Daily Archives: August 17, 2019

कशाला हव्यात या निवडणुका?

गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका विद्यार्थ्यांच्या दोन गटांतील संघर्षामुळे लांबणीवर ढकलण्याचा निर्णय गोवा विद्यापीठाने काल घेतला. विशेष म्हणजे ज्या दोन गटांमध्ये झडलेल्या संघर्षामुळे या निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या, ते दोन्ही गट एकाच विचारधारेचे आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भारतीय जनता पक्ष प्रणित विद्यार्थी आघाडी यांच्यातील हा संघर्ष आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवाराचेच हे दोन्हीही घटक. मग असे असताना हीच ... Read More »

संभाव्य युद्धशक्यता व पाणबुड्यांची ताकद

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) पाकिस्तानने चीनकडे आठ एआयपी प्रणालीच्या पाणबुड्यांची मागणी केली असून, चीनने त्या देण्याची तयारी दर्शवली आहे. काश्मिरमधून ३७० व ३५ अ कलम हटवल्यानंतर पाकिस्तानी सेनाध्यक्ष जनरल कमर बाजवांनी युद्धाच्या शक्यतेबाबत संबंधात, जे तारे तोडले त्याच मूळ यात आहे असे म्हटलं तर ते वावगे होणार नाही. कुठल्याही युद्धात नौदलाला आपल्या बंदरांची सागरी सुरक्षा, समुद्री वाहतुकीचे मार्ग मोकळे ठेवणे, ... Read More »

तिसवाडीत पाणी टंचाई; जलवाहिन्यांची दुरुस्ती सुरू

>> तीन दिवसांत सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी प्रयत्न ः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती राजधानी पणजीसह तिसवाडी तालुक्यातील अनेक भाग आणि फोंडा तालुक्यातील काही भागातील नळ गुरुवारपासून कोरडे पडल्याने नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. खासगी आणि सरकारी टँकरच्या माध्यमातून विविध भागात पाण्याचा पुरवठा करून काही प्रमाणात नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तथापि, टँकरच्या माध्यमातून ... Read More »

सहकारी बँकेच्या निवडणूक नियमांचा फटका ः संबंधित न्यायालयात जाणार

गोवा राज्य सहकारी बँकेच्या येत्या २५ ऑगस्ट २०१९ रोजी होणार्‍या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकार क्षेत्रातील मातब्बरांचे अर्ज फेटाळण्यात आल्याने सहकार क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे. संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी बँकेच्या निवडणूक नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यात आल्याने सहकार क्षेत्रातील मातब्बरांना फटका बसला आहे. सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते माजी मंत्री प्रकाश शंकर वेळीप, बँकेचे माजी अध्यक्ष रामचंद्र मुळे, राजकुमार देसाई, दादी नाईक यांच्यासह ... Read More »

हेलिकॉप्टर दुरुस्तीच्या प्रस्तावित प्रकल्पाला चालना देणार ः श्रीपाद

मनोहर पर्रीकर संरक्षणमंत्री असताना गोव्यात हेलिकॉप्टर दुरुस्ती, देखभाल व तपासणी करणारा जो १७० कोटी रुपये गुंतवणुकीचा प्रकल्प उभारण्याचे ठरले होते तो प्रस्तावित प्रकल्प पुढे नेण्याची योजना आखण्यात आले असल्याचे संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी काल जाहीर केले. नाईक यांच्या कार्यालयातून काल प्रस्तृत करण्यात आलेल्या पत्रकातून ही माहिती देण्यात आली. २०१६ साली या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. मात्र प्रकल्पाचे काम ... Read More »

पणजीच्या वीज कार्यालयावर महिला कॉंग्रेस मोर्चा नेणार

गोवाभरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा व भरमसाठ वीज बिले यामुळे जनता हैराण झालेली असून याप्रश्‍नी प्रदेश महिला कॉंग्रेस पुढील आठवड्यात वीज खात्याच्या पणजी कार्यालयावर मोर्चा नेणार असल्याचे प्रदेश महिला कॉंग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. एका बाजूने सतत वीजपुरवठा खंडित होत आहे. तर दुसर्‍या बाजूने वीज खाते वीज दरात प्रचंड वाढ करून वीजग्राहकांना महागाईचा ‘शॉक’ देत असल्याचा ... Read More »

जम्मू ः कॉंग्रेसची पत्रकार परिषद रोखून मुख्य प्रवक्त्यास अटक

जम्मू-काश्मीर कॉंग्रेस पक्षाला काल पत्रकार परिषद घेण्यापासून प्रशासनातर्फे रोखण्यात आले आणि पक्षाचे मुख्य प्रवक्ते माजी आमदार रविंद्र शर्मा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कॉंग्रेस पक्षातर्फे जम्मू येथील पक्षाच्या मुख्यालयात सदर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पत्रकार परिषद सुरू होण्याआधीच तेथे पोलीस दाखल झाले आणि प्रवक्ते शर्मा यांना वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी बोलणी करण्यासाठी बोलावल्याचे सांगितले. तथापि शर्मा यांनी पोलिसांना सांगितले ... Read More »

लैंगिक छळणूक प्रकरणी मेजर जनरल बडतर्फ

एका कॅप्टन हुद्द्यावरील महिला अधिकार्‍याची लैंगिक छळणूक केल्याप्रकरणी भारतीय लष्कराच्या एका मेजर जनरल पदावरील अधिकार्‍याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी या निर्णयाला पुष्टी दिली आहे. २०१६ मधील या प्रकरणाची कोर्ट मार्शल चौकशी पूर्ण होऊन सदर अधिकार्‍याला बडतर्फीची शिक्षा ठोठावण्याचा निर्णय झाला. लेफ्ट. जनरल एम. के. एस. कहलोन यांनी या निर्णयाची माहिती संबंधित मेजर जनरलला दिली ... Read More »

किवीज-लंका कसोटी रोमांचक स्थितीत

>> वॉटलिंगचे झुंजार अर्धशतक >> एम्बुलदेनियाचे चार बळी न्यूझीलंड व श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामना तिसर्‍या दिवसअखेर रंगतदार स्थितीत येऊन पोहोचला आहे. निरोशन डिकवेलाच्या चिवट अर्धशतकाच्या बळावर श्रीलंकेने पहिल्या डावात १८ धावांची आघाडी घेतल्यानंतर न्यूझीलंडने दुसर्‍या डावात ७ बाद १९५ धावा केल्या आहेत. त्यांच्याकडे १७७ धावांची आघाडी असून यष्टिरक्षक फलंदाज बीजे वॉटलिंग ६३ धावांवर नाबाद आहे. दुसर्‍या दिवसाच्या ७ बाद ... Read More »

रवी शास्त्री कायम

>> टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांना कायम ठेवण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने काल घेतला. माजी क्रिकेटपटू कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीने एक पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. प्रशिक्षकाच्या निवडीमध्ये कर्णधार विराट कोहली याचा सल्ला घेण्यात आला नसल्याचे कपिलदेव यांनी स्पष्ट केले. विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत टीम इंडियाचे ... Read More »