Daily Archives: August 7, 2019

कॉंग्रेसची त्रेधा

काश्मीरसंदर्भात नरेंद्र मोदी सरकारने लगावलेल्या मास्टरस्ट्रोकच्या धक्क्यातून कॉंग्रेस अद्याप सावरलेली दिसत नाही. या विषयात नेमकी काय भूमिका घ्यावी याबाबत पक्षात दिसत असलेली संदिग्धता, विविध नेत्यांची परस्परविरोधी विधाने, राज्यसभेतील पक्षाच्या मुख्य प्रतोदांनी व्हीप बजावण्याऐवजी स्वतःच दिलेला राजीनामा आणि काल लोकसभेमध्ये पक्षाच्या वतीने अधीररंजन चौधरींनी अधीर होऊन उधळलेली मुक्ताफळे हे सगळे पाहिले तर कॉंग्रेस या विषयात स्वतःच्याच शवपेटीवर शेवटचे खिळे ठोकत आहे ... Read More »

कलम ३७०, सर्वोच्च न्यायालय व स्वायत्तता

ऍड. दिलीप तौर मोदी सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलून भारतीय संविधानाच्या कलम ३७० खालील काश्मीरचे विशेषाधिकार रद्दबातल करणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या विषयाचे संवैधानिक, न्यायालयीन व राजकीय कंगोरे स्पष्ट करणारा विशेष लेख. ब्रिटिश राजवटीमध्ये एकूण ५६५ राज्यसंस्थाने भारतात अस्तित्वात होती. ही राज्ये त्यांच्या राजांमार्फत चालवली जात असत. ही राज्ये जरी ब्रिटिश राजसत्तेचा भाग नसली तरी ती ब्रिटिश साम्राज्याशी जोडली गेली होती. ... Read More »

विशेष संपादकीय- सौदामिनी

भारतीय राजकारणातील एक तळपती सौदामिनी असेच ज्यांचे वर्णन करावे लागेल अशा भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे अकाली व आकस्मिक निधन हा देशाला फार मोठा धक्का आहे. वयाच्या अवघ्या ६७ व्या वर्षी या जगाचा कायमचा निरोप घेऊन सुषमाजींनी प्रत्येक देशवासीयाला चुटपूट लावली आहे. राजकारणासारख्या आजही पुरुषप्रधान असलेल्या क्षेत्रामध्ये एक स्त्री असूनही स्वतःच्या कर्तृत्वाची नाममुद्रा त्यांनी उमटवली. राष्ट्रीय ... Read More »

सुषमा स्वराज यांचे निधन

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या तथा माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे काल रात्री १० वा.हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ६७ वर्षांच्या होत्या. येथील एम्स इस्पितळात त्यांनी अखेरच्या श्‍वास घेतला त्यावेळी त्यांचे पती व कुटुंबिय तसेच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व भाजप नेते डॉ. हर्षवर्धन उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच ... Read More »

राज्यभरात पूरस्थितीमुळे हाहाकार

>> आज शाळा-कॉलेजना सुट्टी >> पावसाच्या थैमानामुळे नद्यांना पूर >> प्रचंड पडझडीमुळे खासगी, सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान सतत कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे संपूर्ण राज्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने आज बुधवार दि. ७ रोजी राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांसह सर्व शैक्षणिक संस्थांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. सुटीसंबंधीचे परिपत्रक शिक्षण खात्याने काढले असून शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी काल पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. ... Read More »

‘त्या’ सहा नद्यांचे खासगीकरण होऊ देणार नाही ः मुख्यमंत्री

>> एनएच १७ वरील घरांचे योग्य पुनर्वसन करणार राष्ट्रीय महामार्ग १७ या चौपदरीकरण व सहापदरीकरणासाठी ज्या ज्या लोकांची घरे पाडावी लागतील त्या सर्व घर मालकांचे योग्य प्रकारे पुनर्वसन करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पावस्कर यानी काल विधानसभेत दिली. प्रश्‍नोत्तराच्या तासाला प्रवीण झांट्ये यानी यासंबंधीचा प्रश्‍न उपस्थित केला होता. प्रवीण झांट्ये यानी यावेळी ज्या लोकांची घरे वाचवणे ... Read More »

ग्रामीण विकास प्राधिकरणातील काही पदे त्वरित भरणार ः लोबो

ग्रामीण विकास प्राधिकरणाची (आरडीए) गाडी रूळावर आणण्याची गरज असून त्यासाठी आपण त्या खात्यात अभियंत्यांची काही पदे तातडीने डेप्युटेनवर भरणार असल्याचे व खात्यासाठी आवश्यक असलेली वाहने खरेदी करणार असल्याचे खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी काल गोवा विधानसभेत सांगितले. प्रश्‍नोत्तराच्या तासाला आमदार एलिना साल्ढाणा यांनी विचारलेल्या एका प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली. आरडीएच्या दक्षिण गोवा कार्यालयात कनिष्ठ अभियंत्याची पदे रिक्त ... Read More »

ऐतिहासिक विधेयक लोकसभेतही मंजूर

जम्मू – काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेले कलम ३७० रद्द करणारे विधेयक काल लोकसभेतही ३५१ विरुद्ध ७२ अशा मत फरकाने मंजूर करण्यात आले. हे ऐतिहासिक विधेयक सोमवारी राज्यसभेत संमत झाले होते. यावेळी जम्मू – काश्मीरच्या विभाजनाचे विधेयकही ३७० विरुद्ध ७० अशा फरकाने संमत झाले. यामुळे राज्याचे विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहेत. ... Read More »

टीम इंडियाकडून विंडीजला ‘व्हाईटवॉश’

>> शेवटच्या टी-२०तही एकतर्फी विजय >> विराट, ऋषभची नाबाद अर्धशतके >> दीपक चहर चकमला कर्णधार विराट कोहली अणि ऋषभ पंत यांनी अर्धशतकांसह तिसर्‍या विकेटसाठी केलेल्या १०६ धावांच्या भागीदारीच्या जोरावर टीम इंडियाने तिसर्‍या टी-२० लढतीत वेस्ट इंडीजवर ७ गड्यांनी मात करीत मालिका ३-० अशी जिंकत निर्भेळ यश मिळविले. दीपक चहरने आपला दुसराचा सामना खेळताना ३ षट्‌कांत ४ धावां देत ३ बळी ... Read More »

स्मिथची कसोटी क्रमवारीत तिसर्‍या स्थानी झेप

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने काल जाहीर केलेल्या जागतिक कसोटी क्रिकेट क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने फलंदाजांच्या यादीत तिसर्‍या स्थानी झेप घेतली आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपली पहिले स्थान राखले आहे. तर दुसर्‍या स्थानी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आहे. ऑस्ट्रेलियाने बर्मिंगहॅम येथे झालेल्या ऍशेस क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडला २५१ धावांनी पराभूत करीत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामान्यात वर्षभराच्या बंदीनंतर ... Read More »