ब्रेकिंग न्यूज़

Monthly Archives: July 2019

बाबुश समर्थक नगरसेवकांमुळे टोंका कचरा प्रकल्प अधांतरी

>> भाजपच्या नगरसेवकांचा आरोप पणजी महापालिकेतील सत्ताधारी बाबुश मोन्सेर्रात यांचे पॅनल व भाजप नगरसेवकांचे पॅनल यांच्यात एकमत होऊ न शकल्याने टोंका येथे ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठीच्या १० टन प्रकल्पाची स्थिती त्रिशंकू बनलेली असतानाच काल भाजप पॅनलचे नगरसेवक मिनीन डिक्रुझ, शुभम चोडणकर व वैदेही नाईक यांनी बाबुश पॅनलचे काही नगरसेवक विनाकारण या प्रकल्पाला खो घालीत असल्याचा आरोप काल भाजप मुख्यालयातत घेतलेल्या ... Read More »

खाणी सुरू करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करा

>> विनय तेंडुलकर यांची संसदेत मागणी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी काल संसदेत गोव्याच्या खाणीचा मुद्दा उपस्थित करताना राज्यातील बंद पडलेल्या लोह खनिज खाणी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने कायद्यात आवश्यक ती दुरुस्ती घडवून आणावी, अशी मागणी केली. राज्यातील खाण उद्योग बंद पडल्याने खाणींवर अवलंबून असलेल्या राज्यातील ७५ हजार कुटुंबांवर थेट परिणाम झाला असल्याचे त्यांनी सभागृहाचा नजरेस आणून दिले. खाणअवलंबित ... Read More »

‘नाईक’ आडनाव बदलण्यास भंडारी समाजाची तीव्र हरकत

>> समाजातर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांच्या नेतृत्वाखाली काल भंडारी समाजाच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली व परराज्यातून येऊन गोव्यात स्थायिक होणारे काही बिगर गोमंतकीय आपले आडनाव बदलून ‘नाईक’ अशी दुरुस्ती करून घेऊ लागले असल्याचे त्यांच्या नजरेस आणून दिले. नाईक हे भंडारी समाजाचे एक प्रमुख आडनावांपैकी एक असून ओबीसींना मिळणारे लाभ मिळवण्यासाठी हे ... Read More »

कृष्णंभट्ट बांदकर आणि रंगसन्मान पुरस्कार जाहीर

कला अकादमी गोवातर्फे गोमंत रंगभूमी दिनाचे औचित्य साधून गोमंतकीय रंगभूमीच्या क्षेत्रातील रंगकर्मींना देण्यात येणार्‍या गोमंतकाचे आद्य नाटककार व संतकवी कृष्णंभट्ट बांदकर पुरस्कार आणि रंगसन्मान पुरस्कार विजेत्यांची नावे कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी काल जाहीर केली. संतकवी कृष्णंभट्ट बांदकर यांचा जन्म दिवस गोमंत रंगभूमी दिन म्हणून दि. ११ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजता कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर सभागृहात ... Read More »

भारत-न्यूझीलंड उपांत्य लढत आज

भारत व न्यूझीलंड यांच्यात आज मंगळवारी विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना खेळविला जाणार आहे. साखळी फेरीत पावसामुळे या संघांत सामना झाला नव्हता. त्यामुळे या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमध्ये यंदाच्या विश्‍वचषकात प्रथमच लढत होणार आहे. साखळीत भारताने अव्वल राहून तर न्यूझीलंडने चौथ्या स्थानासह उपांत्य फेरीत स्थान मिळविले होते. परंतु, या इतिहासाला बाद फेरीत फारसे महत्त्व उरलेले नाही. इंग्लंडविरुद्धचा धक्का वगळता भारताने या ... Read More »

यूएसच्या महिला चौथ्यांदा जगज्जेत्या

>> अंतिम सामन्यात हॉलंडवर मात यूएसच्या महिलांनी अंतिम सामन्यात हॉलंडवर २-० अशी मात करीत फिफा आयोजित महिलांच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे पटकाविले. त्यांचे हे चौथे विश्वविजेतेपद होय. तर प्रथमच अंतिम फेरीत धडक दिलेल्या हॉलंडच्या महिलांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. काल झालेल्या अंतिम फेरीत दोन्ही संघ पहिल्या सत्रात गोलशून्य बरोबरीत राहिले होते. दुसर्‍या सत्रात ६१व्या मिनिटाला व्हीएआरच्या आधारे यूएसला पेनल्टी प्राप्त झाली. ... Read More »

कर्नाटकात नवे नाटक

कर्नाटकमधील कॉंग्रेस आणि जेडीएस या दोन्ही मित्रपक्षांच्या आमदारांचे सुरू झालेले राजीनामासत्र राज्यावर राजकीय संकट घेऊन आले आहे. राजीनामा दिलेल्या आमदारांची वाढती संख्या पाहता कॉंग्रेस – जेडीएस सरकार अल्पमतात आल्याचे संकेत मिळत आहेत. अर्थात, असंतुष्टांना मंत्रिपदे बहाल करून त्यांना राजीनामे मागे घ्यायला लावण्याची जोरदार धडपड जरी कॉंग्रेस आणि जेडीएसकडून सुरू झालेली असली, तरी आपल्या १०५ आमदारांच्या भक्कम संख्येनिशी भारतीय जनता पक्ष ... Read More »

राहुलच्या पुनर्स्थापनेचा सुनियोजित डाव?

ल. त्र्यं. जोशी आता कॉंग्रेस पराभवाच्या धक्क्‌यातून सावरलेली दिसते. गांधी परिवाराशिवाय तिला पर्याय नाही हे तिला कळले आहे व गांधी परिवारालाही कळले आहे. त्यामुळे आता राहुलच्या पुनर्स्थापनेची रणनीती आखण्यात आली असे दिसते. नाटक सुरु झाले आहे. त्याचा पहिला अंक आटोपला आहे. दुसरा अंक सुरु झाला आहे, आता वाट आहे ती तिसर्‍या अंकाची. त्यासाठी एखाद्या वर्षाची तरी प्रतीक्षा करावी लागेल असे ... Read More »

पर्रीकरांचे समाधीस्थळ मिरामारला साकारणार

>> जीएसआयडीसीतर्फे लवकरच डिझाईनची निवड भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे मिरामार येथे भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधी शेजारी समाधीस्थळ उभारण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळ ह्या समाधीसाठी उत्कृष्ट रचनेची (डिझाईन) निवड करणार असल्याचे जीएसआयडीसील सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील वरील महामंडळ यासाठी वास्तू रचनाकारांची स्पर्धा घेणार आहे. १७ मार्च ... Read More »

कर्नाटक : कॉंग्रेस-जेडीएसची सरकार वाचविण्यासाठी धडपड

कर्नाटकात सत्ताधारी कॉंग्रेस – जेडीएस आघाडीच्या १३ आमदारांनी राजीनामे दिल्याने धोक्यात आलेले १३ महिन्यांचे सरकार वाचविण्यासाठी कॉंग्रेस – जेडीएसची धडपड सुरू आहे. परदेश दौर्‍यावरून मुख्यमंत्री कुमारस्वामी बंगळुरात दाखल झाले आहेत. दुसरीकडे कॉंग्रेसने आपल्या सर्व आमदारांसाठी परिपत्रक काढले असून उद्या ९ जुलै रोजी होणार्‍या आमदारांच्या बैठकीस हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तर भाजपाने देखील त्यांच्या आमदारांसाठी बंगळुरातील रामदा हॉटेलमध्ये दोन दिवसांसाठी ... Read More »