ब्रेकिंग न्यूज़

Monthly Archives: July 2019

टीम इंडिया उपांत्य फेरीत

>> बांगलादेशचे विश्‍वचषकातील आव्हान आटोपले भारताने बांगलादेशचा कडवा प्रतिकार मोडून काढत काल मंगळवारी २६ धावांनी विजय मिळविला. या विजयासह भारताने क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर पराभवामुळे बांगलादेशचे स्पर्धेतील आव्हान आटोपले. भारताने विजयासाठी ठेवलेल्या ३१५ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ ४८ षटकांत २८६ धावांत संपला. विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची मदार शाकिब अल हसन (६६) याच्यावर होती. त्याने ... Read More »

नीरज सारिपल्ली रॅपिड बुद्धिबळाचा जेता

रोटरी क्लब ऑफ म्हापसा एलिट आणि बार्देश तालुका बुद्धिबळ संघटनेने गोवा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने आयोजित तिसर्‍या अखिल गोवा रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद सासष्टीच्या नीरज सारिपल्लीने पटकावले. स्पर्धेचे आयोजन काणका-म्हापसा येथील साईबाबा मंदिर सभागृहात करण्यात आले होते. स्पर्धेत ६० फिडे मानांकित खेळाडूंसह एकूण १७७ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. नीरजने अपराजित राहताना आठ फेर्‍यांतून साडेसात गुणांची कमाई केली. त्याने चषक व साडेसात ... Read More »

गॉफकडून व्हीनसला बाहेरचा रस्ता

>> ३९ वर्षीय दिग्गजाला पंधरा वर्षीय प्रतिस्पर्ध्याचा धक्का कोरी गॉफ या १५ वर्षीय शालेय विद्यार्थिनीने विंबल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या इतिहासातील सर्वांत धक्कादायक निकालाची नोंद करताना व्हीनस विल्यम्सला पहिल्याच फेरीत ६-४, ६-४ असे हरवून स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखविला. तब्बल दोन दशकांपासून ऑल इंग्लंड परिवाराची सदस्य असलेल्या ३९ वर्षीय व्हीनसच्या नावावर महिला एकेरीतील पाच विजेेतेपदे असून व्हीनसच्या नावावर पहिली दोन दोन जेतेपदे झाली त्यावेळी ... Read More »

टॅक्सी व्यवसायास शिस्त

राज्यातील पर्यटक टॅक्सी चालकांनी सातत्याने चालवलेल्या विरोधाची आणि धाकदपटशाची तमा न बाळगता सरकारने, विशेषतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या ‘गोवा माइल्स’ या ऍप आधारित टॅक्सीसेवेच्या पाठीशी उभे राहण्याचे संकेत काल दिले, हे स्वागतार्ह आहे. गोव्याच्या टॅक्सी व्यवसायामध्ये जी मुजोरी आणि मनमानी आजवर चालत आली, त्याला सरकारने कधीतरी शह देण्याची आवश्यकता होती. आजवर राजकारण्यांनी केवळ आपल्या एकगठ्ठा ... Read More »

हिंदी भाषेला सर्वत्र विरोध का?

देवेश कु. कडकडे केवळ इंग्रजी हीच ज्ञान-विज्ञानाची भाषा आहे, असा जर कोणाचा समज असेल तर तो भ्रम आहे, कारण रशिया, चीन, जपान या देशांनी आपल्या मातृभाषेत शिक्षण घेऊन विकास साधता येतो हे सिद्ध करून दाखविले आहे. स्वतंत्र देशात विदेशी भाषेची शिक्षणप्रणाली असणे हे दास्यत्वाचे लक्षण आहे. आपल्या देशाला ज्या ज्या वेळी एकतेच्या सूत्राने जोडण्याचा प्रयत्न होतो तेव्हा धर्म, जाती आणि ... Read More »

हॉटेल्सच्या खोल्यांवर लागू जीएसटी दरात कपातीची उद्योजकांची मागणी

हॉटेल्सच्या खोल्यांवर लागू करण्यात आलेले जीएसटी करांचे दर जास्त असल्याने हे दर खाली आणावेत अशी मागणी काल गोव्यातील हॉटेल व्यावसायिकांच्या प्रतिनिधींनी जीएसटी करपध्दती लागू झाल्यास दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित एका शासकीय कार्यक्रमात केली. केंद्रीय व राज्य जीएसटी यांच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजित या कार्यक्रमास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत यांनी जीएसटी करपध्दती लागू करून पंतप्रधान नरेंद्र ... Read More »

म्हापसा रविंद्र भवनबाबत सोमवारी अंतिम निर्णय

>> मंत्री गोविंद गावडेंची माहिती म्हापसा येथील रवींद्र भवन उभारण्यासाठी बोडगेश्‍वर मंदिराजवळील २० हजार चौरस मीटर जागेचा विचार केला जात आहे. येत्या सोमवारी ८ जुलैला होणार्‍या बैठकीत रवींद्र भवनाच्या उभारणीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. बार्देश तालुक्यात रवींद्र भवन बांधण्यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून प्रयत्न सुरू आहे. परंतु, ... Read More »

टुरिस्ट टॅक्सीवाल्यांच्या प्रमुख मागण्यांवर लवकरच तोडगा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा माईल्स या ऍप आधारित टॅक्सी सेवेनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी पर्वरी येथील मंत्रालयात सोमवारी आयोजित मंत्री, आमदार आणि टूरिस्ट टॅक्सी मालक यांच्या संयुक्त बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गोवा माईल्स या ऍप आधारित टॅक्सी सेवेचे समर्थन केले असून टुरिस्ट टॅक्सी मालकांच्या प्रमुख तीन समस्यांवर लवकरच तोडगा काढण्याचे आश्‍वासन ... Read More »

अपात्रताप्रकरणी आजगावकर, पाऊसकरांना उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांची मुदत

गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांनी मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांच्या उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांना आगामी पावसाळी अधिवेशनात सहभागी होण्यास प्रतिबंध आणि मतदानाचा हक्क देऊ नये यासाठी दाखल केलेल्या जोड याचिकेवर उत्तर देण्यासाठी दोघांना एका आठवड्याची मुदत दिली आहे. तर, त्यांच्याविरोधातील आमदार अपात्रता प्रकरणी मुख्य याचिकेवर उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांची मुदत काल दिली. सभापतींसमोर ... Read More »

काश्मीरात बस दरीत कोसळून ३५ मृत्युमुखी

जम्मू-काश्मीरच्या किश्तवार जिल्ह्यात काल सकाळी डोंगराळ भागातील रस्त्यावरून घसरून खच्चून भरलेली बस खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत किमान ३५ जण मृत्यूमुखी पडले असल्याची माहिती राज्याच्या प्रशासकीय अधिकार्‍यांनी दिली. तसेच या अपघातात अनेकजण गंभीर जखमीही झाले आहेत. या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. सदर बस केशवान येथून किश्तवार येथे जात ... Read More »