ब्रेकिंग न्यूज़

Monthly Archives: July 2019

प्राथमिक शिक्षकांच्या १८२ जागा भरतीची प्रक्रिया आठवड्याभरात

>> मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती सरकारी प्राथमिक शिक्षकांच्या १८२ जागा रिक्त असून ही पदे भरण्यासाठीचे काम आठवडाभरात सुरु होणार असल्याचे शिक्षण मंत्री ह्या नात्याने बोलताना काल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत सांगितले. प्रश्‍नोत्तराच्या तासाला काल अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली. सांगे मतदारसंघातील प्राथमिक शाळा, विद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत ... Read More »

विदेशी पर्यटकांच्या व्हिसा शुल्कात कपातीचे प्रयत्न

गोव्यात पर्यटनासाठी येणार्‍या विदेशी पर्यटकांना व्हिसाच्या वाढलेल्या शुल्कामुळे अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. व्हिसाच्या शुल्कात काही प्रमाणात सूट मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील. व्हिसाच्या शुल्कात सूट मिळविण्यासाठी केंद्राशी बोलणी केली जाणार आहे, अशी माहिती पर्यटन व क्रीडामंत्री मनोहर आजगावकर यांनी विधानसभेत पर्यटन, क्रीडा व इतर खात्याच्या अनुदानित पुरवणी मागण्यावरील चर्चेला उत्तर देताना काल दिली. राज्याचा पर्यटन मास्टर प्लॅन आणि पर्यटन धोरण ... Read More »

शांतादुर्गा किटलकरीण मंदिर चोरट्यांनी फोडले

किटला, फातर्पा येथील श्री शांतादुर्गा किटलकरीण देवीचे मंदिर चोरट्यांनी फोडून दोन फंडपेट्या पळविण्याबरोबरच दोन सोनसाखळ्या लंपास केल्या आहेत. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या वेळी घडली असून एकूण ऐवज सुमारे लाखभर किमतीचा असल्याचे देवस्थान समितीच्या अध्यक्षांनी पोलीस तक्रारीत म्हटले आहे. मुसळधार पडत असलेल्या पावसाचा फायदा उठवत रविवारी मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या खिडकीचे गज वाकवून आत प्रवेश केला व सीसी टीव्ही कॅमेरे ... Read More »

सिंधू, श्रीकांत, सायनावर भारताची मदार

>> जपान ओपन ‘सुपर ७५०’ बॅडमिंटन स्पर्धा आजपासून इंडोनेशिया ओपन ‘सुपर १०००’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत झालेल्या पराभवानंतर स्वतःला सावरत भारताची पी.व्ही. सिंधू आजपासून सुरू होणार्‍या जपान ओपन बीडब्ल्यूएफ ‘सुपर ७५०’ स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. ७५०,००० युएस डॉलर्स बक्षीस रकमेच्या या स्पर्धेद्वारे ‘फुलराणी’ सायना नेहवाल आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये पुनरागमन करणार आहे. तंदुरुस्तीच्या कारणास्तव सायनाने इंडानेशिया ओपनमधून अंग काढून घेतले होते. जकार्तामधील स्पर्धेत ... Read More »

सात सुवर्णांसह भारताची बाजी

हरमीत देसाई व अयहिका मुखर्जी यांनी २१व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. देसाईने विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या जी. साथियान याचा ४-३ (९-११, ६-११, ११-५, ११-८, १७-१५, ७-११, ११-९) असा पराभव केला. ०-२ अशा पिछाडीनंतर हरमीतने जोरदार पुनरागमन करताना सात सेटपर्यंत चाललेला हा सामना आपल्या नावे केला. भारताने या स्पर्धेत ७ सुवर्ण, ५ रौप्य, ... Read More »

पावसाळा आणि जंताचा त्रास

डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) सध्या जंताची औषधे जरी दिली गेली तरी जंक फूडचा शरीरावर होणारा मारा, खालावलेली रोगप्रतिकारशक्ती, चिकन-मटन-मासे तळून खाण्याची सवय, अर्धवट किंवा न शिजलेला भाजीपाला खाण्याची पद्धत, भाज्या-फळांचा आहारात असलेला अभाव, यामुळे लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत जंत होण्याचे प्रमाण वाढले आहे. विष्ठेतून जंतांचा प्रसार होतो. जंतांची अंडी, अळ्या विष्ठेतून बाहेर पडतात. ग्रामीण भागात शौचालयांची कमतरता असल्याने उघड्यावर ... Read More »

त्वचाविकार आणि आयुर्वेद भाग – ५

 वैद्य स्वाती हे. अणवेकर (म्हापसा) भूक मंद होणे, पोटात टोचल्यासारखे होणे, अन्नपचन नीट न होणे, वारंवार तहान लागणे, मळमळणे या सर्व लक्षणांचा विचार करता, वारंवार पाहता आपल्याला असे वाटेल की ही लक्षणे आणि त्वचारोग ह्यांचा काहीच संबंध नाही. पण हीच लक्षणे पुढे जाऊन त्वचारोग उत्पन्न करणारी प्रमुख कारणे बनू शकतात. कोणताही आजार हा जेव्हा शरीरामध्ये उत्पन्न व्हायचा असेल तेव्हा शरीरामध्ये ... Read More »

सुजाण, सुसंस्कृत

एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या निधनाची दखल संपूर्ण देशाकडून घेतली जाणे हे फार क्वचितच घडते आणि त्यात ते राज्य छोटे असेल तर असे होणे अधिकच दुर्मीळ असते. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनाची दखल संपूर्ण देशाने घेतली होती, परंतु त्यामध्ये त्यांची संरक्षणमंत्रिपदाची सफल कारकीर्द हाही एक भाग होता. नुकत्याच दिवंगत झालेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री दीक्षित यांच्या बाबतीत मात्र त्यांची कारकीर्द केवळ दिल्लीपुरती ... Read More »

भाजपच्या दक्षिण दिग्विजयाचा पुनःश्च हरिओम?

ल. त्र्यं. जोशी शुक्रवारी सायंकाळपर्यंत कर्नाटकातील कॉंग्रेस आणि जदसेचे कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार विधानसभाध्यक्षांच्या मदतीने शक्तिपरीक्षण टाळू शकले असले तरी ते आता भाजपाच्या दक्षिण दिग्विजयाचा पुनःश्च हरिओम करण्याचा मार्ग रोखू शकेल अशी शक्यता मुळीच दिसत नाही. राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही घडू शकत असले तरी परिस्थिती इतकी पुढे गेली आहे की, बंडखोरांना परत ङ्गिरण्यात काहीच स्वारस्य उरलेले नाही. शुक्रवारी सायंकाळपर्यंत कर्नाटकातील ... Read More »

कोलवाळचे एटीएम पळवून १०.६६ लाख लुटले

>> चोरीमागे ६ अज्ञात बुरखाधारी चोरटे >> रेवोड्यातील जंगलात सापडले पोलिसांना एटीएम कोलवाळ येथील श्रीराम मंदिरासमोर असलेल्या एच. डी. एफ्. सी. बँकेचे एटीएम मशिन अज्ञात सहा बुरखाधारी चोरट्यांनी रविवारी पहाटे २.२० च्या दरम्यान पळविले. त्यात अंदाजे १० लाख ६६ हजारांची रक्कम होती. दरम्यान, एटीएम मशिन सुमारे ४ कि. मी. अंतरावर रेवोडा येथील रानात फोडलेल्या अवस्थेत म्हापसा पोलिसांना सापडले आहे. म्हापसा ... Read More »