Daily Archives: August 10, 2019

राखीचा धागा ः शक्तीचे प्रतीक

सरिता नाईक (फातोर्डा- मडगाव) रक्षाबंधनाचा सण नेमका केव्हापासून सुरू झाला याचा ठोस पुरावा नाही. पण पुराणातसुद्धा रक्षाबंधनाचा उल्लेख आहे. त्या संबंधीच्या दंतकथा आहेत. श्रीमद्भागवत ग्रंथामध्येसुद्धा वामनावतारामध्ये रक्षाबंधनाचा प्रसंग आहे. कृष्ण आणि द्रौपदीची कथा तर प्रसिद्धच आहे. हल्लीच्या काळात हजारो प्रकारच्या राख्या मिळतात. पण साध्या रेशमी धाग्यामध्ये आणि महागड्या राख्यांमध्ये भावना मात्र एकच असते. बाजारातल्या रंगीबेरंगी राख्या पहायला छान वाटतं ना! ... Read More »

नवी सुरूवात

घटनेच्या ३७० कलमाखालील विशेषाधिकार काढून घेतलेल्या काश्मीरच्या पुनर्निर्माणासाठीचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी रात्री दूरदर्शनवरून केलेल्या संबोधनात प्रकट केला. घटनेचे ३७० वे कलम रद्द केले, आमचे राज्य दुभंगले, आमचे संविधान काढले गेले, ध्वज काढला गेला, आमच्या जमिनींना असलेले संरक्षण नाहीसे झाले, आमचा राज्याचा दर्जा गेला, आमचे जणू सर्वस्व हिरावले गेले अशी भावना बनलेल्या काश्मिरी जनतेला विश्वास देण्यासाठी अशा प्रकारचे ... Read More »

लष्कराला आता चिंता स्नायपर्सची

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) जैश ए मोहम्मद आणि लश्कर ए तोयबाच्या जिहाद्यांद्वारा होणार्‍या स्नायपर रायफलचा वापर सेना आणि अर्ध सैनिकदलांसाठी चिंतेचा विषय झाला आहे. माणसे न गमावता सुरक्षा दलांची जीवहानी करण्यासाठी ‘स्नायपर फायर’ हाच एकमेव पर्याय जिहाद्यांकडे उरला आहे. आपल्या मुजाहीदिनांचे मनोबल वृद्धिंगत करण्यासाठी आयएसआय यापुढे स्नायपर्सचा उपयोग करेल यात शंकाच नाही. अलीकडेच अमरनाथ यात्रेवर स्नायपर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट ... Read More »

शिक्षेची तरतूद असलेले प्लास्टिकबंदी विधेयक मंजूर

राज्यात प्लास्टिक उत्पादन आणि वापराला बंदी लादणार्‍या गोवा नॉन बायोडिग्रेडेबल कचरा (नियंत्रण) दुरुस्ती विधेयकाला विधानसभेत काल मंजुरी देण्यात आली. गोवा राज्य हे प्लास्टिक मुक्त राज्य म्हणून जाहीर करण्यात येणार असून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी १ जानेवारी, २०२० पासून केली जाणार आहे. प्लास्टिकच्या पिशव्या व प्लास्टिकपासून वस्तू तयार करणारे उत्पादक आणि वापर करणार्‍यांना दंड किंवा कारावासाच्या शिक्षेची तरतूद विधेयकामध्ये आहे, अशी माहिती ... Read More »

जम्मूमधून संचारबंदी उठवली

गेल्या सहा दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये संचारबंदी (कलम १४४ ) लागू असून काल ङ्गक्त जम्मूमधून ही संचारबंदी पूर्णपणे उठवण्यात आली आहे. मात्र, राज्याच्या इतर भागात संचारबंदी कायम असणार आहे. दरम्यान, संचारबंदी उठवण्यात आल्याने जम्मूमधील शाळा आणि महाविद्यालये आज सुरू होणार आहेत. जम्मू जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी सुषमा चौहान यांनी जम्मूमधील संचारबंदी आणि जमावबंदी उठवली आहे. तसे आदेशच काढण्यात आले आहे. या आदेशानुसार शनिवार १० ... Read More »

