ब्रेकिंग न्यूज़

Monthly Archives: July 2019

अपेक्षाभंग!

–  शशांक मो. गुळगुळे या अर्थसंकल्पात प्रचंड घोषणा करण्यात आल्या, पूर्वी जाहीर झालेल्या घोषणांचे ढोल बडविण्यात आले पण सामान्य माणसाची त्याच्या ‘हाताला काहीच लागले नाही’ अशी प्रतिक्रिया आहे. रोजगार देणारा देश म्हणून भारताची ओळख करावयाची आहे, असे अर्थमंत्री म्हणाल्या. खरोखर त्या जर अशी ओळख निर्माण करू शकल्या तर ही पाचच काय.. पुढची २५ वर्षे यांचेच सरकार सत्तेवर असेल. २०१९-२० या ... Read More »

‘मन की बात’

माधुरी रं.शेट उसगावकर (फोंडा) आषाढातील पावसाचा महिमा तो काय वर्णावा? आपण आता मोठे झालो तरी पावसातील हौस विसरायची नाही. फेसबुक, व्हॉट्‌सऍपच्या अधीन झालेल्या मुलांना पावसात भिजवू. मुलांसंगे आपण ओलेचिंब होऊ. दिवसेंदिवस वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध होत होत्या… रणरणत्या उन्हात जिवाची लाही लाही, अति उष्णतेचे बळी, कडकडीत उष्म्याचे चटके… इतर राज्यातील बातम्या वाचताना गोवेकरांचा गोवा अपवाद कसा ठरेल? इतकी वर्षे आपण गोव्यातील हवामानाविषयी ... Read More »

‘खाली डोकं, वर पाय!’

प्रमोद ग. गणपुले (भटवाडी- कोरगाव) हातामध्ये पेन, पेन्सील नीट पकडतां यावी यासाठी हाताची बोटं, त्यांचे स्नायू, त्यांच्या पेशी यांची पुरेशी वाढ व्हावी लागते. त्यासाठी किमान पाच वर्षे लागतात. म्हणून वयाची पाच वर्षे पूर्ण होईपर्यंत मुलांच्या हातांत पेन, पेन्सिल देऊ नये, असा जागतिक सिद्धांत आहे. नंदूची आई शाळेतल्या बाईंशी मोठमोठ्याने भांडत होती. ‘‘काय हो बाई, नंदूला शाळेत पाठवून सहा महिने झाले, पण ... Read More »

.. आणि मुंबई बुडाली!

गेले चार दिवस मुंबई आणि परिसराची मुसळधार पावसाने नुसती दाणादाण उडवून दिली आहे. ठिकठिकाणी पाणी साचले, अनेक भागांत थेट घरांमध्ये शिरले आणि भिंत कोसळण्यापासून शॉर्ट सर्किटपर्यंत नानाविध दुर्घटनांनी अनेक बळीही गेले. २००५ सालात २६ जुलैला जे घडले, त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने आणि महाराष्ट्र सरकारने जे कोट्यवधी रुपये नालेसफाई आणि इतर पूरनियंत्रक कामांवर खर्च केले, ते पाण्यातच तर गेलेले नाहीत ना असा ... Read More »

गरज श्रमिकांच्या हितरक्षणाची…

ऍड. प्रदीप उमप कामगारविषयक केंद्रीय आणि राज्य सरकारांनी केलेले बहुतांश कायदे ४० ते ८० वर्षांपूर्वीचे असून, सध्याच्या परिस्थितीत त्यांची परिणामकारकता आणि उपयुक्तता संपुष्टात आल्याचे सांगितले जाते. छोट्या आणि मोठ्या उद्योगांमध्ये कामगारविषयक नियम वेगवेगळे असतात. श्रमशक्तीचा अर्थव्यवस्थेत मोठा सहभाग असतो. त्यामुळे त्यांच्या कल्याणासाठी योग्य धोरण आणि नियम असणे आवश्यक आहे. भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात श्रमिकांचा सहभाग मोलाचा आहे. परंतु श्रमिकांच्या अनेक ... Read More »

