ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: August 5, 2019

दूरचित्रवाणी माध्यमांच्या विश्वाची सफर ‘द मेकिंग ऑफ स्टार इंडिया’

एडिटर्स चॉइस –  परेश प्रभू वरवर पाहता हे पुस्तक भारतात पाय रोवलेल्या एका विदेशी दूरचित्रवाणी समूहाविषयी आहे असे जरी भासले, तरी प्रत्यक्षात तो भारतीय दूरचित्रवाणी माध्यमाच्या प्रांतातील मूलगामी स्थित्यंतरांचाच जणू इतिहास आहे. भारतीय दूरचित्रवाणी वाहिन्यांचा चढउतारांचा प्रवास अतिशय समर्थपणे त्यात चित्रित करण्यात आला आहे. कौन बनेगा करोडपती खरे तर ‘कौन बनेगा करोडपती’ हे ‘हू वॉंटस् टू बी अ मिलिअनेर’ या ... Read More »

ई-वाहनांना प्रोत्साहन ः शासनाचे योग्य पाऊल!

 शशांक मो. गुळगुळे आपल्या देशाच्या निर्यातीपेक्षा आयातीचे प्रमाण जास्त होते. हे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य नाही. ही आयात कमी व्हावी, देशाचे परकीय चलन वाचावे या हेतूने भारत सरकार ई-वाहनांना प्रोत्साहन देत आहे.   ई-वाहनांना प्रोत्साहन देणारे धोरण केंद्र सरकारने आखले आहे. हे एक शासनाने उचललेले योग्य पाऊल मानावे लागेल. केंद्रीय अर्थमंत्र्यांनीही २०१९-२०२० या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना केंद्र शासन ... Read More »

जीवनाचे मार्गदर्शक ः प्राचार्य द. भ. वाघ

 डॉ. सोमनाथ कोमरपंत कृतिशील पावले टाकणे हा तर प्राचार्य द. भ. वाघसरांचा स्थायी भाव… त्यांच्या मानवतावादी दृष्टिकोनामुळे, असामान्य बुद्धिमत्तेमुळे आणि प्रशासकीय कुशलतेमुळे गोमंतकाच्या जनमानसात त्यांच्याविषयी अनेकांच्या मनात आदराची भावना निर्माण झाली. प्राचार्य द. भ. वाघसरांसंबंधी यापूर्वी अनेकदा अनेक कारणांमुळे लिहिणे झाले आहे. तरी त्यांच्या आठवणी पुनः पुन्हा जागवाव्याशा वाटतात. एक तर माझ्या भावजीवनात त्यांचे महत्त्वाचे स्थान आहे. ते माझे श्रद्धास्थान. ... Read More »