Daily Archives: August 16, 2019

मोदींचा राष्ट्रसंकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात आपल्या दुसर्‍या पर्वातील सरकारचा कणखर कृतिकार्यक्रम जाहीर केला. जनतेने गेल्या लोकसभा निवडणुकीत दिलेल्या भरभक्कम कौलामुळे मोदी सरकार अधिक आक्रमकपणे पावले टाकू लागल्याचे दिसते आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या या सूतोवाचाला महत्त्व आहे. जम्मू काश्मीरचे कलम ३७० खालील विशेषाधिकार हटवण्याचा निर्धार या सरकारच्या कणखरपणाचा प्रत्यय देण्यास पुरेसा आहे. ३७० कलम हटवावे हे सर्वांच्या ... Read More »

भूमीपुत्रांच्या बेरोजगारीचे नष्टचर्य संपो!

शंभू भाऊ बांदेकर राज्याचे रोजगार धोरण नसल्याने खासगी उद्योगांमध्ये ८० टक्के स्थानिकांना सेवेत घेण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही, पण सरकारकडून खासगी उद्योग स्थापन करण्यासाठी भूखंड उपलब्ध करून दिला जातो. तसेच वीज व अनुदानाचा लाभ मिळवून दिला जातो. त्यामुळे खासगी उद्योगांमध्ये जास्तीत जास्त रोजगार स्थानिकांना मिळाला पाहिजे यावर त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. नुकत्याच पार पडलेल्या गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ... Read More »

तिसवाडीचा पाणीपुरवठा चार दिवस बंद

>> कुर्टीत महामार्गाची संरक्षक भिंत कोसळून जलवाहिन्या फुटल्या कुर्टी – केरये – खांडेपार येथे राष्ट्रीय महामार्गाची संरक्षक भिंत कोसळल्याने पाण्याचा पुरवठा करणार्‍या ९०० मिमी आणि ७५० मिमी अशा दोन प्रमुख जलवाहिन्या फुटल्याने राजधानी पणजीसह तिसवाडी तालुक्यातील बांबोळी, रायबंदर, ओल्ड गोवा, सांत आंद्रे, सांताक्रुझ, ताळगाव, बाणस्तारी, माशेल, कुंभारजुवा आदी भागातील पाणी पुरवठा कालपासून खंडीत झाला आहे. या दोन्ही जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी चार ... Read More »

नव्या संरक्षण दल प्रमुखपदाची घोषणा

>> लष्कर, नौदल, हवाई दल प्रमुखांशी समन्वय ः पंतप्रधान मोदी लष्कर, नौदल आणि हवाई दल यांच्यातील योग्य समन्वयासाठी पूरक ठरणार्‍या संरक्षण दल प्रमुख या नव्या महत्वाच्या पदाची निर्मिती करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिन सोहळ्यानिमित्त ध्वजारोहण केल्यानंतर देशवासियांना संबोधताना केली. देशाच्या तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख अशा स्वरुपाचे हे पद असून कारगिल युद्धादरम्यान १९९९ पासून या ... Read More »

भ्रष्टाचारमुक्त प्रशासन मुख्य उद्दिष्ट ः मुख्यमंत्री

सरकारचे भ्रष्टाचार मुक्त, पारदर्शक आणि गतिमान प्रशासन हेच मुख्य उद्दिष्ट आहे. सरकार अंत्योदय घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यपातळीवर स्वातंत्र्य दिन सोहळ्यात बोलताना काल केले. राज्यातील युवकांनी स्वकर्तृत्वाने पुढे आले पाहिजे. युवकांच्या कर्तृत्वाला चालना देण्यासाठी सर्व सहकार्य केले जाणार आहे. नवभारत निर्माणामध्ये सर्वांनी योगदान देण्याची गरज आहे. सर्वच क्षेत्रात सकारात्मक विचारांना ... Read More »

नवप्रभेवर वर्धापनदिनी शुभेच्छांचा वर्षाव!

दैनिक नवप्रभाने काल आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. नवप्रभाचा ४९ वा वर्धापनदिन यानिमित्ताने उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कर्मचारीवर्गातर्फे आयोजित श्रीसत्यनारायण महापूजेस मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, विरोधी पक्षनेते श्री. दिगंबर कामत, सभापती श्री. राजेश पाटणेकर, पणजीचे महापौर उदय मडकईकर, माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप, माजी मंत्री महादेव नाईक यांच्यासह विविध क्षेत्रांतील असंख्य मान्यवरांनी उपस्थिती लावून नवप्रभेला शुभेच्छा ... Read More »

भारताचा विंडीजवर मालिका विजय

>> तिसरा एकदिवसीय सामना ६ गड्यांनी जिंकला >> विराट कोहलीने ठोकले ४३वे वनडे शतक कर्णधार विराट कोहलीचे नाबाद शतक आणि श्रेयस अय्यरच्या तुफानी अर्धशतकी खेळीच्या बळावर तिसर्‍या व अखेरच्या एकदिवसीय सामन्यात विंडीजवर ६ गडी राखून विजय मिळवला. मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे या विजयासह भारताने तीन सामन्यांची मालिका २-० अशी खिशात घातली. २००७ सालापासून विंडीज व भारत ... Read More »

श्रीलंका २२ धावांनी पिछाडीवर

>> न्यूझीलंडकडून ऐजाझ पटेलचा प्रभावी मारा श्रीलंका व न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना दुसर्‍या दिवसअखेर समान स्थितीत येऊन पोहोचला आहे. न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील २४९ धावांना उत्तर देताना यजमानांनी ७ बाद २२२ धावांपर्यंत मजल मारली आहे. पहिल्या दिवसाच्या ५ बाद २०३ धावांवरून काल पुढे खेळताना न्यूझीलंडला अडीचशेपार जाता आले नाही. शतकाकडे वाटचाल करत असलेल्या टेलरने निराशा केली. फिरकीपटू प्रभावी ठरण्याची अपेक्षा ... Read More »