Daily Archives: August 5, 2019

सरकारने ठाम राहावे

गोवा माईल्स या गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या मोबाईल ऍप आधारित टॅक्सीसेवेच्या विरोधात राज्यातील पर्यटक टॅक्सीचालकांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे सध्या पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे. परंतु सरकारने घेतलेली ठाम भूमिका पूर्णपणे रास्त आहे आणि या घडीस जनतेने गोवा माईल्स आणि सरकारच्या पाठीशी राहण्याची गरज आहे. आम्ही ही भूमिका सुरवातीपासून मांडत आलो आहोत आणि आजही त्यावर ठाम आहोत. टॅक्सीचालकांच्या दांडगाईच्या दबावाला ... Read More »

भाजपा – सेनेवर राजकारण्यांची अतिवृष्टी

ल. त्र्यं. जोशी भाजपा आता केवळ कार्यकर्ताधिष्ठित पक्ष राहिला नसून तो जनाधिष्ठित पक्ष बनला आहे. आणि लोकशाहीत तेच अपेक्षितही आहे. पक्ष केवळ कार्यकर्ताधिष्ठित असणे ही काही लोकशाहीत भूषणावह बाब समजता येणार नाही. त्याचा जनाधार वाढण्यासाठी प्रयत्न तर अखंड सुरुच असतो व तो तसा व्हायलाही पाहिजे.. महाराष्ट्र सध्या अतिवृष्टी आणि महापूर यांनी ग्रस्त आणि त्रस्त असला तरी विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर ... Read More »

वादळीवार्‍यासह राज्यात मुसळधार पाऊस

>> चोवीस तासांत साडेतीन इंच पाऊस; कोकण रेल्वेच्या काही गाड्या रद्द राज्यातील विविध भागांना वादळी वार्‍यासह जोरदार पावसाने काल झोडपून काढले. शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर कायम आहे. वादळी वार्‍यामुळे झाडांच्या पडझडीच्या घटनांची नोंद झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. येथील अग्निशामक दलाच्या मुख्य कार्यालयाकडे रविवारी सकाळपासून पडझडीच्या ९५ पेक्षा जास्त घटनांची नोंद झाली आहे. येथील हवामान विभागाने केसरी ... Read More »

भाजपच्या प्राथमिक सदस्यता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

>> आत्तापर्यंत १.८० लाखांची नोंदणी ः तानावडे भाजपच्या प्राथमिक सदस्यता मोहिमेला चांगला प्रतिसाद लाभत असून आत्तापर्यंत १ लाख ८० हजार प्राथमिक सदस्यांची नोंदणी करण्यात आली आहे, अशी माहिती भाजपचे सरचिटणीस तथा सदस्यता नोंदणी मोहिमेचे प्रमुख सदानंद शेट तानावडे यांनी भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल सांगितले. भाजपच्या प्राथमिक सदस्यता मोहिमेला ६ जुलैपासून सुरूवात करण्यात आली आहे. सदस्य नोंदणीसाठी ऑन लाईन ... Read More »

काश्मीरप्रश्‍नी अमित शहा-डोवाल बैठक

>> राजकीय घडामोडींना वेग, नागरिकांत संभ्रम काश्मीरमध्ये सुरू असलेल्या लष्करी हालचाली आणि मागवण्यात आलेला मोठा ङ्गौजङ्गाटा या पार्श्‍वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि इतर वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत गृहसचिव राजीव गौबा हेसुद्धा उपस्थित होते. या बैठकीत काश्मीर प्रश्नावर चर्चा होऊन पुढील रणनीती ठरवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ही बैठक संपल्याबरोबर जम्मू-काश्मीरचे ... Read More »

टुरिस्ट टॅक्सी व्यावसायिकांचा तिसर्‍या दिवशीही संप सुरू

राज्यातील टुरिस्ट टॅक्सी व्यावसायिकांचा टॅक्सी बंद संप तिसर्‍या दिवशी सुरूच होता. टुरिस्ट टॅक्सी आणि काळ्या पिवळ्या टॅक्सी व्यावसायिकांनी रविवारी करमळी ओल्ड गोवा येथे सभा घेऊन गोवा माईल्स ऍप रद्द होईपर्यंत संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या बुधवारपर्यंत गोवा माईल्स ऍप रद्द करावे, अशी मागणी केली आहे. सरकारने येत्या बुधवारपर्यंत गोवा माईल्स ऍप रद्द न केल्यास गुरूवारी टॅक्सी परवाने वाहतूक ... Read More »

गोवा माईल्स ऍपला भाजपचा पूर्ण पाठिंबा

>> पत्रकार परिषदेत दामोदर नाईक यांची माहिती गोवा माईल्स या ऍप आधारित टॅक्सी सेवा प्रकरणी भाजपचा सरकारला पूर्ण पाठिंबा आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ऍप आधारिक टॅक्सी सेवेबाबत घेतलेली भूमिका योग्य आहे. गोव्याची टॅक्सी सेवेच्या प्रश्‍नावरून देश-विदेश पातळीवर होणारी बदनामी टाळण्यासाठी ऍप आधारित टॅक्सी सेवा आवश्यक आहे, अशी प्रतिपादन भाजपचे सरचिटणीस दामोदर नाईक यांनी भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ... Read More »

भारताची विंडीजवर २२ धावांनी मात

>> रोहित शर्माचे अर्धशतक >> पावसामुळे थांबवावा लागला होता सामना भारताने दुसर्‍या टी-ट्वेंटी सामन्यात वेस्ट इंडीज डकवर्थ लुईस पद्धतीद्वारे २२ धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. सदर सामना गडगडाट, विजेचा लखलखाट व पावसामुळे थांबविण्यात आला होता. त्यावेळी विंडीजने १५.३ षटकांत ४ बाद ९८ धावांपर्यंत मजल मारली होती. परंतु, ‘डीएलएस’च्या आधारे त्यांचा संघ पिछाडीवर होता. पुढे ... Read More »

इंग्लंडसमोर ३९८ धावांचे आव्हान

येथे सुरू असलेली पहिली ऍशेस कसोटी जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर ३९८ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. स्टीव स्मिथ व मॅथ्यू वेडच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव ७ बाद ४८७ धावांवर घोषित केला. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक ३, तर मोईन अलिने २ आणि ब्रॉड व वोक्सने प्रत्येकी १ बळी घेतला. चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने ७ षटके सावधरित्या खेळून काढत एकही गडी ... Read More »

आला श्रावण…

– मीना समुद्र या रसरंगनादगंधाच्या दुनियेत चराचर गुंगून गेले आहे. मखमली हिरवाईवर पाय रोवीत, इंद्रधनूच्या कमानीखालून येताना तृणपात्यांना आंजारीत अन् डोळे उघडून टुकूटुकू बघणार्‍या रंगीबेरंगी असंख्य रानफुलांना गोंजारीत आता श्रावण आला आहे. क्षणात येणारे सरसर शिरवे अन् क्षणात पडणारे ऊन मिरवीत श्रावण आला आहे… ग्रीष्म ऋतूच्या अंती आकाशाचे घनव्याप्त आभाळ झाले आणि बराच काळ ओठंगून, ओथंबून राहिलेले आषाढघन धरणीच्या अनावर ... Read More »