Daily Archives: August 13, 2019

पाकिस्तान एकाकी

संविधानाच्या कलम ३७० खालील काश्मीरचा खास दर्जा काढून घेतला गेल्यापासून काश्मीर खोर्‍याचा काही भाग संचारबंदी व निर्बंधांखाली जरी असला, तरी उर्वरित भागांतील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येईल अशी चिन्हे दिसू लागली आहेत. जम्मू आणि लडाखमध्ये तर परिस्थिती सामान्य झाली आहेच, शिवाय काश्मीर खोर्‍यातूनही मोदी सरकारच्या आश्वासनांवर काही काळ विश्वास ठेवून पाहायला काय हरकत आहे असा दबका सूरही हळूहळू व्यक्त होऊ लागला ... Read More »

अयोध्या प्रकरणाची तड लागणार?

देवेश कु. कडकडे अयोध्या विवादात सर्वोच्च न्यायालयाने सुचवलेला मध्यस्थीचा पर्याय सहमती न होऊ शकल्याने फोल ठरला. त्यामुळे आता अयोध्या प्रश्नावर दैनंदिन सुनावणीद्वारे हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न चालला आहे. खरोखरच यातून अयोध्या प्रश्नाची तड लागू शकेल? ‘अयोध्या’ प्रकरणात मध्यस्थीचे प्रयत्न फसल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात दैनंदिन सुनावणी सुरू झाली आहे. आज देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात अयोध्या विषयाबद्दल संभ्रमाचे वातावरण आहे. हा विषय सतत ... Read More »

रशियाशी गोव्याचा व्यापार करार

रशियाच्या दौर्‍यावर गेलेले गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी सोमवारी रशियाबरोबर व्यापारासंबंधीच्या समझोता करारावर सह्या केल्या, असे सूत्रांनी सांगितले. रशियातील खाण व मच्छीमारी या क्षेत्रातील व्यापार्‍यांबरोबर काल त्यांनी चर्चा केल्याचेही सूत्रांनी सांगितले. गोव्यात येणार्‍या रशियन पर्यटकांच्या संख्येत का घट झाली आहे ते जाणून घेण्यासाठीही तेथील पर्यटन क्षेत्रातील प्रतिनिधींशी सावंत हे चर्चा करणार आहेत. दोन दिवसांपूर्वी रशियाच्या दौर्‍यावर गेलेल्या केंद्र सरकारच्या ... Read More »

पूर बळींची संख्या १६९

>> केरळ, कर्नाटक, महाराष्ट्रात स्थिती गंभीरच केरळ, कर्नाटक व महाराष्ट्र राज्यांमधील पुरातील बळींची संख्या काल १६९ झाली असून या राज्यांमधील पूरग्रस्त भागांमधील अनेकजण अजूनही बेपत्ता असल्याने ही संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. केरळमधील पुरात मरण पावलेल्यांची संख्या ७६ झाली असून तेथील ५८ जण बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. कर्नाटकमधील पूर बळींची संख्या ४० झाली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील पूरग्रस्त ... Read More »

जम्मू-काश्मीरात ईद शांततेत

काही किरकोळ घटना सोडल्यास जम्मू-काश्मीरमध्ये काल ईद उत्सव शांततेत पार पडला अशी माहिती या नव्या संघ प्रदेशाचे राज्यपाल सत्यपाल मलीक यांचे प्रधान सचिव रोहित कान्सल यांनी दिली. तथापि बहुतेक प्रदेशात संचारबंदीची स्थिती असल्याने ईद सणाचा उत्साह दिसून येत नव्हता. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूत्रांनुसार विविध माशिदींमध्ये प्रार्थनांसाठी भाविकांनी चांगल्या संख्येने उपस्थिती लावली होती. ईद निमित्त प्रार्थना सभांमध्ये उपस्थित राहण्यासाठी लोकांना मुभा ... Read More »

बीच क्लिनिंग : मुदत संपूनही कंत्राटदाराला जादा अवधी

>> कॉंग्रेसचा सरकारवर आरोप भाजप पदाधिकार्‍यांचे हितसंबंध जपण्यासाठी सरकारने मेसर्स दृष्टी लाईफ सेव्हिंग प्रा. लिमिटेड यांना गोव्याचे समुद्र किनारे साफ करण्यासाठी तसेच समुद्र किनार्‍यांवर सुरक्षा रक्षक सेवा पुरवण्यासाठी दिलेल्या कंत्राटाची मुदत संपली असून सरकार मागील दाराने सदर कंत्राटदाराला कामाचा अवधी वाढवून देण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप काल कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यानी काल पत्रकार परिषदेत केला. सरकारच्या ह्या कृतीला ... Read More »

कदंब बसेस बेळगावला धोका पत्करून जाणार नाही

गोवा बेळगाव महामार्ग वाहतुकीसाठी कधी सुरू होईल हे या घडीला सांगणे कठीण आहे, अशा प्रतिक्रिया कदंब महामंडळाचे चेअरमन तथा आमदार कार्लुस आल्मेदा यानी काल दिली. गोवा ते बेळगांव या दरम्यानचे तिन्ही महामार्ग सध्या बंद आहेत. त्यामुळे कर्नाटकच्या एसटी बसेस तसेच गोव्याच्या कदंब बसेस गेल्या ८-१० दिवसांपासून ह्या मार्गावरून प्रवास करू शकलेल्या नाहीत. आल्मेदा यांना काल यासंबंधी विचारले असता गोवा बेळगांव ... Read More »

भारताचा विंडीजवर ५९ धावांनी विजय

कर्णधार विराट कोहलीची शतकी खेळी आणि स्विंग गोलंदाज भुवनेश्‍वर कुमारने घेतलेल्या चार बळींच्या बळावर भारताने दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात विंडीजचा डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे ५९ धावांनी पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना भारताने ७ गड्यांच्या मोबदल्यात २७९ धावा केल्या होत्या. मात्र विंडीजचा डाव सुरू असताना पावसाच्या व्यत्ययामुळे विंडीजसमोर विजयासाठी ४६ षटकात २७० धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले. पण विंडीजचा संघ २१० ... Read More »

‘क्रिकेट वर्ल्डकप लीग २’ची घोषणा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने काल सोमवारी ‘क्रिकेट वर्ल्डकप लीग २’ची घोषणा केली. २०२३च्या विश्‍वचषक स्पर्धेसाठीची ही नवीन चार वर्षे चालणारी पात्रता फेरी असेल. लीग २मध्ये नामिबिया, नेपाळ, ओमान, पापुआ न्यू गिनी, स्कॉटलंड, अमेरिका व संयुक्त अरब अमिराती हे देश एकूण १२६ एकदिवसीय सामने खेळणार आहेत. यात २१ तिरंगी मालिकांचा समावेश करण्यात आला आहे. ऑगस्ट २०१९ ते जानेवारी २०२२ या कालावधीत प्रत्येक ... Read More »

दिल्लीकडून खेळू शकतो रहाण

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आगामी आयपीएल मोसमात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळण्याची शक्यता आहे. सध्या अजिंक्य रहाणे राजस्थान रॉयल्स संघाकडून आयपीएलमध्ये खेळतोय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीच्या संघ मालकांनी अजिंक्यला आपल्या संघात घेण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण केली आहे. अजिंक्यच्या हस्तांतरण प्रक्रियेबद्दल दिल्ली आणि राजस्थान या संघांमध्ये चर्चाही सुरु असल्याचे समजते. मागील मोसमात ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिला कर्णधार करण्यासाठी राजस्थानने स्पर्धेच्या मध्यावरच ... Read More »