Monthly Archives: July 2019

इंग्लंडच लॉडर्‌‌स!

>> आयर्लंडचा दुसरा डाव ३८ धावांत आटोपला इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या १८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडचा दुसरा डाव अवघ्या ३८ धावांत संपला. यामुळे इंग्लंडने या चार दिवसीय कसोटीच्या तिसर्‍याच दिवशी १४३ धावांनी विशाल विजय साकार केला. दुसर्‍या डावात जेम्स मॅक्कलमने सर्वाधिक ११ धावा केल्या. इंग्लंडचा गोलंदाज क्रिस वोक्सच्या भेदक मार्‍यापुढे आयर्लंडच्या फलंदाजांनी अक्षरश: नागी टाकली. ख्रिस वोक्सने ७.४ षटकांत १७ ... Read More »

लंकेचा ९१ धावांनी विजय

कुशल परेराचे पाचवे एकदिवसीय शतक तसेच आपला शेवटचा सामना खेळणार्‍या लसिथ मलिंगाने घेतलेल्या तीन बळींच्या जोरावर काल शुक्रवारी श्रीलंकेने बांगलादेशचा ९१ धावांनी पराभव केला. या विजयासह यजमानांनी तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने विजयासाठी ठेवलेल्या ३१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव २२३ धावांत संपला. नाणेफेकीचा कौल जिंकून लंकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशने अविष्काला बाद करत ... Read More »

भक्तीने अजिंक्यपद राखले

>> राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धा गोव्याची वुमन ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णीने कराईकुडी-तामिळनाडू येथील चेत्तिनाड पल्बिक स्कूलमध्ये कॅसल चेस अकादमीतर्फे आयोजित ४६व्या राष्ट्रीय महिला बुद्धिबळ २०१९ स्पर्धेचे अजिंक्यपद यशस्वीरित्या आपल्याकडे कायम राखले. नवव्या फेरीअंती भक्ती ८.५ गुणांसह आघाडीवर होती आणि तिला जेतेपदासाठी केवळ एक गुणाची आवश्यकता होती. काल झालेल्या दहाव्या फेरीत भक्तीने प्रियांका के. हिला पराभूत करीत पूर्ण एका गुणाची कमाई करीत ... Read More »

महामानव अब्दुल कलाम

–  प्रा. रमेश सप्रे वराहमिहिर- आर्यभट्ट- भास्कराचार्य; केप्लर- न्यूटन- आइन्स्टाइन आणि अलीकडच्या काळातले डॉ. रामन- डॉ. होमी भाभा- डॉ. विक्रम साराभाई यांच्या मांदियाळीत दिमाखानं तळपणारे वैज्ञानिक होते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम!  विसाव्या नि एकविसाव्या शतकांचा सेतू असलेला विज्ञान- संशोधन क्षेत्रातील विरक्त तपस्वी असलेला हा मनस्वी शास्त्रज्ञ आपले ओजस्वी विचार अन् यशस्वी जीवनगाथा मागे ठेवून २७ जुलै २०१५ रोजी काळाच्या पडद्याआड ... Read More »

शब्द .. शब्द .. जपून ठेव!

 माधुरी रं. शेणवी उसगावकर (फोंडा) हसवणे, लाजवणे, अर्थाचा अनर्थ करणे, अनर्थाचा अर्थ करणे हे सर्व शब्दांना छान जमते. शब्दांचीच जणू शर्यत असते. दोन जिवांना जोडणे- तोडणे ही जादू शब्दच जाणतात. असे विविध अर्थ घेऊन शब्द अवतरतात व सर्वकाही करून सवरून ते स्वतः नामानिराळे होतात. शब्दांचे वर्णन शब्दात कसे सांगावे? ते तर शब्दातीत. शब्द हा भाषेचा अविभाज्य घटक आहे. परंतु शब्दाविना ... Read More »

जागवू या स्मृती वीर जवानांच्या….

नागेश सरदेसाई (वास्को) २५ ते २७ जुलै – ‘कारगील दिवस’ ज्याचे नामकरण ‘दिल्ली ते द्रास- कारगील’ असे केले असून ते साजरे करताना आपल्या देशवासियांना या वीर शहीद जवानांच्या स्मृतींना विनम्रपणे अभिवादन करून कठीण प्रसंगी एकजूट राहण्याची आपली प्रतिज्ञा पूर्ण करता येईल. यंदाची कारगील युद्धाची द्विदशकपूर्ती साजरी करण्याची घोषणा आहे- ‘रिमेंबर – रिजॉइस – रिन्यू’. ज्यावेळी आपल्या वीर जवानांनी कारगीलला मुक्त ... Read More »

मध्यस्थी हवीच कशाला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला काश्मीर प्रश्नी मध्यस्थी कराल का, असे विचारल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या उपस्थितीत करून डोनाल्ड ट्रम्प यांनी खोटारडेपणाचा कळस केला आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे कोणतेही वादाचे विषय उभय पक्षांनी चर्चेद्वारे सोडवावेत ही भारताची आजवरची अधिकृत भूमिका असताना एकाएकी मोदी त्यापासून फारकत घेत ट्रम्प यांना मध्यस्थीची गळ घालण्याचे काही कारणच संभवत नाही. बांगलादेशच्या निर्मितीनंतर ... Read More »

कारगिलची एकमेव महिला योद्धा!

कारगिलच्या विजयाला आज दि. २६ जुलै रोजी १२ वर्षे पूर्ण होत आहेत. या युद्धकाळामध्ये शेकडो सैनिकांनी आपल्या पराक्रमाची शर्थ केली. त्यांना आपल्या अनेक वैमानिकांनी सर्वतोपरी पाठबळ पुरवले. त्यामध्ये एक महिला वैमानिक होती गुंजन सक्सेना. तिचीच ही कहाणी. रचना बिश्त रावल यांच्या ‘कारगील ः अनटोल्ड स्टोरीज फ्रॉम द वॉर’ या नव्या पुस्तकातून.. मे १९९९ मध्ये, उधमपूरमध्ये १३२ फॉरवर्ड एरिया कंट्रोल (एफएसी) ... Read More »

खासगी क्षेत्रात स्थानिकांना ८०% आरक्षण अशक्य

>> मुख्यमंत्री : अन्य पर्यायांचा विचार >> येत्या सहा महिन्यांत योग्य तोडगा आंध्र प्रदेशातील धर्तीवर राज्यातील खासगी उद्योगांमध्ये स्थानिकांना ८० टक्के रोजगार देण्याचा कायदा केला जाऊ शकत नाही. तथापि, खासगी उद्योगात स्थानिकांना ८० टक्के रोजगार देण्यासाठी अन्य पर्यायांवर विचार केला जाऊ शकतो. कामगार खाते, कौशल्य विकास आणि उद्योग खाते या तीन खात्यांचा समन्वय साधून या विषयावर येत्या सहा महिन्यात योग्य ... Read More »

नवा किनारी व्यवस्थापन आराखडा लोकांच्या सूचना विचारात घेऊनच

>> पर्यावरणमंत्री काब्राल यांची विधानसभेत ग्वाही गोव्यातील जनतेचे हित लक्षात घेऊन सरकारने राज्यातील किनारी विभाग व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतलेला असून त्यासाठी लोकांच्या सूचना विचारात घेतल्या जाणार आहेत. तसेच १९९१ वर्षी किनारपट्टीवर जे-जे काय होते त्याची सीआरझेडला माहिती मिळावी यासाठी १९९१ चा नकाशा तयार करणार आहोत. त्यासाठी १९९१ ची सर्व माहिती गोळा करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती ... Read More »