Daily Archives: August 9, 2019

आभाळ फाटलेय

डिचोली तालुक्यातील साळसह राज्याच्या अनेक भागांमध्ये पूरस्थिती गंभीर बनल्याने शासकीय यंत्रणेला व लोकप्रतिनिधींना जनतेच्या मदतीसाठी धावून जावे लागले. तिळारी धरणातून जादा पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने अनेक गावांमध्ये पूरस्थिती उद्भवल्याचे दिसते आहे. वास्तविक, धरण पूर्ण भरून धोका उत्पन्न होईपर्यंत हे पाणी साठवून का ठेवले जाते व अचानक खालच्या भागांतील गावांतील जनतेला कल्पना न देता त्याचा विसर्ग का केला जातो हे सामान्य ... Read More »

तिहेरी तलाकवरील बंदी स्तुत्य

शंभू भाऊ बांदेकर गोमंतकीय मुस्लीम समाज इतर समाजाशी मिळून मिसळून राहत असतो. या समाजामध्ये तिहेरी तलाकचे प्रमाण जवळजवळ नाही. त्यामुळे तिहेरी तलाक बंदीचे गोमंतकीय मुस्लीम समाज स्वागतच करील… तिहेरी तलाकवर बंदी घालणारे विधेयक लोकसभेबरोबरच राज्यसभेतही मंजूर झाले, ही फार महत्त्वाची आणि स्तुत्य अशी घटना म्हणावी लागेल. दोन्ही सभागृहांमध्ये हे विधेयक संमत होण्यासाठी भाजपासह ज्या ज्या राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला, ते ... Read More »

साळ गावातील ५० घरांना पुराचा तडाखा

>> अजूनही पुराचा वेढा कायम >> मुख्यमंत्री, सभापतींकडून पाहणी >> अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हलविले ३० वर्षांनंतर साळ गावात पूर लोक अजूनही भीतीच्या छायेत सरकारकडून पुरग्रस्तांना मदत तिळारीचे पाणी सोडल्याने पूर देरोडे, सत्तरीत युवक बुडाला राज्यात अनेक ठिकाणी पूर सरकार केंद्राकडे मदत मागणार गेल्या चार दिवसांपासून कोसळणारा मुसळधार पाऊस आणि तिळारी धरणातील पाण्याचा विसर्ग यामुळे साळ गावात बुधवारी रात्री आलेला ... Read More »

दूध, भाजीपाल्याचा तुटवडा

>> गोवा डेअरीचे प्रयत्न अपुरे कोल्हापूर, बेळगाव या भागातील पूरस्थितीमुळे राज्यात दुधाचा पुरवठा होऊ न शकल्याने दुधाचा तुटवडा काल निर्माण झाला. गोवा डेअरीने स्थानिक पातळीवर दुध उत्पादक शेतकर्‍यांकडील चाळीस ते पन्नास हजार लीटर दूध गोळा करून ग्राहकांना उपलब्ध करून दिले. तथापि, गोवा डेअरीचा दुधपुरवठा अपुरा पडल्याने अनेकांना दूध मिळू शकले नाही. राज्यात शेजारील कोल्हापूर, बेळगाव या भागातून भाजीपाला आणि दुधाचा ... Read More »

पूरग्रस्तांसाठी केंद्राकडे पॅकेजची मागणी करणार ः मुख्यमंत्री

गेल्या काही दिवसांपासून कोसळणारा जोरदार पाऊस व पूर यामुळे लोकांची घरे व अन्य मालमत्ता व शेतीचे मोठे नुकसान झालेले आहे. या पार्श्‍वभूमीवर नुकसान झालेल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे मदत निधीची मागणी करणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत सांगितले. त्याशिवाय ज्या ज्या लोकांचे नुकसान झालेले आहे त्यांना मुख्यमंत्री मदत निधीतूनही नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी ... Read More »

