Monthly Archives: July 2019

कर्नाटकात सत्तेसाठी भाजपची सावध पावले

कर्नाटकमध्ये कॉंग्रेस – जेडीएस आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर भाजपला सत्ता स्थापनेचा मार्ग झाला आहे. मात्र, भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी जपून पावले टाकण्याचा निर्णय घेतल्याने मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार असलेले भाजप नेते बी. एस. येडीयुरप्पा तूर्त सत्तेपासून दूरच राहणार आहेत. त्यामुळे कर्नाटकमध्ये काही काळ तरी राजकीय अस्थिरता राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजप नेत्याची निवड करणे तसेच सरकार स्थापन होईपर्यंत सर्व प्रक्रियांवर लक्ष ठेवण्यासाठी दिल्लीतून ... Read More »

किनार्‍यांवर साधनसुविधा उभारण्यास सीआरझेडमुळे अडथळे ः पर्यटनमंत्री

केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेखाली गोव्याला पर्यटनासंबंधीची साधनसुविधा उभारण्यासाठी २०० कोटी रु. एवढा निधी मिळालेला आहे. मात्र, सीआरझेडकडून राज्यातील किनार्‍यांवर शौचालये, कपडे बदलण्यासाठीच्या खोल्या, लॉकर्स आदी साधनसुविधा उभारण्यासाठी ना हरकत दाखला मिळत नसल्याने राज्यातील किनार्‍यांवर साधनसुविधा उभारण्यास अडथळे येत असल्याची माहिती पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी काल विधानसभेत दिली. स्वदेश दर्शन योजनेखाली कोणकोणत्या किनार्‍यांवर साधनसुविधा उभारण्यास सीआरझेडने ना हरकत दाखले दिले ... Read More »

कला अकादमीच्या कृष्ण कक्षाला विष्णू सुर्या वाघांचे नाव

>> कला संस्कृती मंत्र्यांची घोषणा >> विष्णूंच्या नावे दरवर्षी महोत्सव ५५ वर्षांपूर्वी डोंगरीला सूर्यपुत्र जन्माला आला व पुढे त्याने गोव्यातच नव्हे तर गोव्याबाहेरही विष्णुमय जग पसरवले. त्यांच्या साहित्यातून, कर्तृत्वातून युवकांनी प्रेरणा घ्यावी म्हणून विष्णूच्या नावाने दरवर्षी एक महोत्सव कला अकादमी साजरा करणार असून कला अकादमीचे कृष्णकक्ष यापुढे विष्णू सुर्या वाघ कृष्णकक्ष म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा कला संस्कृती मंत्री गोविंद ... Read More »

इंग्लंडचा ८५ धावांत खुर्दा

विश्‍वविजेत्या इंग्लंडला क्रिकेटच्या पंढरीत ८५ धावांत गुंडाळण्याची अचंबित करणारी कामगिरी आयर्लंडच्या नवख्या संघाने केली आहे. केवळ दोन कसोटींचा अनुभव गाठीशी असलेल्या इंग्लंडने यजमानांना शंभरीदेखील ओलांडू दिली नाही. प्रत्युत्तरादाखल सर्वबाद २०७ धावा जमवत आयर्लंडने पहिल्या डावाच्या आधारे १२२ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकून अपेक्षेप्रमाणे फलंदाजी स्वीकारली. परंतु, कर्णधार रुट याचा हा निर्णय संघाच्या अंगलट आला. ‘लॉडर्‌‌स’वर खेळण्याचा ... Read More »

अल्टिमेट टेबल टेनिस लीग आजपासून

अल्टिमेट टेबल टेनिस लीगला आजपासून त्यागराज क्रीडा संकुलात प्रारंभ होणार आहे. स्पर्धेतील सर्व सामन्यांना संध्याकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात होणार असून स्टार स्पोटर्‌‌स ३ वाहिनीवरून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. विद्यमान विजेता दबंग दिल्ली व पुणेरी पलटन यांच्यात शुभारंभी लढत होणार आहे. भारताचे आघाडीचे टेबलटेनिसपटू जी. साथियान, मनिका बत्रा, शरथ कमल यांच्यासह इतर देशातींल काही दिग्गज आपली प्रतिभा या स्पर्धेतून दाखवतील. ... Read More »

