Daily Archives: August 20, 2019

पाण्याचे मोल जाणूया

तिसवाडी तालुक्याला पाणीपुरवठा करणार्‍या दोन मोठ्या जलवाहिन्या मुसळधार पावसात दरड कोसळल्याने फुटल्या आणि हजारो नागरिकांचे गेले चार दिवस हाल सुरू आहेत. नागरिकांना पर्यायी सुविधा उपलब्ध करून देण्यात सरकारचे सार्वजनिक बांधकाम खाते सपशेल अपयशी ठरले. लोकांवर अक्षरशः पागोळ्यांचे पाणी साठवण्याची पाळी ओढवली. पाणी हे ‘जीवन’ का आहे आणि पाण्याची किंमत काय असते हे अशा आणीबाणीच्या प्रसंगीच कळते. खरे तर गोव्यामध्ये ठिकठिकाणच्या ... Read More »

३७० कलमामुळे फुटिरतावादाचा अस्त होणार?

देवेश कु. कडकडे (डिचोली) काश्मिरी जनता भारताच्या मुख्य प्रवाहापासून दूर चालली होती. त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडायचे असेल तर त्यांना आधुनिक मूलभूत सुविधा उपलब्ध करून राष्ट्रीय प्रवाहाशी जोडून भयमुक्त केले पाहिजे. आता ३७० कलम हटविणे हाच या समस्येवर उपाय होता. मोदी सरकारने ३७० कलम हटवून भारतीय राजकारणाची दिशा बदलत असल्याचे संकेत दिले आहेत. तसेच कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना आत्मचिंतन करण्यास ... Read More »

काम युद्धपातळीवर, आज उशिरा पाणीपुरवठा

>> साबांखा मंत्री दीपक पाऊसकर यांची माहिती >> सलग पाचव्या दिवशी पाण्याचे दुर्भिक्ष्य राजधानी पणजीसह तिसवाडी तालुका आणि फोंडा तालुक्यातील काही भागातील नळ सलग पाचव्या दिवशी कोरडे असल्याने पाण्याचे मोठे दुर्भिक्ष निर्माण झाल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. टँकरद्वारे होणारा पाण्याचा पुरवठा अपुरा आहे. दरम्यान, केरये – खांडेपार येथे ९०० मिमी जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत दुरुस्तीचे काम ... Read More »

ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे निधन

‘उमराव जान’, ‘कभी-कभी’ यांसारख्या चित्रपटांमधून अजरामर संगीताची अमूल्य भेट श्रोत्यांना देणारे ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे काल रात्री साडेनऊ वाजता मुंबईतील सुजय रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांनी वयाच्या ९०व्या वर्षी १० कोटींची संपूर्ण संपत्ती दान केली होती. खय्याम यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्‍वातील एक अनमोल हिरा काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्यावर आज चार बंगला येथील कब्रस्तानात दङ्गनविधी ... Read More »

कला अकादमीची वास्तू पाडणार नाही

>> मंत्री गोविंद गावडे यांचे स्पष्टीकरण कला अकादमीची वास्तू पाडण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. समाज माध्यमांवरील त्यासंबंधीच्या अफवांवर जनतेने विश्‍वास ठेवू नये, असे कला अकादमीचे अध्यक्ष व कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी काल स्पष्ट केले. कला अकादमीची वास्तू पाडण्यात येणार आहे असे मी कुठे म्हटले होते, ते कुणीही पुराव्यासह सिद्ध करावे, असे आव्हानही गावडे यांनी यावेळी दिले. ... Read More »

पूरग्रस्तांना सर्वतोपरी सहकार्यासाठी शिवसेना कटिबद्ध

>> युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची ग्वाही >> कोकणातील पूरग्रस्तांशी साधला संवाद कोकणासह राज्यावर यंदा पूरस्थितीचे मोठे संकट ओढवले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी जनतेकरीता पक्ष व सरकार म्हणून शिवसेनेतर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जातीलच. मात्र, त्याही पलीकडे या आपत्तीमध्ये पक्ष, जात, धर्म, मतदारसंघ याच्या पलीकडे जाऊन संघटितपणे या आपत्तीला सामोरे जाण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही सदैव कार्यरत आहोत, असे प्रतिपादन युवासेना ... Read More »

स्मिथची दुसर्‍या स्थानी झेप

प्रगतीपथावर असलेल्या ऍशेस मालिकेतील तीन डावांत ३७८ धावा कुटलेल्या स्टीव स्मिथ याने काल सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडच्या केन विल्यमसन याला मागे टाकत दुसरा क्रमांक मिळविला आहे. अव्वलस्थानावरील कोहली व स्मिथ यांच्यात केवळ ९ गुणांचे अंतर आहे. दुखापतीमुळे स्मिथ तिसर्‍या कसोटीला मुकण्याची शक्यता आहे. तसेच भारत व विंडीज यांच्यातील कसोटी मालिकेला येत्या काही दिवसांत सुरुवात होणार असल्याने ... Read More »

शंकर, शार्दुल भारत ‘अ’ संघात

तिरुअनंतपुरम येथे दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध होणार्‍या पाच सामन्यांच्या मालिकेसाठी भारत ‘अ’ संघात विजय शंकर, शार्दुल ठाकूर यांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या तीन सामन्यांसाठी संघाचे कर्णधारपद मनीष पांडेकडे असेल. उर्वरित दोन लढतीत श्रेयस अय्यर संघाचे नेतृत्व करेल. पहिल्या तीन सामन्यांसाठी निवडलेल्या कृणाल पंड्या, खलील अहमद, दीपक चहर व मनीष पांडे यांचा शेवटच्या दोन सामन्यांत समावेश नाही. पहिल्या तीन सामन्यांत ... Read More »

श्रीकांत, प्रणिथ, प्रणॉय दुसर्‍या फेरीत

विश्‍व अजिंक्यपद स्पर्धेत काल सोमवारी सातव्या मानांकित किदांबी श्रीकांत व सोळाव्या मानांकित बी. साई प्रणिथ यांनी परस्पर विरोधी विजयाची नोंद केली. श्रीकांतने आयर्लंडच्या न्हात एनगुएन याचा तीन गेममध्ये १७-२१, २१-१६, २१-६ असा पराभव केला तर प्रणिथने सलग दोन गेममध्ये कॅनडाच्या जेसन अँथनी होशुई याचा खेळ २१-१७, २१-१६ असा खल्लास केला. श्रीकांतसमोर दुसर्‍या फेरीत इस्रायलच्या मिश्‍चा झिल्बरमनच्या रुपात तुल्यबळ प्रतिस्पर्धी असेल. ... Read More »

बद्धकोष्ठ ः मूळ अनेक रोगांचे

 डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) पचलेल्या अन्नातील पाण्याचे शोषण मोठ्या आतड्याद्वारे होऊन मल तयार होतो. हे होत असताना पाणी जास्त प्रमाणात शोषले गेले तर मल जास्त घट्ट होतो आणि बद्धकोष्ठ हा त्रास होतो व मल पुढे सरकण्यात अडचण निर्माण होते. मलविसर्जनाचा वेग आला असता वेगाचे धारण करणे किंवा मलप्रवृत्ती अडवून धरणे व त्याचवेळी शौचास न जाणे हे बद्धकोष्ठाचे सद्य परिस्थितीत ... Read More »