Daily Archives: August 14, 2019

राष्ट्रहित प्रथम

‘जम्मू काश्मीरमध्ये सरकारने जनतेवर निर्बंध लादून घोर दडपशाही चालवलेली आहे, त्यामुळे ते निर्बंध तात्काळ हटवावेत’ या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली मंडळी शेवटी काल सपशेल उताणी पडली. जम्मू काश्मीरमधील परिस्थिती सामान्य व्हायला थोडा वेळ लागेल आणि सरकारला तेवढा वेळ देणे गरजेचे आहे अशी समज सर्वोच्च न्यायालयाने संबंधित याचिकाकर्त्यांना दिली आणि सरकारला काही निर्देश देण्यास स्पष्ट नकार दर्शवला. कलम ३७० खालील ... Read More »

लडाखला मिळणार न्याय!

ऍड. प्रदीप उमप ३७० वे कलम हटविण्याच्या निर्णयामुळे आता फुटीरतावाद्यांचे धाबे दणाणले आहे. हे कलम रद्द करण्याची मागणी संपूर्ण देशभरातून पूर्वीपासूनच होत होती. परंतु कोणत्याही सरकारने ते धैर्य दाखविले नाही. मोदी सरकारने ते दाखविल्यामुळे लडाखच्या उत्कर्षाचा मार्ग मोकळा झाला आहे. जम्मू-काश्मीर पुुनर्रचना विधेयक-२०१९ मंजूर झाल्यानंतर राज्यातील जमिनीचाच नव्हे तर राजकारणाचाही भूगोल बदलला आहे. विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करून राजकीय भूगोल बदलण्याचेही ... Read More »

गोवा डेअरीचे ८ संचालक अपात्र

>> सहकार निबंधकांचा निवाडा ः प्रशासक नियुक्त >> नुकसानीच्या चौकशीसाठी अधिकारी नियुक्त करणार सहकार निबंधकांनी कुर्टी फोंडा येथील गोवा दूध उत्पादक संघातील (गोवा डेअरी) कथित गैरव्यवहार प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आठ संचालकांना अपात्र ठरविले असून गोवा डेअरीवर पशुसंवर्धन खात्याचे उपसंचालक डॉ. विलास नाईक यांची प्रशासक म्हणून नियुक्ती काल केली आहे. गोवा डेअरीतील कथित गैरव्यवहारामुळे झालेल्या नुकसानीची चौकशीसाठी खास अधिकार्‍याची नियुक्ती ... Read More »

काश्मीर पूर्वपदावर येण्यासाठी सरकारला वेळ द्यावा Aः सुप्रिम कोर्ट

केंद्र सरकारने ३७० कलम रद्द केल्यानंतर जम्मू – काश्मीरमध्ये विविध निर्बंध लागू करण्याच्या केंद्र सरकार व जम्मू – काश्मीर सरकारच्या निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने काल एका संबंधित याचिकेवरील सुनावणीवेळी नकार दिला. जम्मू – काश्मीरमधील स्थिती संवेदनशील असल्याने निर्बंध हटविणे किंवा शिथिल करण्यास सरकारला आणखी वेळ मिळण्याची गरज असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. जम्मू – काश्मीरमधील वस्तुस्थिती अधिक स्पष्ट ... Read More »

विरोधी नेत्यांना जम्मू – काश्मीरात जाऊ देण्याची कॉंग्रेसची मागणी

जम्मू – काश्मीरमध्ये ३७० कलम रद्दच्या घटनेनंतर तेथील विद्यमान स्थितीवर सर्व विरोधी पक्षांशी सुसंवाद साधण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. ज्यामुळे जम्मू – काश्मीरमधील सध्याची वस्तुस्थिती कशी आहे हे सर्वांना कळेल. तसेच तेथील अटक केलेल्या माजी मुख्यमंत्र्यांसह सर्व राजकीय नेत्यांची सुटका करावी, अशी मागणी काल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी पत्रकार परिषदेत केली. जम्मू – काश्मीरमधील सध्याच्या स्थितीमुळे कोणालाही चिंता वाटणे ... Read More »

