ब्रेकिंग न्यूज़

Monthly Archives: July 2019

टॅक्सी ऍप प्रश्‍नावर आज महत्त्वाची बैठक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील टॅक्सी ऍपच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी आज सोमवारी १ जुलै रोजी दुपारी १२ वाजता पर्वरी येथे मंत्रालयात एका बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला किनारी भागातील आमदार, टॅक्सी ऍपचा विषय मांडणारे मंत्री तसेच टूरिस्ट टॅक्सी मालक उपस्थित राहणार आहेत. गोवा पर्यटन विकास महामंडळाने सुरू केलेल्या गोवा माईल्स या ऍप आधारित टॅक्सी सेवेला टूरिस्ट टॅक्सी आणि ... Read More »

पाण्याच्या संकटावर मात करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

>> ‘मन की बात’मधून सुचविले उपाय देशातील कोट्यवधी लोकांना देशात विकास झालेला हवा असल्याने त्यासाठीच या जनतेने आपल्याला देशसेवा करण्याची पुन्हा एकदा संधी दिली आहे अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात या कार्यक्रमात व्यक्त केली. कालपासून हा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला आहे. पुन्हा देशसेवेची संधी दिल्याबद्दल मोदी यांनी जनतेचे आभार मानले आहेत. यावेळी त्यांनी जल संरक्षणाच्या ... Read More »

२७०० कोटींचे हेरॉईन अत्तारी सीमेवर जप्त

>> जकात खात्याची कारवाई जकात खात्याने काल अत्तारी सीमेवर काल केलेल्या एका कारवाईत पाकिस्तानमधून भारतात तस्करी केले जाणारे सुमारे २७०० कोटी रुपये किमतीचे ५३२ किलो एवढे अंमली पदार्थ (हेरॉईन) जप्त केले. या खात्याच्या कारवाईत आतापर्यंतचे हे सर्वात मोठे घबाड ठरले आहे. एका ट्रकमधून हे अंमली पदार्थ (हेरॉईन) आणले जात होते. जकात आयुक्त दीपक कुमार गुप्ता यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत ... Read More »

दिल्लीत प्राथमिक शाळांची सुट्टी आठवड्याने वाढवली

देशाची राजधानी दिल्लीत तापमानात भयानक वाढ झाली असून काल येथील उष्णेतचा पारा ४३ वर पोचला होता. परिणामी दिल्ली सरकारने शाळांच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये ८ जुलैपर्यंत वाढ जाहीर केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यानी तसे निर्देश सरकारी व खासगी प्राथमिक शाळांना दिले आहेत. आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळांच्या सुट्ट्यांमध्ये एका आठवड्याने वाढ करण्यात आली आहे. ही अतिरिक्त सुट्टी ९वी ते १२ वीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी ... Read More »

राज्यात पडझडीमुळे कोट्यवधींचे नुकसान

राज्यभरात गेले चार दिवस जोरदार कोसळणार्‍या पावसाने रविवारी थोडी उसंत घेतली. मागील चार दिवसात १३ ते १४ इंच पावसाची नोंद झाल्याने मोसमी पावसाच्या तुटीचे प्रमाण १४ टक्क्यांवर आले आहे. आत्तापर्यंत ३०.३४ इंच पावसाची नोंद झाली आहे. या जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राज्यात १४ दिवसांच्या उशिराने अखेर २० जूनला मान्सून दाखल झाल्याचे ... Read More »

गोवा मराठी चित्रपट महोत्सवात उत्तमोत्तम चित्रपट

>> समारोप सोहळ्यात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे उद्गार गोव्याचे व महाराष्ट्राचे नाते नैसर्गिक आहे. ही राज्ये व्यवसायाने जोडली गेलेली नाहीत म्हणूनच गोवा मराठी चित्रपट महोत्सव सुरळीतपणे एक तप पार पडत आहे व प्रत्येकाच्या काळजात या महोत्सवाने घर केले आहे. या महोत्सवात उत्तमोत्तम वेगळे चित्रपट पहायला मिळतात असे उद्गार केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यानी गोवा मराठी चित्रपट महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात ... Read More »

राजधानी पणजीतील रस्ते बनले खड्डेमय; दुचाकीस्वारांना डोकेदुखी

राजधानी पणजी शहरातील विविध भागातील रस्त्यावरील खड्डे वाहन चालकांसाठी डोकेदुखी बनलेले आहेत. या खड्‌ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहत असल्याने दुचाकी वाहन चालकांना खड्‌ड्याचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत. येथील मांडवी हॉटेलच्या समोर रस्त्यावरील केबल घालण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्‌ड्यामुळे अनेक दुचाकी वाहन चालकांना अपघात होत आहेत. याठिकाणी एका दुचाकी स्वार महिलेला अपघात झाल्याने हाताला दुखापत झाली आहे. पाटो पणजी येथे ... Read More »

टीम इंडियाचा ३१ धावांनी पराभव

>> भारताच्या पराभवामुळे पाकिस्तान संकटात क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतील भारताच्या अपराजित घोडदौडीला काल यजमान इंग्लंडने लगाम घातला. टीम इंडियाचा ३१ धावांनी पराभव करत त्यांनी स्पर्धेतील आपल्या पाचव्या विजयाची नोंद केली. इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या ३३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला ५ बाद ३०६ पर्यंतच पोहोचता आले. विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. नऊ चेंडूंचा सामना केल्यानंतर भोपळाही न फोडता राहुलने ... Read More »

दुहेरी किताबाची संधी

>> शौर्य, लिडिया, रुद्र, सुशील, अर्जुन, तृषा, हर्ष, यशला शौर्य जोशी, लिडिया बार्रेटो, रुद्र दुकळे, सुशील नायक, अर्जुन फळारी, तृषा जोशी, हर्ष माने व यश देसाई या खेळाडूंना अखिल गोवा प्रमुख मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी किताब मिळविण्याची संधी आहे. मॉर्निंग बॅडमिंटन क्लब व शटलर्स क्लब यांनी गोवा बॅडमिंटन संघटना व गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेतील सामने पेडे क्रीडा ... Read More »

लढवय्या मोहन रानडे

 प्रभाकर सिनारी (शब्दांकन ः अनिल लाड) मोहन रानडे यांनी माझ्या हाताखाली प्रशिक्षण घेतले. रानडे फार धाडसी होते आणि सांगितलेले आदेश पाळायचे. त्यांचा स्वभाव खूप चांगला होता. मीच कॅम्प कमांडर होतो. आमचे नियम फार कडक होते… गोव्याच्या मुक्तिलढ्यातील त्यांच्या कार्याबद्दल सांगताहेत त्यांचे सहकारी प्रभाकर सिनारी. डॉ. राममनोहर लोहिया यांनी १८ जून १९४६ रोजी गोव्यामध्ये क्रांतीची ज्योत पेटवली आणि दुसर्‍या दिवसापासून म्हणजेच ... Read More »