सरकारी भूखंडासाठी २५ वर्षांच्या निवासी दाखल्याची अट ः मॉविन

राज्यातील गृहनिर्माण वसाहतीत घरासाठी भूखंड खरेदी करण्यासाठी आतापर्यंत १५ वर्षांच्या निवासी दाखल्याची जी अट होती ती आता वाढवून २५ वर्षे एवढी करण्यात येणार असल्याचे गृहनिर्माण खात्याचे मंत्री माविन गुदिन्हो यांनी काल विधानसभेत सांगितले. कॉंग्रेस आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी काल विधानसभेत मांडलेल्या खासगी ठरावावर बोलताना गुदिन्हो यांनी वरील घोषणा केली. माविन गुदिन्हो म्हणाले, की बरेचसे गोमंतकीय गृहनिर्माण वसाहतीत भूखंड खरेदी ... Read More »

लोकायुक्त, दक्षता खाते सक्षम करणार : मुख्यमंत्री

भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी दक्षता खाते आणि लोकायुक्तालय सक्षम करण्यात जाणार येणार आहेत. सरकारकडून अनावश्यक खर्चाला आळा घातला जाणार असून सरकारी निधीचा योग्य विनियोग करण्यावर भर दिला जाणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत गोवा विनियोग विधेयकावरील चर्चेत बोलताना काल दिली. पंधराव्या वित्त आयोगाकडे निधीबाबत विचारविनिमय करण्यापूर्वी सर्व आमदारांना विश्‍वासात घेण्यात येणार आहे. केंद्राकडून मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्यांना निधी उपलब्ध ... Read More »

भय इथले संपत नाही…

>> साळ, पेडण्यात पाणी ओसरले पण भीती कायम तिलारी धरणाच्या जलविसर्गामुळे व मुसळधार पावसामुळे महापुराचा तडाखा बसलेल्या साळ गावातील पूर ओसरला आहे. पुलाखाली पाणी गेल्याने व पाणी ओसरू लागल्याने साळवासीयांना थोडा धीर आला असला तरी लाखो रुपयांची शेती बागायतीची, घरांची हानी झाल्याने ते भीतीच्या छायेत आहेत. दरम्यान, साळ नदीवरील बंधारा ङ्गूटब्रिज पूर्णपणे उखडला असून भलीमोठी लाकडे, ओंडके अडकून असल्याने या ... Read More »

बीसीसीआय झुकली

>> ‘नाडा’ करणार भारतीय क्रिकेटपटूंची उत्तेजक चाचणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी संस्था (नाडा) अंतर्गत येण्यास काल शुक्रवारी सहमती दर्शवली. मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी व महाव्यवस्थापक (क्रिकेट व्यवहार) साबा करीम यांनी क्रीडा सचिव राधेश्याम झुलनिया व नाडाचे महासंचालक नवीन अगरवाल यांची नवी दिल्ली येथे भेट घेतल्यानंतर मंडळाचा निर्णय जाहीर केला. बीसीसीआयने आमच्यासमोर तीन मुद्दे ... Read More »

मोईनच्या जागी लिच

>> ‘लॉडर्‌‌स’साठी इंग्लंड संघात बदल ऑस्ट्रेलियाविरुद्ध लॉडर्‌‌स येथे १४ ऑगस्टपासून होणार्‍या दुसर्‍या ऍशेस कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने अष्टपैलू मोईन अली याला वगळले आहे. त्याच्या जागी सॉमरसेटचा डावखुरा फिरकीपटू जॅक लिच याचा १२ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. जेम्स अँडरसन व ओली स्टोन यांना दुखापतीमुळे अपेक्षेप्रमाणे स्थान मिळालेले नाही. एजबेस्टन येथे पहिल्या कसोटीत मोईनला १७२ धावा मोजून केवळ तीन गडी बाद ... Read More »