गोमेकॉतील एमबीबीएस प्रवेश प्रक्रिया संशयास्पद ः कॉंग्रेस

कॉंग्रेस पक्षाने गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेबाबत संशय् व्यक्त केला आहे. एमबीबीएसमधील प्रवेशाबाबत तंत्रशिक्षण मंडळाने खुलासा करावा, अशी मागणी गोवा प्रदेश कॉंग्रेसचे माध्यम विभागाचे समन्वयक ट्रोजन डिमेलो यांनी पत्रकार परिषदेत काल केली. एमबीबीएसच्या प्रवेश प्रक्रियेत ईडब्लूएस विभागात गैरप्रकार करण्यात आला आहे. प्रवेश प्रक्रियेत मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आलेले नाही, दावा कॉंग्रेसचे ट्रोजन डिमेलो यांनी केला आहे. वर्ष २०१२ मध्ये ... Read More »

कोणतेही आव्हान मोडून काढण्यास सज्ज ः रावत

>> पाक सैनिकांच्या हालचालींवर प्रतिक्रिया जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेलगत सुरक्षेबाबातच्या कोणत्याही आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी व चौख प्रत्त्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराची सर्वतोपरी सुसज्जता आहे अशी प्रतिक्रिया लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी काल व्यक्त केली. प्रत्येक देश आपल्या सुरक्षेसाठी सावधगिरीच्या उपाययोजना करत असतो. त्यामुळे सीमेपलीकडून पाकिस्तान आपल्या सैनिकांची जमावजमव करीत असला तरी भारताला चिंता करण्याची गरज नाही असे रावत म्हणाले. गेल्या काही ... Read More »

आडनावे बदल गैरप्रकारांची प्रकरणे रद्द करण्याची मागणी

>> ४१९२ प्रकरणांची सखोल चौकशी हवी राज्यात आडनावे बदलण्यात आलेल्या ४१९२ प्रकरणांची सखोल चौकशी करून गैरप्रकार आढळून येणारी आडनावे बदलाची प्रकरणे रद्दबातल करावी, अशी मागणी अखिल गोवा भंडारी समाज संस्थेचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी पत्रकार परिषदेत काल केली. बिगर गोमंतकीय नागरिकांकडून ओबीसी अंतर्गत योजनांचा लाभ मिळवून घेण्यासाठी केवळ आडनाव बदलण्याचे प्रकार सुरू आहेत. आडनाव बदलणार्‍यांकडून केवळ नाईक या आडनावाचा मोठ्या ... Read More »

श्रीलंका-न्यूझीलंड पहिली कसोटी आजपासून

न्यूझीलंड व श्रीलंका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून गॉल येथे सुरुवात होणार आहे. मालिका २-० अशी जिंकल्यास कसोटी क्रिकेटच्या इतिहासात त्यांचा संघ प्रथमच कसोटीत अव्वल होणार आहे. श्रीलंकेचा संघ तुलनेने कमकुवत असला तरी मायदेशात खेळण्याचा फायदा त्यांना नक्की मिळणार आहे. आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असल्याने या मालिकेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. श्रीलंकेचा संघ सध्या संक्रमणाच्या प्रक्रियेतून जात ... Read More »

नॉर्ते, सेकंड, मुथूसामीचा समावेश

>> भारत दौर्‍यासाठी आफ्रिकेचा कसोटी संघ जाहीर दक्षिण आफ्रिकेने आपल्या टी-ट्वेंटी संघाचे नेतृत्व यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक याच्याकडे सोपविले आहे. द. आफ्रिकेच्या भारत दौर्‍यात तो संघाचे नेतृत्व करेल. जलदगती गोलंदाज ऍन्रिक नॉर्ते, फलंदाज तेंबा बवुमा व ब्यॉर्न फॉच्युईन या तीन नव्या चेहर्‍यांना टी-ट्वेंटी संघात निवडण्यात आले आहे. फाफ ड्युप्लेसीचा टी-ट्वेंटी संघात समावेश करण्यात आलेला नाही. टी-ट्वेंटीसाठी आपली उपलब्धता कळवूनही ... Read More »