Monthly Archives: August 2019

फाईव्ह ट्रिलियन’च्या दिशेने

अनेक नव्या क्षेत्रांमध्ये विशिष्ट मर्यादेपर्यंत थेट विदेशी गुंतवणुकीला मंजुरी देऊन केंद्र सरकारने आर्थिक उदारीकरणाच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये विविध क्षेत्रे विदेशी गुंतवणूकदारांना खुली करण्याचा मोठा दबाव सरकारवर होता, त्याला अनुसरून हा निर्णय घेतला गेला आहे. सिंगल ब्रँड रीटेल, डिजिटल मीडिया आणि उत्पादन क्षेत्राचा त्यामध्ये समावेश आहे. मंदीच्या वातावरणात मरगळलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला नवी संजीवनी देण्यास या ... Read More »

आण्विक तत्त्वप्रणाली बदलताना…

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी भारताच्या ‘नो ङ्गस्ट यूज’ या आण्विक धोरणाचा पुनर्विचार केला जाऊ शकतो असं वक्तव्य केल्यामुळं देशभरासह जगभरात खळबळ उडाली आहे. तथापि, प्रथम हल्ला प्रणालीचा अंगीकार करण्याआधी भारतीय अण्वस्त्रांच्या वापरातील संसाधन त्रुटी कमी करण्याची नितांत आवश्यकता आहे. ‘आम्ही अण्वस्त्रांचा प्रथम वापर करणार नाही’ हे आश्वासन देत १९९८ मध्येच अटलजींनी पोखरणमध्ये भारताला अण्वस्त्र समर्थ ... Read More »

दहा सरकारी बँकांचे विलिनीकरण होणार

कॅनरा, युनायटेड, सिंडिकेट व आंध्रा बँकेचे विलिनीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याचे केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल पत्रकार परिषदेत जाहीर केले. सरकारच्या निर्णयानुसार एकूण १० बँकांचे विलिनीकरण या चार बँकांमध्ये केले जाणार आहे. यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील (पीएसयू) बँकांची संख्या २७ वरून १२ होणार आहे. मात्र या बँकांच्या कर्मचार्‍यांत कपात केली जाणार नाही असे सीतारमण यांनी स्पष्ट केले. देशाची ... Read More »

गुळेलीत आयआयटी केंद्र उभारणार

राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत राज्याच्या शॅक धोरणाला मंजुरी देण्यात आली. जे शॅकचालक गेल्या कित्येक वर्षांपासून किनार्‍यावर शॅक्स घालत आहेत त्यांना शॅक्स घालण्यासाठी प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच गुळेली येथे आयआयटी केंद्र उभारण्यास मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. काणकोण, सांगे येथे हे इन्स्टिट्यूट उभारण्यास विरोध झाल्यानंतर ते सत्तरी येथे हलवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ज्येष्ठतेनुसार १० वर्षांसाठी, ५ वर्षांसाठी ... Read More »

पणजीत कार पार्किंग शुल्क ताशी २० रुपये

पणजी महानगरपालिका क्षेत्रात पाच मार्गांवरील सशुल्क पार्किंगसाठी चार चाकी वाहनांसाठी पार्किंग शुल्क वाढविण्यात आले असून कारगाडी प्रति तास २० रुपये आणि पुढील प्रत्येक तासासाठी १५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. जिल्हा दंडाधिकार्‍यांनी जुन्य दरानुसार सशुल्क पार्किंगसाठी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेमध्ये आवश्यक दुरुस्ती करून घेतली जाणार आहे, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. १८ जून ... Read More »

पूरग्रस्तांसाठी १७० कोटी रु.ची केंद्राकडे मागणी करणार ः मुख्यमंत्री

  राज्यातील पूरग्रस्तांसाठी गोवा सरकार केंद्राकडे १७० कोटी रु. ची मागणी करणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सांगितले. ईडीसीचे चेअरमन सदानंद शेट तानावडे यांनी काल मुख्यमंत्री आपत्ती निधीला दिलेला ५० लाख रु. चा धनादेश काल आपल्या कार्यालयात स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री आपत्ती निधीतून आतापर्यंत २.५ कोटी रु. ची नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे, असे ... Read More »

विंडीजविरुद्ध भारताची सावध सुरुवात

>> मयंक अगरवालचे अर्धशतक >> जेसन होल्डरचा प्रभावी मारा >> रविचंद्रन अश्‍विन संघाबाहेरच वजनदार कॉर्नवॉलचे कसोटी पदार्पण वेस्ट इंडीजने काल १४० किलो वजनी अष्टपैलू रहकीम कॉर्नवॉल याला कसोटी पदार्पणाची संधी दिली. २६ वर्षीय कॉर्नवॉल जगातील सर्वांत वजनदार कसोटीपटू ठरला. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार वॉर्विक आर्मस्ट्रॉंग (१३३ ते १३९ किलो) याला मागे टाकले. कॉर्नवॉलने पहिल्या सत्रात चेतेश्‍वर पुजाराचा बळी घेत कसोटी ... Read More »

यश अंतिम फेरीत

गोव्याचा स्टार युवा स्क्वॉशपटू यश फडतेने नॉयडा, उत्तर प्रदेश येथे सुरू असलेल्या ११व्या इंडियन ज्युनियर ओपन स्क्वॉश स्पर्धेच्या अंतिम फेरीत धकड दिली. शुक्रवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यशने महाराष्ट्राच्या दीपक मंडलचा ११-३, ११-२, ११-४ असा पराभव केला. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत यशने उत्तर प्रदेेशच्या दिवाकर सिंगचा ३-० असा एकतर्फी पराभव केला होता. आता अंतिम फेरीत यशची गाठ महाराष्ट्राच्या नील ... Read More »

प्रथम तुला वंदितो

दत्ताराम प्रभू-साळगावकर कोणत्याही गोष्टीची ‘श्रीगणेशा’ त्या गणेशावर निस्सिम भक्ती व भावना राखून केली तर इच्छित आणि इस्पित साध्य होतं; साध्य करायचं बळ प्राप्त होतं, आत्मविश्‍वास प्राप्त होतो, झोकून देण्याची क्षमता प्राप्त होते व संकल्प फलद्रुप होतो.   ॐ नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या| जयजय स्वसंवेद्या, आत्मरूपा॥ ज्ञानोबा माऊलीनी किती सार्थ शब्दांत गणेशस्तवन केलं आहे. श्रीगणेश सगुण तसेच निर्गुणही. श्रीगणपतीची पूजा, उपासना ... Read More »

गोव्यातले पत्रीपूजन

राजेंद्र केरकर पत्री म्हणून वापर केल्या जाणार्‍या वृक्ष-वनस्पतींविषयीचे ज्ञान लोप पावू नये, त्यांच्या औषधी आणि उपयुक्ततेचा लाभ संतुलितरीत्या लोकमानसाने घ्यावा अशी धारणा आपल्या निसर्ग आणि पर्यावरणाविषयीचा उत्कट जिव्हाळा असणार्‍या पूर्वजांना होती. त्यासाठी त्यांनी विविध प्रकारच्या पत्रींचा उपयोग सण-उत्सवात करण्याला महत्त्व दिले. आदिम कालखंडापासून मानवाला वृक्षवनस्पतीत असलेल्या औषधी, विषारी आणि उपयुक्त गुणधर्मांचे अनुभवाद्वारे ज्ञान लाभले होते. वृक्षवनस्पतीत अद्भुत शक्तीचा वास असतो ... Read More »