Daily Archives: August 1, 2019

पुढच्यास ठेच..

‘कॅफे कॉफी डे’च्या माध्यमातून कॉफीला प्रतिष्ठा आणि व्यावसायिक मोल मिळवून देणारे बी. जी. सिद्धार्थ यांच्यावर आत्महत्येची वेळ ओढवणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. व्यवसायात आपण अपयशी ठरलो, आपल्यावर कर्जदात्यांचा दबाव होता, आयकर विभागाकडून आपला छळ होत होता, त्यामुळे आपण हा तणाव सहन करू शकत नाही अशा आशयाचे पत्रही त्यांच्या घरी आढळले आहे. वरवर पाहता सफल भासणार्‍या एखाद्या व्यवसायाच्या मुळाशी किती ... Read More »

भारताचा सन्मान, पाकिस्तानला चपराक

शैलेंद्र देवळणकर भारत-अमेरिका संबंध दिवसेंदिवस सुधारत चालले आहेत. यामुळे रशिया काहीसा भारतावर नाराजही आहे. असे असताना मॉस्को परिषदेसाठी भारताला आमंत्रण देऊन रशियाने पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली आहे. पाकिस्तानसाठी इशाराच आहे; पण त्यातून पाकिस्तान कोणताही धडा घेणार नाही हे उघड आहे. चार ते सहा सप्टेंबर या काळात रशियातील मॉस्को शहरामध्ये ईस्टर्न इकोनॉमिक ङ्गोरम ह्या संघटनेची बैठक पार पडणार आहे. या ... Read More »

राज्याचे कामगार धोरण सहा महिन्यात

राज्य सरकारचे कामगार आणि रोजगार धोरण येत्या सहा महिन्यात तयार करण्यात येणार आहे. हे धोरण तयार करताना आमदारांना विश्‍वासात घेण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत आलेक्स रेजिनाल्ड यांच्या एका प्रश्‍नाला उत्तर देताना दिली. राज्यातील खासगी उद्योगांमध्ये स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार धोरण तयार करण्याची गरज आहे. राज्याचे रोजगार धोरण नसल्याने खासगी ... Read More »

मोटर वाहन कायदा दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर

मोटर वाहन कायदा १९८८ मध्ये सुधारणा करणारे विधेयक काल राज्यसभेत संमत करण्यात केंद्र सरकारला यश आले. रस्ता अपघातांमध्ये मानवी बळी जाणार्‍या देशांमध्ये भारत आघाडीवर असल्याचे चित्र बदलण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी सातत्याने मतप्रदर्शन करत होते. हे दुरुस्ती विधेयक गेल्या २३ रोजी लोकसभेत संमत झाले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यात आल्याने याबाबतचा कायदा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे ... Read More »

एनओसीअभावी राज्यातील ४१ विकासकामे रखडली

गोवा पर्यटन विकास महामंडळ आणि पर्यटन खात्याची सुमारे ४१ विकासकामे केवळ ना हरकत दाखल्याच्या (एनओसी) अभावामुळे रखडली आहेत. किनारी व्यवस्थापन आराखडा तयार न केल्यास किनारी भागातील विकास कामावर विपरीत परिणाम होणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांनी विधानसभेत सुदिन ढवळीकर यांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना काल दिली. पर्यटन खाते आणि पर्यटन विकास महामंडळाने विकासकामे तयार करण्यापूर्वी संबंधितांकडून ना हरकत ... Read More »

गेल्या ५ वर्षांत राज्यात केवळ २२ उद्योग आले

>> आयडीसीचे २७ भूखंड कर्मचार्‍यांना ः कामत राज्यात वर्ष २०१४ ते २०१९ या काळात केवळ २२ नवीन उद्योग आले आहेत. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने (आयपीबी) १७९ प्रकल्पांना मान्यता दिलेली आहे. त्यातील ५८ प्रकल्प कार्यान्वित झाले आहे. कार्यान्वित झालेल्या प्रकल्पांपैकी २८ प्रकल्पांत केवळ विस्तारीत प्रकल्प आणि ६ हॉस्पिटॅलिटी प्रकल्पाचा समावेश आहे, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत बोलताना ... Read More »

लवकरच नवीन औद्योगिक धोरण

>> आयडीसीच्या २७ भूखंडांची चौकशी करणार ः विश्‍वजित राज्यातील सुनियोजित औद्योगिक विकासासाठी नवीन औद्योगिक धोरण तयार करण्यात येणार आहे. उद्योग खाते, गोवा गुंतवणूक विकास मंडळ आणि औद्योगिक विकास महामंडळ यांनी एकत्र येऊन उद्योगातील गुंतवणूक वाढविण्यासाठी नियोजनबद्ध काम केले जाणार आहे, अशी ग्वाही उद्योग, कौशल्य विकास मंत्री विश्‍वजित राणे यांनी गोवा विधानसभेत उद्योग, कौशल्यविकास, आरोग्य व इतर खात्याच्या अनुदानित मागण्यावरील चर्चेला ... Read More »

‘कॅफे कॉफी डे’च्या सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला नेत्रावती नदीत

कॅफे कॉफी डे कंपनीचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मंगळुरू येथील नेत्रावती नदीत बुडून मृत्यू झाला. सोमवारी संध्याकाळी उशिरा सिद्धार्थ बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या शोधासाठी शासकीय पातळीवरून मोठी मोहीम राबविण्यात आली होती. मात्र काल सकाळी ६.३० वा. त्यांचा मृतदेह नेत्रावती नदीत तरंगताना तेथील मच्छीमारांना आढळून आला अशी माहिती मंगळुरूचे पोलीस आयुक्त शशिकांत सेंथिल यांनी पत्रकारांना दिली. सिद्धार्थ यांच्यावर काल संध्याकाळी चिकमंगळूर ... Read More »

ऍपआधारीत टॅक्सी सेवेला सरकारचे प्राधान्य ः मुख्यमंत्री

>> चर्चेवेळी कामत, रेजिनाल्डचा बहिष्कार ऍप आधारित टॅक्सी ही काळाची गरज आहे. टुरिस्ट टॅक्सी व्यावसायिकांनी तीन महिने गोवा माईल्सचा अनुभव घ्यावा. स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांच्या हिताचे रक्षण केले जाणार असून त्याना आवश्यक व्यवसाय मिळवून देण्याची तयारी आहे. परंतु, ज्यांना गोवा माईल्स नको त्यांनी स्वतःच्या टॅक्सी ऍप तयार करावा. त्यांना सरकारकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल. राज्यात ऍप आधारित टॅक्सी सेवेला प्राधान्य ... Read More »

ऍशेस मालिका आजपासून

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात आजपासून ऍशेस कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. १ ऑगस्ट ते ५ ऑगस्टदरम्यान पहिला सामना खेळला जाणार आहे. या सामन्याद्वारे आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेलादेखील प्रारंभ होणार आहे. यजमान इंग्लंडने कसोटीच्या पूर्वसंध्येलाच आपला अंतिम ११ जणांचा संघ जाहीर केला असून वर्ल्डकप गाजवणारा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला या संघात स्थान देण्यात आलेले नाही. संघाचा योग्य समतोल राखण्यासाठी ख्रिस वोक्सला ... Read More »