सरकारकडून प्रशासकीय पातळीवर खातेबदल

>> १५ आयएएस अधिकार्‍यांच्या खाते बदलाचे आदेश केले जारी सरकारने आयएएस अधिकार्‍यांच्या सचिव पातळीवर कामकाजाचे नव्याने वाटप करून प्रशासकीय पातळीवर खातेबदल केले. काही सचिव, विशेष सचिवांच्या खात्यात बदल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी आयएएस अधिकार्‍यांची बैठक घेतल्यानंतर मंगळवारी आयएएस अधिकार्‍यांच्या खात्यांत बदलाचा आदेश जारी करण्यात आला. मुख्य सचिव परिमल राय यांच्याकडे दक्षता, गृह, कार्मिक, एआरडी आणि ... Read More »

भाजप सरकारने साडेसात वर्षांत सीआरझेड प्रश्‍नावर काय केले?

>> उत्तर देण्याची कॉंग्रेसची मागणी सीआरझेड प्रश्‍नावर २०१२ पासून आतापर्यंत भाजप सरकारने काय केले याचे उत्तर सरकारने अगोदर द्यावे व २०१२ पूर्वी असलेल्या कॉंग्रेस सरकारने काहीच केले नाही हा आरोप नंतर करावा असे विरोधी पक्ष नेते चंद्रकांत कवळेकर हे काल पत्रकार परिषदेतून बोलताना म्हणाले. काल पर्वरी येथे झालेल्या कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर ते बोलत होते. गेली सुमारे साडेसात वर्षे राज्यात ... Read More »

भाजपच्या ‘त्या’ आमदाराच्या वृत्तीवर पंतप्रधान मोदींचे आसूड

मध्य प्रदेशमधील भाजपचे आमदार आकाश विजयवर्गीय यांनी कर्तव्य बजावणार्‍या सरकारी अधिकार्‍याला क्रिकेट बॅटने सर्वांसमक्ष मारहाण केल्याच्या घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेऊन अशा प्रकारचा उद्दामपणा व बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही असे स्पष्टपणे भाजपच्या संसदीय बैठकीवेळी बजावले. भाजपचे नेते राजीव प्रताप रुडी यांनी ही माहिती दिली. आमदार विजयवर्गीय तसेच त्यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करणार्‍यांवरही पक्षातर्फे ... Read More »

पावसाळी विधानसभा अधिवेशनासाठी आतापर्यंत ४०९ तारांकीत प्रश्‍न

>> सभापती राजेश पाटणेकर यांची माहिती गोवा विधानसभेच्या येत्या १५ जुलै २०१९ पासून सुरू होणार्‍या २० दिवसांच्या पावसाळी अधिवेशनासाठी आत्तापर्यंत ४०९ तारांकित आणि ८९३ अतारांकित प्रश्‍न आले आहेत, अशी माहिती सभापती राजेश पाटणेकर यांनी विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली. सभापती पाटणेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनातील कामकाजावर चर्चा करण्यात आली. पावसाळी ... Read More »

मोठ्या सरकारी इस्पितळांच्या रुग्णांना सकस अन्न पुरवणार

>> आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची माहिती ः खास कंपनीची नियुक्ती राज्यातील उत्तर आणि दक्षिण या दोन्ही जिल्हा हॉस्पिटल तसेच सरकारच्या मोठ्या हॉस्पिटलमधील रुग्णांना सोडेक्सो या कंपनीच्या माध्यमातून स्वच्छ व सकस अन्न पुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी पत्रकारांशी बोलताना बांबोळी येथे काल दिली. बांबोळी येथील नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सोडेक्सो कंपनीच्या माध्यमातून अन्न पुरवठा करण्याच्या योजनेचा ... Read More »