निखत, दीपकचे पदक निश्‍चित

माजी ज्युनियर विश्‍वविजेती निखत झरीन (५१ किलो) व आशियाई रौप्यदक विजेता दीपक सिंग (४९ किलो) यांनी काल बुधवारी थायलंड आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करत भारताची किमान दोन कांस्यपदके पक्की केली. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या निखतने काल उझबेकिस्तानच्या सितोरा शोगदारोवा हिचा ५-० असा पराभव केला. पुरुषांमध्ये दीपकला विजयासाठी काही मिनिटेच लागली. दीपकच्या ठोशांनी थायलंडच्या सामक सिहान याच्या कपाळातून ... Read More »

गगनझेप!

‘चांद्रयान-२’ ला चंद्रावर नेण्यासाठी जीएसएलव्ही मार्क ३ प्रक्षेपकाने प्रत्येक भारतीयाची छाती अगदी अभिमानाने भरून यावी अशी दमदार गगनझेप काल दुपारी ठीक २.४३ वाजता घेतली. ‘चांद्रयान-२’ सह हा प्रचंड आकाराचा ‘बाहुबली’ प्रक्षेपक पूर्वनियोजनानुसार अगदी सेकंदाबरहुकूम पृथ्वीच्या कक्षेपर्यंत ‘चांद्रयाना’ला सोडण्यासाठी ‘इस्रो’मधील मोठ्या पडद्यावर इंच इंच पुढे सरकत चाललेला दिसत असताना अवघा देश श्वास रोखून त्याचा तो प्रवास पाहात होता. आठ दिवसांपूर्वीच होऊ ... Read More »

कॉंग्रेसने जे पेरलेय, तेच आज उगवतेय!

देवेश कु. कडकडे आज कॉंग्रेसवाले लोकशाही बुडाल्याचा जो कांगावा करतात, संविधानावर हल्ला झाल्याचे आरोप करतात, त्याची सुरूवात कॉंग्रेसनेच केली आहे. आमदार फोडणे ही काही नवी बाब नाही. राज्यकर्ता कसा असावा, याचे विवेचन अनेक ग्रंथांत केले आहे. राजा हा उपभोगशून्य स्वामी, चारित्र्यसंपन्न असा आदर्श असावा, अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. आधीचे राजा साधुसंतांच्या आशिर्वादाबरोबरच त्यांचे मार्गदर्शन घेत असत. आजचे राजकारणी आपल्याच पक्षाच्या ... Read More »

‘चांद्रयान-२’ यशस्वीपणे अवकाशात झेपावले

>> भारताने घडवला इतिहास >> ४८ दिवसांत चंद्रावर पोहोचणार सारा देश ज्याची वाट पाहत होता तो क्षण अखेर सगळ्यांनी काल अनुभवला. भारताची अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम असलेले ‘चांद्रयान – २’ काल यशस्वीरीत्या अवकाशात झेपावले आणि सुवर्णाक्षरांनी या क्षणाची नोंद इतिहासात झाली. दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळ प्रक्षेपण केंद्रावरून चांद्रयान चंद्राच्या दिशेने झेपावले. संपूर्ण भारतीय बनावटीच्या जीएसएलव्ही एमके ... Read More »

जाहिरात धोरण महिन्याभरात

>> सरकारी जाहिरातींच्या वाटपात भेदभाव : ढवळीकर राज्यातील प्रसारमाध्यमांना सरकारी जाहिराती देताना कुणावरही अन्याय होऊ नये, तसेच जाहिराती देण्याच्या कामात सुसूत्रता यावी यासाठी सरकार त्यासंबंधीचे एक धोरण महिन्याभरात तयार करणार असल्याचे माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे मंत्री ह्या नात्याने बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी काल गोवा विधानसभेत सांगितले. प्रश्‍नोत्तराच्या तासाला आमदार सुदिन ढवळीकर यांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्‍नाचे उत्तर देताना सावंत ... Read More »