Daily Archives: August 19, 2019

लोकसंख्येचा फुगा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणातील लोकसंख्या नियंत्रणाचा विषय विरोधी पक्षनेत्यांनीही उचलून धरल्याने सध्या चर्चेत आलेला आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी देखील लोकसंख्या नियंत्रणाच्या मोदींनी व्यक्त केलेल्या आवश्यकतेला दुजोरा दिला आहे. खरे तर आजवर भारताचे कुशल मनुष्यबळ हीच या देशाची शक्ती असल्याचे मोदी सतत जागतिक व्यासपीठांवर ठसवत आले होते. सव्वाशे करोड देशवासीयांचा उल्लेख त्यांच्या भाषणात ... Read More »

… आणि गोव्याने मोदींचे नाव पुढे आणले!

गौतम चिंतामणी २०१३ साली गोव्यात झालेल्या भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत नरेंद्र मोदी यांचे नाव पक्षाचे निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून तत्कालीन पक्षाध्यक्ष राजनाथसिंग यांनी घोषित केले. तेथूनच मोदींचा भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून प्रवास सुरू झाला. गौतम चिंतामणी लिखित ‘राजनीती’ या राजनाथसिंग यांच्या आगामी इंग्रजी चरित्रातील त्यासंबंधीच्या प्रकरणाचा मराठी अनुवाद – भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ताबा घेतल्यापासून काही आठवड्यांतच नरेंद्र ... Read More »

तिसवाडीला पाणीपुरवठा मंगळवारपर्यंत शक्य

>> कामाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांची माहिती राजधानी पणजीसह तिसवाडी तालुक्यातील विविध भागात सलग चार दिवस नळाद्वारे पाण्याचा पुरवठा होऊ न शकल्याने पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. टँकरद्वारे होणारा पाण्याचा पुरवठा अपुरा आहे. पॅकबंद पाण्याचा तुटवडा निर्माण झाला असून चढ्या दराने पॅकबंद पाण्याची विक्री केली जात आहे. दरम्यान, केरये – खांडेपार येथे फुटलेल्या दोन मुख्य जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम जोरात सुरू ... Read More »

नेहरुंच्या चुकीमुळे गोव्याला उशिरा मुक्ती

>> भाजप नेते शिवराज सिंह चौहान यांची टीका कॉंग्रेसचे नेते तथा माजी पंतप्रधान दिवंगत पं. जवाहरलाल नेहरू यांच्या चुकीच्या धोरणामुळे भारत स्वातंत्र्यानंतर १४ वर्षांनी गोव्याला पोर्तुगीज राजवटीपासून मुक्ती मिळाली, असा आरोप भाजपचे नेते तथा मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत काल केला. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या चुकीच्या धोरणामुळे गोवा राज्यसुध्दा भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ... Read More »

काबूलमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोटात ६३ जण ठार

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शनिवारी रात्री झालेल्या आत्मघाती बॉम्ब स्ङ्गोटात ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. या स्ङ्गोटाची तीव्रता इतकी मोठी होती की १००हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. काबूलमधील पश्‍चिमेकडील दुबई शहरात एका हॉलमध्ये लग्न समारंभासाठी एक हजारहून अधिक लोक उपस्थित असताना हा बॉम्बस्ङ्गोट घडवण्यात आल्याची माहिती आहे. अद्याप ... Read More »

आता चर्चा केवळ पाकव्याप्त काश्मीरवरच

>> भारताचा पाकिस्तानला इशारा भारताने पाकविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून भविष्यात भारत पाकिस्तानसोबत केवळ पाकव्याप्त काश्मीर (पीओके) या एकमेव मुद्द्यावर चर्चा करेल, असा इशारा केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल दिला आहे. गरज पडलीच तर बालाकोट हवाई हल्ल्यापेक्षा मोठा हल्ला भारत पाकव्याप्त काश्मीरमध्ये येत्या काळात करू शकतो, अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानला ठणकावले आहे. हरयाणातील पंचकुला येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ... Read More »

पी. व्ही. सिंधूकडून सुवर्णपदकाची अपेक्षा

>> विश्‍व अजिंक्यपद स्पर्धा आजपासून बीडब्ल्यूएफ विश्‍व अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेच्या मागील काही आवृत्तीत सातत्यपूर्ण कामगिरी केलेल्या पी.व्ही. सिंधूकडे जेतेपदाची प्रबळ दावेदार म्हणून पाहण्यात येत आहे. या स्पर्धेत दोनवेळा रौप्य व दोनवेळा कांस्यपदक सिंधूने पटकावले असून सुवर्णपदकाने मात्र प्रत्येकवेळा तिला हुलकावणी दिली आहे. यावेळी ही कसर भरून काढण्यासाठी तिने कंबर कसली आहे. २०१७ साली जपानच्या नोझोमी ... Read More »

लंकेची न्यूझीलंडवर ६ गड्यांनी मात

>> दिमुथ करुणारत्ने – लाहिरु थिरिमानेची १६१ धावांची सलामी श्रीलंकेने २६८ धावांचा यशस्वी पाठलाग करताना काल रविवारी न्यूझीलंडचा ६ गड्यांनी पराभव केला. या विजयासह त्यांनी आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपल्या शुभारंभी लढतीत पूर्ण ६० गुणांची कमाई केली. दिमुथ करुणारत्ने याने कर्णधार या नात्याने विजयाचा रेकॉर्ड कायम राखत संघाला सलग तिसरा विजय मिळवून दिला. करुणारत्ने याने आपल्या २३ डावांतील पहिले व ... Read More »

अकल्पित नुकसानीचा महापूर

हेमचंद्र फडके महाराष्ट्राच्या आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक आणि राजकीय व सहकार या क्षेत्रांत अत्यंत महत्त्वाचे योगदान देणारी सांगली आणि कोल्हापूर ही दोन शहरे आणि त्यांभोवतीचा प्रदेश हा सुबत्तेचा, समृद्धीचा आणि संपन्नतेचा म्हणून ओळखला जातो. पण अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेल्या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक महापुरामुळे ही दोन्ही शहरे अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहेत. लोकांना वाचवण्याचे काम शासकीय गतीने का होईना, सुरू आहे; पण वाचवलेल्या लोकांनी जगायचे ... Read More »

मर्मज्ञ आणि सौजन्यशील समीक्षक ः प्रा. रा. ग. जाधव

डॉ. सोमनाथ कोमरपंत मराठी वाङ्‌मयाच्या क्षेत्रात मराठीचे नामवंत प्राध्यापक, मराठी विश्‍वकोशाचे कुशल संपादक, जीवन आणि साहित्य यांचा साकल्याने अनुबंध शोधणारे मर्मज्ञ समीक्षक, विचारवंत, सृजनशील साहित्यिक म्हणून प्रा. रा. ग. जाधवसरांनी ख्याती मिळवली होती. प्रा. रा. ग. जाधवसरांशी गाठीभेटी तशा फारशा झाल्या नाहीत. पण ज्या झाल्या त्या उत्कट स्वरूपाच्या झाल्या. त्यामुळे ते अत्यंत जवळचे वाटायला लागले. एम.ए.पर्यंतच्या विद्यार्थिदशेत त्यांचे समीक्षाग्रंथ क्वचितच ... Read More »