Daily Archives: August 2, 2019

न्याय आहे!

उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील कथित बलात्कार प्रकरणाची काल सर्वोच्च न्यायालयाने ज्या कणखरपणे दखल घेत धडाधड महत्त्वपूर्ण आदेश जारी केले, ते न्यायदेवतेचे ठाम पाऊल देशातील कोट्यवधी नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ करणारेच ठरेल. उन्नाव प्रकरणात गेली दोन – तीन वर्षे ज्या काही उलटसुलट बातम्या येत राहिल्या, त्यातून त्या प्रकरणाच्या सत्यासत्यतेविषयी शंका निर्माण झाल्या होत्या, परंतु त्या बलात्कारित पीडितेला नुकत्याच झालेल्या अपघाताच्या विलक्षण ... Read More »

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जन्मशताब्दी

शंभू भाऊ बांदेकर लोकशाहीर तथा जनगायक अण्णा भाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात भरीव योगदान दिले होते. राष्ट्र कार्यात झोकून देतानाच समाजप्रबोधनासाठी त्यांनी साहित्य निर्मिती केली. छळवणूक आणि पिळवणूक झालेल्या माणसांच्या व्यथा वेदनांना त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून आवाज दिला. लोकशाहीर सुप्रसिद्ध साहित्यिक आणि जनगायक, जननायक म्हणून ख्यातकीर्त पावलेले तुकाराम भाऊराव साठे तथा अण्णाभाऊ साठे यांची काल १ ऑगस्ट पासून जन्मशताब्दी ... Read More »

महिलांना रात्रपाळीत काम ः विधेयक मंजूर

गोवा विधानसभेत महिलांना खासगी उद्योगांत रात्र पाळीत काम करण्यासाठी मान्यता देणारे कारखाने दुरूस्ती विधेयक २६ विरुद्ध ५ मतांनी काल मंजूर करण्यात आले. कारखाने व बाष्पक मंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी सदर दुरुस्ती विधेयक मांडले. विरोधी कॉँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी हे विधेयक महिला विरोधी असल्याचा आरोप करून चिकित्सा समितीकडे पाठविण्याची मागणी केली. तथापि महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक १७ नियम तयार करण्यात येणार आहेत अशी ... Read More »

वाढत्या चोर्‍यांप्रकरणी पोलिसांना सतर्कतेचे आदेश ः मुख्यमंत्री

राज्यातील विविध भागातील वाढत्या चोर्‍यांची दखल घेऊन पोलीस यंत्रणेला सतर्क करण्यात आहे. भाडेकरू आणि परराज्यातून येणार्‍या लोकांची १०० टक्के पडताळणी करण्याची सूचना पोलिसांना करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत काल दिली. रोहन खंवटे यांनी पर्वरी मतदारसंघातील चोर्‍यांचा प्रश्‍न शून्य तासाला उपस्थित केला होता. त्यावर बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, घरमालकांनी भाडेकरूची नोंदणी पोलिसांकडे केली ... Read More »

उन्नाव पीडितेला २५ लाख रु. अंतरीम भरपाई देण्याचे आदेश

>> सीआरपीएफच्या सुरक्षेचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश उन्नाव (उत्तर प्रदेश) बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीला अंतरीम भरपाई म्हणून २५ लाख रु.ची रक्कम देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने काल उत्तर प्रदेश सरकारला दिले. तसेच उत्तर प्रदेशचा भाजप आमदार कुलदिप सेनगर या आरोपीसह उत्तर प्रदेशमधील न्यायालयातील संबंधित सर्व पाच प्रकरणे दिल्लीतील न्यायालयात पाठवण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. बलात्कार पीडित तरुणीच्या कारवर ट्रक घालून तिला ... Read More »

गोवा ३१ ऑगस्टपर्यंत खुले शौचमुक्त राज्य

>> मुख्यमंत्री ः १५ ऑगस्टपासून गरजूंना बायोटॉयलेटचे वितरण गोवा राज्य ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत खुल्यावर शौचमुक्त (ओडीएङ्ग) राज्य घोषित करण्यात येणार आहे. राज्यातील गरजू नागरिकांना बायो टॉयलेट वितरण करण्याचे काम येत्या १५ ऑगस्टपासून सुरू केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत काल दिली. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या बायो टॉयलेटच्या प्रश्‍नावर बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ... Read More »

ऍप आधारीत टॅक्सी सेवेला टुरिस्ट टॅक्सीवाल्यांचा विरोधच

राज्यातील टूरिस्ट टॅक्सी मालकांचा गोवा माईल्स या ऍपआधारित टॅक्सी सेवेला विरोध कायम असून गोवा माईल्स ऍप रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत, अशी माहिती अखिल गोवा टॅक्सी मालक संघटनेचे अध्यक्ष चेतन कामत यांनी काल दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन आमची भूमिका मांडलेली आहे. गोवा विधानसभेत तीन तास चर्चा करण्यात आल्यानंतर ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री डॉ. सावंत ... Read More »

राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय

राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील शिक्षणात आमूलाग्र बदल केला जाणार आहे. येत्या एक – दोन वर्षात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला प्रारंभ केला जाणार आहे. मोपा विमानतळाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्याने विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे काम आणखी एक वर्ष लांबणीवर पडणार असून सप्टेंबर २०२० ऐवजी सप्टेंबर २०२१ मध्ये पूर्ण होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. ... Read More »

स्मिथने दाखवला इंग्लंडला इंगा!

>> ८ बाद १२२ वरून ऑस्ट्रेलियाची मजल २८४ पर्यंत ऍशेस कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पहिला दिवस ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथने गाजवला. संकटमोचनाची भूमिका पार पाडताना स्मिथने संघाला २८४ धावांपर्यंत पोहोचवत १४४ धावांची धीरोदात्त खेळी केली. संघ ८ बाद १२२ असा चाचपडत असताना तळातील दोन खेळाडूंनी हाताशी धरून स्मिथने इंग्लंडच्या तोंडाला फेस आणला. नाणेफेकीचा कौल जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन ... Read More »

प्रणिथचा उपउपांत्य फेरीत प्रवेश

सायना नेहवाल, किदांबी श्रीकांत, एचएस प्रणॉय यांना काल गुरुवारी थायलंड ओपन वर्ल्ड टूर सुपर ५०० स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. पुरुष एकेरीत बी. साई प्रणिथ याने आगेकूच करताना उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. दोन महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर स्पर्धात्मक बॅडमिंटनमध्ये पुनरागमन केलेल्या सायना नेहवालला जपानच्या बिगरमानांकित सायाका ताकाहाशी हिने २१-१६, ११-२१, १४-२१ असे पराजित केले. सायनाच्या पराभवामुळे भारताचे महिला एकेरीतील आव्हान काल आटोपले. ... Read More »