नाही. नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर थिरिमाने याने करुणारत्नेसह डावाची सुरुवात केली. खेळपट्टीचा अंदाज बांधण्यासाठी भरपूर वेळ ... Read More »