ब्रेकिंग न्यूज़

Monthly Archives: July 2019

मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट सिटीेचे चेअरमन व्हावे : महापौर

पणजी स्मार्ट सिटीचे चेअरमन स्वयंदीपपाल चौधरी हे गेल्या दोन वर्षांपासून स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पणजीत कोणती विकासकामे झाली याची माहिती देऊ शकलेले नसून अशातच या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी पणजीचे आमदार बाबुश मोन्सेर्रात यांनी बोलावलेल्या बैठकीला हजर राहू शकत नसल्याचे सांगून ती बैठकच काल रद्द केल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांची त्या पदावरून हकालपट्टी करावी व पणजी स्मार्ट सिटीचे स्वत: चेअरमन व्हावे, ... Read More »

उद्यापासून गोव्यात पुन्हा जोरदार पाऊस शक्य

राज्यात जून महिन्यात ३०.९७ इंच मोसमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण १६ टक्के कमी आहे. राज्यात मोसमी पावसाने तूर्त विश्रांती घेतली असून ३ जुलैपासून पुन्हा पावसाला सुरू होण्याची शक्यता पणजी हवामान विभागाने वर्तविली आहे. यंदा मोसमी पावसाचे १४ दिवसाच्या उशिराने आगमन झाले. पावसाचे आगमन झाल्यानंतर सुरुवातीला पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे सरासरी पावसाच्या तुटीचे प्रमाण ५० टक्क्यांवर पोहोचले ... Read More »

गणित वर्ल्डकप सेमीफायनलच

क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या भारतावरील विजयाने श्रीलंकेला स्पर्धेबाहेर व्हावे लागले आहे. तसेच टीम इंडियाच्या पराभवामुळे उपांत्य फेरीचे गणित अधिक किचकट बनले आहे. भारताने इंग्लंडचा पराभव केला असता तर पाकिस्तानला याचा फायदा झाला असता. आतापर्यंत फक्त ऑस्ट्रेलियाचा संघ १४ गुणांसह उपांत्य फेरीमध्ये दाखल झाला असून गुणतक्त्यामध्ये दुसर्‍या स्थानावर असूनही भारताला अजून उपांत्य फेरीचे तिकिट मिळालेले नाही. विश्‍वचषकामध्ये टीम इंडियाने आतापर्यंत ७ ... Read More »

श्रीलंकेचा विंडीजवर विजय

>> अविष्का फर्नांडोचे शतक सार्थकी, निकोलस पूरनची सेंच्युरी व्यर्थ निकोलस पूरन (११८) याचा कडवा प्रतिकार ’ोडून काढत काल श्रीलंकेने विंडीजचा २३ धावांनी पराभव केला. उभय संघांच्या विश्‍वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील प्रवेशाच्या आशा या सामन्यापूर्वीच मावळल्या होत्या. त्यामुळे या सामन्याला फारसे महत्त्व नव्हते. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना केलेल्या ३३८ धावांचा पाठलाग करताना विंडीजला ९ बाद ३१५ पर्यंतच जाता आले. तत्पूर्वी, कर्णधार ... Read More »

त्वचा विकार भाग – २

डॉ. स्वाती अणवेकर  (म्हापसा) अन्य शास्त्रामध्ये त्वचेला एक अवयव मानले आहे पण आयुर्वेद हा त्वचेला रस ह्या शरीरातील पहिल्या धातूचा उपधातू मानते. अर्थात शरीरातील रस धातूच्या सार भागातून त्वचा उत्पन्न होते. आयुर्वेद सांगते कि त्वचा ही पांचभौतिक आहे. अर्थात त्यात पंचमहाभूते आहेत ती म्हणजे पृथ्वी, जल, तेज, वायु,आणि आकाश. तर आता आपण ह्या पाच महाभूतांचे त्वचेमधील घटक तसेच त्यांचे कार्य जाणून ... Read More »

मला पथ्यकर काय?

डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी, म्हापसा) चिकित्सेच्या मार्गात अडथळा न आणणारे ते पथ्य. पथ्य म्हणजे रोगामध्ये हितकर तर अपथ्य म्हणजे रोगासाठी अहितकर असा आहार व विहार होय. सहसा फक्त औषधे चालू असताना पथ्य-अपथ्य सांभाळायचं असतं असा समज झालेला दिसतो. मात्र पथ्य-अपथ्य आपल्या प्रकृतीला धरून ठरविलेले असते. आपण राहतो तो देश, हवामान, आपली प्रकृती, आपला व्यवसाय आपली जीवनशैली वगैरे सर्व गोष्टी ध्यानात ... Read More »

मनावर नियंत्रण आणण्यासाठी….

पंकज अरविंद सायनेकर श्वासावर नियंत्रण ठेवून (कुंभक, म्हणजेच श्वास रोखून धरुन) चित्तविक्षेप नाहीसे करता येतात. प्राण जसा सबंध शरीरात व्यापून असतो तसेच मनही शरीरात संचार करीत असते. त्यामुळे जर का प्राणावर ताबा मिळवला तर मनही नियंत्रणात होईल. आजकाल बाजारात एखादी वस्तू घेतली तर त्याबरोबर काही मोफत (फ्री) मिळते. उदा. दंतमंजन किंवा टूथपेस्टसोबत टूथब्रश फ्री, पेन घेतले तर रिफील फ्री इत्यादी ... Read More »

पुन्हा काश्मीर

नरेंद्र मोदी सरकारने आपल्या मागील कार्यकाळामध्ये काश्मीर प्रश्नावर घेतलेली आक्रमक भूमिका, गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये काश्मीरमधील ३७० आणि ३५ अ कलम हटविण्याची भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेली आपली भूमिका आणि आता पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने सत्तेवर आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ताज्या काश्मीर भेटीत व नंतर संसदेमध्ये आळवलेला कठोर सूर या सार्‍यामुळे काश्मीरसंदर्भात मोदींचे हे सरकार नेमके काय करणार ... Read More »

कॉंग्रेसची अडथळेबाजी

ल. त्र्यं. जोशी राहुल राजीनामा देऊन बसले आहेत आणि इतक्या कथित विनवण्या सुरू असूनही माघार घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे न्यायप्रक्रियेच्या माध्यमातून शक्य होईल तेवढा भाजपाला, मोदी आणि शहांना रोखण्याचा प्रयत्न करावा, हा पर्याय वापरण्याचे कॉंग्रेसने ठरविलेले दिसते. एवढाच या अडथळेबाजीला अर्थ आहे. भारतीय राज्यघटनेची निर्मिती आपल्या घटनाकारांनी अशा पध्दतीने केली आहे की, कोणत्याही परिस्थितीत तिच्या माध्यमातूनच कोणत्याही समस्येतून मार्ग निघावा ... Read More »

प्रशासन गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे अधिकार्‍यांना निर्देश

>> प्रशासकीय अधिकार्‍यांबरोबर मंत्रालयात घेतली आढावा बैठक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी राज्य प्रशासनातील आयएएस, आयपीएस आणि आयएङ्गएस अधिकार्‍यांच्या बैठका घेऊन प्रशासन गतिमान बनविण्यासाठी विविध सूचना केल्या आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आपल्या कार्यकाळाचे शंभर दिवस पूर्ण केल्यानंतर प्रशासन अधिक गतिमान बनविण्यासाठी प्राधान्यक्रम दिला आहे. गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रशासकीय पातळीवर आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न चालविला आहे. प्रशासनातील आयएएस ... Read More »