विकासाद्वारे काश्मीरमधील दहशतवादाचा बिमोड : मोदी

जम्मू-काश्मीरच्या जनतेचा ३७० कलमामुळे काय ङ्गायदा झाला? याचा कधीच कोणी विचार केला नाही. उलट ३७० कलमामुळे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद, ङ्गुटीरतावाद, घराणेशाही आणि भ्रष्टाचाराला खतपाणीच घातले गेले. जम्मू-काश्मीरमधील तरुणांची माथी भडकावण्यासाठीच पाकिस्तानने ३७० कलमाचा शस्त्रासारखा वापर केला, असा घणाघाती हल्ला करतानाच विकासाच्या माध्यमातूनच आम्ही जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा नायनाट करू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल स्पष्ट केले. ३७० कलम हटविल्याने सरदार वल्लभभाई पटेल, ... Read More »

पंतप्रधानांसमोर म्हादई प्रश्‍न मांडण्याची तयारी : मुख्यमंत्री

सरकार म्हादई पाणी प्रश्‍नी गंभीर आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हादई प्रश्‍नी विशेष याचिका दाखल करून घेतली असून ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे. म्हादईचा प्रश्‍न पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय जलस्रोत मंत्री शेखावत यांच्यासमोर मांडण्याची तयारी ठेवली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व इतरांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना काल दिली. म्हादई प्रश्‍नी कोणत्याही प्रकारची तडजोड ... Read More »

‘सेल्फ लर्निंग’द्वारे शिक्षण व्यवस्थेचा सुवर्णमध्य : डॉ. माशेलकर

जलद तंत्रज्ञान आणि सध्याच्या शिक्षण व्यवस्थेचा सुवर्णमध्य साधण्यासाठी स्वअभ्यास म्हणजेच सेल्ङ्ग लर्निंग गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. व्हायब्रंट गोवा ङ्गाउंडेशनच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष असलेले शास्त्रज्ञ डॉ. माशेलकर व्हायब्रंट गोवा नॉलेज सिरीजच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. ही व्याख्यानमाला राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेत काल गुरुवारी सकाळी झाली. सदर व्याख्यानमाला गोव्यामध्ये १७ ते १९ ऑक्टोबरदरम्यान होणार्‍या व्हायब्रंट गोवा ग्लोबल एक्सपो ... Read More »

कृष्णप्पा गौतमची हॅट्‌ट्रिक

भारत ‘अ’ व वेस्ट इंडिज ‘अ’ यांच्यात सुरु असलेल्या अनौपचारिक कसोटी सामन्यात ऑफस्पिनर कृष्णप्पा गौतम याने काल हॅट्‌ट्रिकची नोंद केली. गौतमने आपल्या २४व्या षटकाच्या दुसर्‍या चेंडूवर सर्वप्रथम रेयमन रिफर याचा वैयक्तिक ५ धावांवर त्रिफळा उडवला. यानंतर पुढील चेंडूवर चेमार होल्डरची यष्टी वाकवली. लगेचच मिगेल कमिन्सला पायचीतच्या सापळ्यात अडकवत हॅट्‌ट्रिक पूर्ण करताना विंडीजचा डाव संपवला. भारत ‘अ’ संघाकडून कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये ... Read More »

हाशिम आमला निवृत्त

दक्षिण आफ्रिकेचा पाकिस्तानी वंशाचा अनुभवी फलंदाज हाशिम आमला याने काल गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. आमलाने आपला निर्णय दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाला कळवला आहे. गेल्या काही महिन्यांत त्याच्या बॅटमधून धावांचा ओघ ओसरला होता. नुकत्याच इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्‍वचषक स्पर्धेतदेखील आमला आपल्या अनुभवाचा फायदा संघाला मिळवून देऊ शकला नव्हता. आफ्रिकेचा संघ या स्पर्धेत गुणतालिकेत शेवटून दुसर्‍या स्थानावर राहिला ... Read More »