Daily Archives: August 12, 2019

म्हणे लोकशाही!

कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदी पुन्हा सोनिया गांधी यांचीच निवड करून पक्षाच्या कार्यसमितीने पुन्हा एकवार पक्षजनांची गांधी घराण्यापुढील लाचारीच जगजाहीर केली आहे. पक्षाचे नेतृत्व गांधी घराण्याकडे नसेल तर आधीच बुडते जहाज बनलेला हा पक्ष एकसंध राहणे कठीण आहे हाच संदेश या नाट्यमय घडामोडींतून देशाला गेला आहे. खरे तर पक्षाध्यक्षपदाचा त्याग करताना राहुल गांधी यांनी आता पक्षाचे नेतृत्व गांधी घराण्याबाहेर जावे यासाठी पदत्याग ... Read More »

३७० वर कॉंग्रेसच्या बिनडोक प्रतिक्रिया

ल. त्र्यं. जोशी सरकारने ३७० वे कलम घटनेतून काढून टाकलेले नाही. ते कायम ठेवून त्या कलमातील तरतुदींच्याच आधारे फुटीरतेला बळ देणारे अंश तेवढे निष्प्रभ केले आहेत व जम्मू काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन करुन जम्मूकाश्मीरला विधानसभा प्रदान केली आहे तर लडाख हा पूर्णपणे केंद्रशासित प्रदेश ठेवला आहे. लोकमान्य टिळकांचा ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ हा अग्रलेखाचा मथळा खूप गाजला. पण ... Read More »

केरळ, कर्नाटक व महाराष्ट्रातील पुरातील बळींची संख्या १५७ वर

  केरळ, महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यातील प्रलयंकारी पावसाने आतापर्यंत १५७ बळी घेतल्याचे वृत्त आहे. एकट्या केरळमधील बळींची संख्या ६७ वर गेली असून २.२७ लाख लोकांना मदत शिबिरांमध्ये हलविण्यात आले आहे. दरम्यान हवामान खात्याने केरळमधील कन्नूर, कासरगोड व वायनाड या तीन जिल्ह्यांमध्ये पुन्हा अतीवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. कॉंगे्रस नेते तथा वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी काल वायनाड जिल्ह्याचा ... Read More »

गोव्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दिलासा

>> राज्यात मागील दोन दिवसापासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नागरिकांनी सुस्कारा सोडला आहे राज्यात आत्तापर्यंत १०७.८७ इंच पावसाची नोंद झाली आहे राज्यात जोरदार पावसामुळे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे. घरे, वाहनांवर झाडे मोडून पडल्याने नुकसान झाले आहे. त्याच बरोबर भात शेती, बागायतीची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. पुराचे पाणी घरात घुसल्याने घरातील सामानाची हानी झाली आहे. राज्याला गेले कित्येक दिवस ... Read More »

जम्मू-काश्मीरात अल्प मोकळीकीनंतर पुन्हा निर्बंध

जम्मू-काश्मीरात काल सकाळी ते दुपारपर्यंत लोकांना त्यांचे दैनंदिन व्यवहार करू देण्याची मोकळीक देण्यात आल्यानंतर पुन्हा दुपारपासून पूर्ववत सर्व व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले. लोकांना घरी जाण्यास सांगण्यात आल्यामुळे दुकानदारांनी दुकाने बंद केली. आजच्या ईद उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर काल सकाळी लोकांना दैनंदिन वस्तूंच्या खरेदीसाठी तसेच एटीएममधून पैसे काढण्यासाठी मोकळीक दिल्याने राज्यातील स्थिती सर्वसामान्य बनल्याचे दिसत होते. लोकही मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाहेर पडले होते. ... Read More »

