Monthly Archives: July 2019

आमदार इजिदोर फर्नांडिस यांची उपसभापती बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत व सहकारी. Read More »

खासगी वनक्षेत्र प्रश्‍नावरून सरकारवर प्रश्‍नांची सरबत्ती

राज्यातील खासगी वनक्षेत्राच्या प्रश्‍नावरून काल विरोधी तसेच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी सरकारवर प्रश्‍नांचा भडिमार केला. नुवेचे आमदार विल्फ्रेड डिसा यांनी प्रश्‍नोत्तराच्या तासाला हा प्रश्‍न विचारला होता. नुवे मतदारसंघातील २५८ सर्व्हे क्रमांकातील जमीन ही खासगी वनक्षेत्र म्हणून दाखवण्यात आलेली आहे, असे डिसा यांनी यावेळी सभागृहाच्या नजरेस आणून दिले. जेथे फा. आग्नेल आश्रम आहे ती जमीनही खासगी वनक्षेत्र असल्याचे दाखवण्यात आले असल्याचे डिसा ... Read More »

कोलवाळ येथील एटीएम दरोडाप्रकरणी दोघांना पकडले

>> अद्याप म्होरक्यासह ५ संशयित फरारी कोलवाळ येथील भरवस्तीतील एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन पळवून १०.६६ लाख रुपये लुटलेल्या ७ दरोडेखोरांपैकी दोघांना काल म्हापसा पोलिसांनी अटक केली आहे. महम्मद लुंकमन अन्सारी (झारखंड) व हसन अब्दुल बारीक अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीसाठी वापरलेला टेम्पो, ऍक्टीव्हा स्कूटर, ३३ हजार रुपये, एटीएम मशीन, दोन रेनकोट व इतर साहित्य जप्त करण्यात आले ... Read More »

सिंधू, प्रणिथ उपउपांत्य फेरीत

पी.व्ही. सिंधू व बी. साई प्रणिथ यांनी परस्परविरोधी विजय मिळवत जपान ओपन ‘सुपर ७५०’ बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत काल गुरुवारी प्रवेश केला. इंडोनेशिया ओपन ‘सुपर १०००’ स्पर्धेच्या उपविजेत्या सिंधूने जागतिक क्रमवारीत विसाव्या स्थानी असलेल्या जपानच्या अया अहोरी हिला एका गेमच्या पिछाडीनंतर ११-२१, २१-१०, २१-१५ असे पराजित केले. यापूर्वी सिंधूला पाच प्रयत्नांनंतरही जपान ओपनची दुसरी फेरी ओलांडणे शक्य झाले नव्हते. प्रणिथला ... Read More »

इंग्लंड १८१ धावांनी आघाडीवर

आयर्लंडविरुद्धच्या चार दिवसीय कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी इंग्लंडने आपल्या दुसर्‍या डावात ९ बाद ३०३ धावांपर्यंत मजल मारली आहे. इंग्लंडचा पहिला डाव ८५ धावांत गुंडाळल्यानंतर आयर्लंडने आपल्या पहिल्या डावात २०७ धावा करत १२२ धावांची आघाडी घेतली होती. ही आघाडी वजा करून इंग्लंडकडे १८१ धावांचे पाठबळ राहिले असून त्यांचा एक गडी शिल्लक आहे. पहिल्या दिवसाच्या बिनबाद शून्यावरून काल पुढे खेळताना डावातील अकराव्या ... Read More »

नव्या नाटकाची नांदी

कर्नाटकमधील जनता दल – सेक्युलर आणि कॉंग्रेस यांच्यातील अंतर्गत लाथाळ्या आणि त्यातून उद्भवलेल्या राजीनामासत्राची परिणती अखेर कुमारस्वामी यांचे सरकार सहा मतांनी कोसळण्यात झाली आणि दीर्घकाळ रेंगाळलेल्या राजकीय नाटकावर पडदा पडला, परंतु यातून मध्य प्रदेश, राजस्थानसारख्या कॉंग्रेसी राज्यांमध्ये नव्या नाटकाची नांदी सुरू झाली आहे! कुमारस्वामींनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला तेव्हा एकूण २० आमदार गैरहजर होते. त्यात कॉंग्रेसचे १२ आणि जेडीएसचे ३ ... Read More »

मिमांसा ‘मध्यस्थी’च्या खुमखुमीची

शैलेंद्र देवळणकर काश्मीरप्रश्‍नी अमेरिकेने मध्यस्थी करावी अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला केल्याचे सांगून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा एक बेजबाबदार वक्तव्य केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर ट्रम्प यांनी खोटारडेपणाचा जणू विक्रमच केला असला तरी त्यांचे ताजे विधान हेतूपुरस्सर केलेले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पंतप्रधानपदी निवडून आल्यापासून सातत्याने अमेरिकेचे पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प यांची भेट मिळवण्याच्या प्रयत्नात ... Read More »

राज्यात २०२५ पर्यंत चोवीस तास पाणीपुरवठा

>> मंत्री दीपक पाऊसकर यांची विधानसभेत माहिती >> सात नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणार राज्य सरकारने २०२५ पर्यंत चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. राज्यात ६३२ एमलडी पाण्याचे शुद्धीकरण केले जात असून आणखीन ९५ एमएलडी क्षमतेचे सात नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पांच्या बांधकामांचे आदेश येत्या २ महिन्यांत जारी केले जाणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी विधानसभेत सार्वजनिक बांधकाम व ... Read More »

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा जानेवारीनंतर घ्या

>> आयओएला सरकारची सूचना गोव्यात होऊ घातलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे जानेवारी महिन्यानंतरच आयोजन करण्यात यावे, अशी सूचना राज्य सरकारने भारतीय ऑलिम्पिक संघटनेला केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत दिली. या स्पर्धा नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्याची तयारी भारतीय ऑलिम्पिक संघटना करीत होती. मात्र, या स्पर्धांसाठीचे आयोजन करण्यास आम्हांला आणखी वेळ हवा आहे. नोव्हेंबर महिना उजाडण्यास फक्त तीन ... Read More »

कोणत्याही चौकशीस तयार : सुदिन ढवळीकर

सार्वजनिक बांधकाममंत्री म्हणून कार्य करताना कायद्याच्या चौकटीत राहून काम केले आहे. आपल्या कारकिर्दीत करण्यात आलेल्या कुठल्याही कामाच्या चौकशीला तयार आहे. चौकशीची ङ्गाईल सभागृहाच्या पटलावर ठेवावी. मात्र, जनतेला चुकीची माहिती दिली जाऊ नये, असे स्पष्ट प्रतिपादन माजी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी विधानसभेत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अनुदानित मागण्यावरील चर्चेत बोलताना काल केले. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी खासगी एजन्सी नियुक्तीबाबत ... Read More »