Daily Archives: August 3, 2019

लक्ष काश्मीरकडे

काश्मीर खोर्‍यातील अमरनाथ यात्रेच्या मार्गावर स्फोटके आणि शस्त्रास्त्रे आढळून आल्याने ते कारण देत तूर्त ही यात्रा स्थगित करून यात्रेकरू आणि पर्यटकांना काश्मीर खोरे सोडण्याचे आदेश सरकारने काल जारी केले. यंदाची अमरनाथ यात्रा कडेकोट सुरक्षेत आतापर्यंत सुरळीत सुरू होती. त्यामुळे दहशतवादी संघटना आणि त्यांचे पाकिस्तानी पाठीराखे यांच्यात अस्वस्थता निर्माण झाल्यानेच अशा प्रकारची एखादी मोठी घातपाती कारवाई करण्याचा त्यांचा बेत असावा. सुदैवाने ... Read More »

संरक्षणदले आणि ऊर्जा क्षेत्र

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) जगात ऊर्जेची फार मोठी गरज भासू लागते त्यावेळी राष्ट्रांवर कमी किमतीत, पर्यावरणाला धक्का न लागू देता आणि ऊर्जेची सुरक्षा ध्यानात ठेवून, ऊर्जेची नवी क्षेत्रे, नवी साधने, नवीन उगमस्थाने शोधावी लागतात. जगभरातील संरक्षणदले आजमितीला त्यांच्या देशांसमोर उभ्या ठाकलेल्या या आव्हानांचा सामना करून ऊर्जा वाचवण्यासाठी देशाला मदत करू शकतात. भारतही याला अपवाद नाही. कुठल्याही देशाची आर्थिक प्रगती त्याच्या ... Read More »

अमरनाथ यात्रेकरू, पर्यटकांना काश्मीर सोडण्याच्या सूचना

>> पाकस्थित दहशतवाद्यांचा यात्रेकरूंवर हल्ल्याचा कट ः लष्कराची माहिती अमरनाथ यात्रेकरू आणि पर्यटक यांना तात्काळ काश्मीर सोडण्याची सूचना जम्मू काश्मीर सरकारने केली आहे. अमरनाथ यात्रेकरूंवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याच्या माहितीवरून जम्मू-काश्मीर सरकारने यात्रेकरू व पर्यटकांना माघारी परतण्यासाठी व्यवस्था करत तात्काळ काश्मीरमधून बाहेर पडण्याची सूचना केली आहे. दरम्यान, भारतीय लष्कराने काल पत्रकार परिषदेत दावा केला की पाकस्थित दहशतवादी अमरनाथ यात्रेवर हल्ला ... Read More »

मच्छीमारीतील गैरव्यवहार ः नवीन कायद्यावर सरकारचा विचार

राज्यात मच्छीमारी क्षेत्रातील वाढते गैरप्रकार रोखण्यासाठी मच्छीमारी कायद्यात दुरुस्तीची गरज आहे. मच्छीमारी कायद्यातील दुरुस्ती गैरप्रकार रोखण्यासाठी पुरेशी नसल्याचे आढळून आल्यास नवीन कायदा करण्यावर विचार केला जाणार आहे, अशी माहिती मच्छीमारी मंत्री ङ्गिलीप नेरी रॉड्रीगीस यांनी विधानसभेत मच्छीमारी, जलस्रोत व वजन व माप खात्याच्या अनुदानित मागण्यावरील चर्चेला उत्तर देताना काल दिली. मालिम जेटीवरील बेकायदा गोष्टींची गंभीर दखल घेतली जाणार आहे. सरकारकडून ... Read More »

कर्करुग्णांच्या उपचार खर्चाबाबत आघाडीच्या इस्पितळांशी करार करणार

गोवा विधानसभेत आमदारांनी काल राज्यातील वाढत्या कर्करोग रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली. सरकार राज्यातील वाढत्या कॅन्सर रुग्णांच्या संख्येबाबत गंभीर आहे. कॅन्सरचे वेळीच निदान आणि जनजागृतीवर भर दिला जात आहे. तसेच कॅन्सर रुग्णांना योग्य उपचार मिळवून देण्यासाठी मुंबई, बंगलोर येथील आघाडीच्या कॅन्सर हॉस्पिटलाशी समझौता करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. मुंबई येथील टाटा हॉस्पिटलमध्ये गोमंतकीय कॅन्सर रुग्णांना भेडसावणारी आर्थिक समस्या सोडविण्यासाठी ... Read More »

