Daily Archives: August 22, 2019

विश्वासार्हता जपा!

आयएनएक्स मीडिया प्रकरणात पुत्र कार्ती चिदंबरम याच्यावर असलेली संशयाची सुई आता पिता पी. चिदंबरम यांच्यावर येऊन ठेपली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने चिदंबरम अडचणीत आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्नही तेथील सुनावणी लांबणीवर गेल्याने असफल ठरला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत चिदंबरम यांना तुरुंगाची हवा खावी लागू शकते. केंद्रीय गृहमंत्रीपद भूषविलेल्या त्यांच्यासारख्या ज्येष्ठ राजनेत्यावर ही वेळ यावी हा ... Read More »

आक्रमकपणा भारताचा, थरकाप पाकिस्तानचा

शैलेंद्र देवळणकर पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भूभाग आहे आणि आम्ही तो ताब्यात घेणारच, असे गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पाकिस्तानातील इम्रान खान यांचे सरकार घाबरले आहे. भारत पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्करी कारवाई करेल, अशी भीती पाकिस्तानला आहे. त्यामुळेच सैरभैर होऊन पाकिस्तानकडून आत्मघातकी निर्णय घेतले जात आहेत. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० प्रभावहीन करून तो केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्याच्या भारताच्या ऐतिहासिक ... Read More »

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अटक

>> आयएनएक्स घोटाळा प्रकरणी कारवाई >> आज दुपारी न्यायालयात हजर करणार >> गेटवरून उड्या मारून सीबीआयने घेतले ताब्यात >> अटकेप्रसंगी बंगल्याबाहेर ‘हायव्हॉल्टेज ड्रामा’ आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर २८ तासांनंतर सीबीआयने त्यांच्या जोरबागमधील घरातून अटक केली आहे. अटक करण्यापूर्वी सीबीआय पथकाने तब्बल दीड तास चिदंबरम यांची कसून चौकशी ... Read More »

अखेर ७ दिवसानंतर तिसवाडीला पाणी

केरये – खांडेपार येथे फुटलेल्या ९०० मिमी जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम काल सकाळी पूर्ण झाल्यानंतर दुपारपासून जलवाहिनीतून कमी दाबाने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ओपा येथील पाणी प्रकल्पातून पणजीत पाणी पोहोचण्यासाठी सात-आठ तासांचा कालावधी लागला. काल रात्री ९ वाजता आल्तिनोे, पणजी येथील पाण्याच्या टाकीला पाण्याचा पुरवठा होण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे पणजी परिसरातील नागरिकांना गुरूवारी पहाटेपासून पाण्याचा पुरवठा होणार आहे, अशी ... Read More »

राज्यातील विविध तलावांचे लवकरच सुशोभीकरण ः सोपटे

केंद्र सरकारच्या ग्रामीण पर्यटनाला चालना देण्याच्या योजनेखाली गोव्याला करोडो रुपयांचा निधी मिळणार आहे. या योजनेखाली राज्यातील विविध तलावांच्या शुभोभीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती गोवा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन दयानंद सोपटे यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली. वरील योजनेखाली करमळी तलावाच्या शुशोभीकरणासह, कुडचडे, कुडतरी आदी ठिकाणच्या तलावांच्या सुशोभीकरणाचे कामही हाती घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. विविध राज्यांच्या पर्यटन मंत्र्यांची ... Read More »

पणजीत कारगाड्यांना १ ऑक्टोबरपासून ‘पे पार्किंग’

>> १८ जून आणि आत्माराम बोरकर रस्त्यांचा समावेश >> महापौर उदय मडकईकर यांची माहिती पणजी महानगरपालिका क्षेत्रातील बेशिस्त पार्किंगमध्ये शिस्त आणण्यासाठी प्रायोगिक तत्त्वांवर दोन प्रमुख मार्गांवर येत्या १ ऑक्टोबर पासून पे पार्किंग योजना राबविण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या पे पार्किंगच्या प्रस्तावाला नगरपालिका संचालकांकडून मान्यता मिळाल्यानंतर निविदा जारी केली जाणार आहे, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दै. नवप्रभाला दिलेल्या खास मुलाखतीत ... Read More »

भारत-विंडीज पहिली कसोटी आजपासून

येथील सर व्हिवियन रिचडर्‌‌स स्टेडियमवर भारत व वेस्ट इंडीज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना आजपासून खेळविला जाणार आहे. खेळपट्टी वेगवान गोलंदाजीस पोषक असण्याची शक्यता असून फलंदाजांची खरी कसोटी या खेळपट्टीवर लागणार आहे. भारताने २००२ पासून वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिका गमावलेली नाही. त्यामुळे ही विजयी मालिका कायम राखण्याची सुरुवात कोहलीचे शिलेदार करणार आहेत. भारतासमोर संघ निवड हा प्रमुख ... Read More »

कांगारूंना जाणवणार स्मिथची अनुपस्थिती

ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यातील प्रतिष्ठेच्या ऍशेस कसोटी मालिकेतील तिसरा सामना आजपासून खेळविला जाणार आहे. दुखापतग्रस्त स्टीव स्मिथच्या अनुपस्थितीत जोफ्रा आर्चर अँड कंपनीला रोखणे कांगारूंना सोपे जाणार नाही. स्मिथच्या अनुपस्थितीत अनुभवी डेव्हिड वॉर्नरला स्वतःच्या खांद्यावर अधिक जबाबदारी घ्यावी लागणार आहे. मालिकेत ०-१ अशा पिछाडीवर असूनही दुसर्‍या कसोटीतील कामगिरीमुळे इंग्लंड संघाचा आत्मविश्‍वास दुणावला असून मालिकेत बरोबरीसाठी त्यांनी कंबर कसली आहे. सलामीवीर कॅमरून ... Read More »

मालिकेत बरोबरीचे न्यूझीलंडचे लक्ष्य

न्यूझीलंड व श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून कोलंबोच्या पी सारा ओव्हल मैदानावर खेळविला जाणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना जिंकून श्रीलंकेने १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिकेत बरोबरीचा पाहुण्या संघाचा प्रयत्न असेल. न्यूझीलंडने हा कसोटी सामना न जिंकल्यास आयसीसी कसोटी क्रमवारीत त्यांना स्थानाचा किंवा स्थानांचा (ऍशेस मालिकेतील तिसर्‍या कसोटीच्या निकालावर अवलंबून) फटका बसू शकतो. या मैदानावर श्रीलंकेचा जय-पराजयाचा ... Read More »