Daily Archives: August 6, 2019

सोक्षमोक्ष

देशाच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासात कालचा दिवस एक अत्यंत महत्त्वाचा व ऐतिहासिक दिवस ठरला आहे. जम्मू व काश्मीरला भारतीय संविधानाच्या ३७० व्या कलमाखाली दिले गेलेले विशेषाधिकार रद्दबातल करणारा अत्यंत धाडसी आणि तितकाच ऐतिहासिक निर्णय नरेंद्र मोदी सरकारने काल घेतला. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी दिलेल्या आश्वासनाची तर ही परिपूर्ती आहेच, परंतु अगदी जनसंघाच्या काळापासूनच्या मागणीचीही पूर्तता या निर्णयातून होणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ... Read More »

परप्रांतीयांचे प्रस्थ गोमंतकीयांच्या मुळावर

देवेश कु. कडकडे एक माणूस दहा माणसांना घेऊन येतो. हे दहाजण शंभर माणसांना घेऊन येतात. इथेच स्थायिक होतात. पुढे नागरिक बनतात, मतदार वाढतात. त्यांची भक्कम मतपेटी बनते. हळूहळू राजकीय ताकद निर्माण होते. यांचा उद्या आमदारही बनेल. भविष्यात गोव्याची भाषिक अस्मिता, गोंयकारपणा, आमचा सामाजिक सलोखा धोक्यात येण्याचा संभव आहे आणि गोवेकर गोव्यातच अल्पसंख्यांक ठरण्याची भीती आहे. जगात १०० शहरांमध्ये प्रचंड वेगाने ... Read More »

मोदी सरकारचे ऐतिहासिक पाऊल

>> ३७० कलमाखालील काश्मीरचे विशेषाधिकार रद्द >> राज्याचे जम्मू व काश्मीर आणि लडाख अशा दोन संघप्रदेशांत विभाजन जम्मू आणि काश्मीरला भारतीय संविधानाच्या कलम ३७० खाली दिले गेलेले विशेषाधिकार काढून घेण्याचे ऐतिहासिक पाऊल नरेंद्र मोदी सरकारने काल उचलले. त्याच बरोबर जम्मू आणि काश्मीरची भौगोलिक पुनर्रचना करून जम्मू आणि काश्मीरचा राज्याचा दर्जा रद्द करून जम्मू व काश्मीर व लडाख असे दोन केंद्रशासीत ... Read More »

सरकारी व वनखात्याच्या जमिनीवरील अतिक्रमणाची दखल घेणार ः मुख्यमंत्री

राज्यातील वन क्षेत्रातील सरकारी आणि वनखात्याच्या जमिनीवर अतिक्रमणाची गंभीर दखल घेतली जाणार आहे. या जमिनीवर अतिक्रमण झाल्यास राज्यातील वनक्षेत्र नष्ट होण्यास वेळ लागणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले. सांगे तालुक्यातील जैव संवेदनशील विभागातील गावातील जुन्या घरांचे नूतनीकरण, दुरुस्तीवर बंधन घालण्यात आलेले नाही. ङ्गक्त, नवीन घराच्या बांधकामासाठी मुख्य ... Read More »

राज्यात संततधार सुरूच

राज्यात पावसाची संततधार सुरू असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. संततधार पावसामुळे झाडांची पडझड सुरूच आहे. राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मागील चोवीस तासात ४.७२ इंच पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यत ९३ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात मोसमी पाऊस इंचाचे शतक गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे. पर्वरीत तिसर्‍या मांडवी पुलाजवळ ... Read More »

व्यावसायिक अभ्यासक्रमात बदल करणार

>> मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती व्यावसायिक शिक्षण घेणार्‍या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त व्हावा यासाठी व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमात आवश्यक ते बदल घडवून आणण्यात येणार असल्याची माहिती काल शिक्षणमंत्री ह्या नात्याने बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. त्यासाठी कालबाह्य झालेले व्यावसायिक अभ्यासक्रम रद्द करून नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. उच्च शिक्षण संचालनालय, कारागिर प्रशिक्षण व कौशल्य विकास ... Read More »

कंत्राटी, रोजंदारी कामगारांबाबत धोरण तयार करणार ः मुख्यमंत्री

राज्यातील नगरपालिकांमध्ये पाच वर्षे आणि जास्त काळ सेवेत असलेल्या कंत्राटी आणि रोजंदारीवरील कर्मचार्‍यांना सेवेत सामावून घेण्याबाबत धोरण तयार केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत नगरपालिका प्रशासनाच्या अनुदानित पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना काल दिली. पणजी स्मार्ट सिटी मंडळाची पुनर्रचना केली जाणार आहे. स्थानिक आमदार, नगरविकासमंत्री, पणजीच्या महापौरांची मंडळावर वर्णी लावण्यात येणार आहे. यापूर्वी स्मार्ट सिटीच्या ... Read More »

कांगारूंचा इंग्लंडवर २५१ धावांनी विजय

>> ऑफस्पिनर नॅथन लायनचे दुसर्‍या डावात ६ बळी पहिल्या ऍशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लंडचा २५१ धावांनी दारूण पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. तसेच आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील पहिला विजय आपल्या नावे करण्याचा मान मिळविला. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३९८ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. ऑस्ट्रेलियाचे हे आव्हान इंग्लंडला पेलवले नाही आणि ... Read More »

सुवर्ण जयंती योजनेखालील अपूर्ण प्रकल्पांना निधी देणार

>> नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांची माहिती राज्यात सुवर्ण जयंती योजनेखाली अपूर्णावस्थेत असलेले प्रकल्पांना १४ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला जाणार आहे, अशी माहिती नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांनी विधानसभेत नगरपालिका प्रशासन, समाज कल्याण या खात्याच्या अनुदानित पुरवणी मागण्यावरील चर्चेला उत्तर देताना काल दिली. वर्ष २०११ मध्ये सुवर्ण जंयती योजनेखाली कला व संस्कृती खात्यातर्ङ्गे नगरपालिकांना विशेष प्रकल्प उभारणीसाठी खास ... Read More »

पॅरिश यूथ नुवेला कुस्तोदिओ फुटबॉल चषक

मायरॉन बॉर्जीसच्या शानदार हॅट्‌ट्रिकच्या जोरावर पॅरिश यूथ नुवेने अंतिम सामन्यात आंबेली स्पोर्ट्‌स क्लबचा ३-० अशा गोलफरकाने पराभव करीत राय स्पोर्टिंग क्लब आयोजित ४८व्या कुस्तोदिओ स्मृती आंतरग्राम फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. रायच्या पंचायत मैदानावर खेळविण्यात आलेल्या या समान्यावर वर्चस्व मिळविताना पॅरिश यूथ नुवेने १२व्याच मिनिटाला मायरॉन बॉर्जीने नोंदविलेल्या गोलमुळे आपले खाते खोलले. दुसर्‍या सत्रात ६९व्या मिनिटाला मायरॉनने संघाला २-० अशा आघाडीवर ... Read More »