विपर्यस्त वृत्त देणार्‍या प्रसार माध्यमांवर कारवाई शक्य

जम्मू-काश्मीरमधील सध्याच्या स्थितीविषयक निराधार व कपोलकल्पित बातम्या प्रसिध्द करणार्‍या प्रसार माध्यमांवर कारवाई करण्याचा विचार सरकार करीत असल्याचे वृत्त आहे. अशा प्रकारच्या चुकीच्या व विपर्यस्त बातम्या पसरविणार्‍यां माध्यमांना कायदेशीर नोटीस बजावण्यात येण्याची शक्यता केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली. केंद्रीय गृह मंत्रालयाने या संदर्भात एक निवेदन जारी केले असून त्यात म्हटले आहे की सदर विपर्यस्त वृत्त प्रथम रॉयटर्स वृत्त संस्थेने दिले व ... Read More »

पाकव्याप्त काश्मीरात दहशतवाद्यांची मोठ्या प्रमाणात जमवाजमव

>> भारतीय जवानांची करडी नजर : लेफ्ट जनरल ढिल्लॉं भारत सरकारने घटनेतील ३७० कलम रद्द केल्याच्या दिवसापासून पाकस्थित दहशतवादी प्रत्येक रात्री भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. पाकमधील दहशतवाद्यांच्या तळांवर मोठ्या प्रमाणात दहशतवादी एकत्र होत आहेत अशी माहिती श्रीनगर येथील १५ कॉर्पस्‌चे लेफ्ट. जनरल के. जे. एस ढिल्लॉं यांनी काल वृत्त संस्थांना दिली. मात्र अजूनही सीमेपलीकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झालेले नाही असे ... Read More »

काश्मीरात गोळीबाराच्या वृत्तांचे पोलिसांकडून खंडन

काश्मीर खोर्‍यात गोळीबाराच्या घटना घडल्याच्या काही प्रसार माध्यमांनी प्रसृत केलेल्या वृत्तांचे जम्मू काश्मीर पोलिसांनी काल खंडन केले. तसेच अशा खोडसाळ व हेतूप्रेरीत वृत्तांवर लोकांनी विश्‍वास ठेवू नये असे आवाहनही पोलिसांनी केले. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी वरील आवाहन करताना स्पष्ट केले की गेल्या सहा दिवसात पोलिसांना एकसुध्दा गोळी झाडावी लागलेली नाही. जम्मूतील १० जिल्ह्यांमध्ये मोकळे वातावरण असून कोणतेही निर्बंध ... Read More »

पणजी महापालिका मार्केट संकुल ४ दिवसांपासून वीज पुरवठ्याविना

येथील पणजी महानगरपालिकेच्या मार्केट संकुलाला वीज पुरवठा करणार्‍या केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने मागील चार दिवसांपासून मार्केट संकुल काळोखात बुडाला आहे. महानगरपालिकेने वीज पुरवठा केंद्राच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. तथापि, तांत्रिक बिघाड दुरुस्तीच्या प्रयत्नाला रविवारपर्यंत यश प्राप्त झाले नाही. मार्केटमधील काही व्यापार्‍यांनी जनरेटरच्या साहाय्याने पर्यायी विजेची सोय केली आहे. तर, काही व्यापारी मेणबत्तीच्या उजेडात व्यापार करीत आहेत. मार्केटचा वीज पुरवठा ... Read More »

महिलांना रात्रपाळी कामविरोधी निवेदन राज्यपालांना सादर

राज्यातील खासगी उद्योगांमध्ये महिलांना रात्रपाळीत काम करण्यास मान्यता देणार्‍या विधेयकाला विरोध करणारे निवेदन गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीने राज्यपालांना काल सादर केले. गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये कंपनी (गोवा दुरुस्ती) विधेयक संमत करण्यात आले आहे. या विधेयकांमध्ये खासगी उद्योगामध्ये महिलांना रात्रपाळीत काम करण्यास मान्यता देण्याची तरतूद आहे. विधानसभेत या दुरुस्ती विधेयकांवरील चर्चेच्यावेळी कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांनी विधेयकाला विरोध केला होता. राज्यातील खासगी उद्योग ... Read More »