ऊस उत्पादकांना मुख्यमंत्र्यांची ‘संजीवनी’बाबत ग्वाही

संजीवनी सहकारी साखर कारखाना बंद केला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील ऊस उत्पादकांच्या एका शिष्टमंंडळाला काल दिली. शिष्टमंडळाने पर्वरी येथे मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेऊन संजीवनी साखर कारखान्याच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा केली. यावेळी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, सहकार मंत्री गोविंद गावडे, सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांची उपस्थिती होती. साखर कारखाना बंद करण्याचे उद्देश नाही. त्यामुळे ऊस ... Read More »

टीम इंडियाला विंडीजचे आव्हान

भारताच्या वेस्ट इंडीज दौर्‍याला आजपासून प्रारंभ होणार आहे. तीन टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज फ्लोरिडा येथे खेळविला जाणार आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांचा विचार केल्यास विंडीजचा हा सर्वांत आवडता प्रकार असून भारताला मात्र हा प्रकार आंतरराष्ट्रीय पातळीवर फारसा भावलेला नाही. तरीसुद्धा विंडीजचा संभाव्य विजेते म्हणून संबोधणे योग्य ठरणारे नाही. खेळपट्टीचे पाटा स्वरूप भारतीय खेळाडूंचा फॉर्म पाहता सामना अटीतटीचा होणे अपेक्षित ... Read More »

भारताला कांस्यपदक

सात वर्षांपूर्वी रशियातील आयएएएफ वर्ल्ड रेस वॉकिंग कप स्पर्धेतील पदक थोडक्यात हुकल्यानंतर भारतासाठी काल आनंदाची बातमी आली. या स्पर्धेत द्वितीय स्थानावर राहिलेल्या युक्रेनच्या संघातील एक सदस्य उत्तेजक चाचणी दोषी आढळल्यामुळे त्यांचे पदक हिसकावण्यात आले आहे. त्यामुळे चौथ्या स्थानावर राहिलेल्या भारताला कांस्यपदक मिळाले आहे. भारतीय संघात के.टी. इरफान, बाबूभाई पानुचा व सुरिंदर सिंग यांचा समावेश होता. २०१२ साली मे महिन्यात सारान्स्क ... Read More »

सत्तरी ः सांस्कृतिक शोधयात्रा

 विनायक विष्णू खेडेकर शेष गोव्याहून अलग विधी-विधानांचे आचरण, आविष्करण अभ्यासानंतर प्रश्‍न पडावा. सत्तरी प्रांत संास्कृतिकदृष्ट्या गोव्यातच आहे का? ‘घुमट वाजते तो गोवा’ याच चालीवर ‘रणमाले’ लोकनाट्य होते ती सत्तरी? कोणत्याही भूप्रदेशाची राजकीय वा महसुली सरहद्द सांस्कृतिक सीमारेषांहून भिन्न असते. हा सिद्धांत सोयिस्करपणे बाजूला ठेवल्यामुळेच भारताच्या विविध भागांतील सीमावाद, प्रांतवाद आजही धगधगत आहेत. सांस्कृतिक चतुःसीमा निर्धारित करण्यासाठी त्या भागातील लोकस्तरावर नांदणारी ... Read More »

सल्ले ऐकावे जनाचे …

सरिता नाईक (फातोर्डा-मडगाव) एकाच गोष्टीसाठी दहा जण दहा प्रकारचे सल्ले देतात आणि गोंधळून जायला होतं. काही सल्ले तर एकमेकांच्या अगदी विरुद्ध असतात. एक डॉक्टर म्हणतात, जेवताना पाणी पिऊ नये तर दुसरे डॉ. म्हणतात जेवताना मध्ये मध्ये घोट घोट पाणी प्यायला हवं!! दुसर्‍यांना सल्ले देणे ही सर्वांत सोपी गोष्ट आहे. जो तो दुसर्‍यांना सल्ले देत असतो. बचतीविषयक सल्ले, शिक्षण विषयक सल्ले, ... Read More »