ब्रेकिंग न्यूज़

Monthly Archives: July 2019

गोव्यात कॉंग्रेसचे १० आमदार भाजपमध्ये

  कर्नाटक पाठोपाठ राज्यात कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाला मोठे भगदाड भाजपचे संख्याबळ २७ वर; कॉंग्रेसमध्ये उरले फक्त ५ बाबू कवळेकर, मोन्सेर्रात दांपत्य, नीळकंठ, सिल्वेरा, डिसा, क्लाफासियो, फिलीप नेरी, इजिदोर व टोनी फुटले! >> राजकीय घडामोडींना गोव्यात वेग >> मंत्रिमंडळात मोठे फेरबदल अपेक्षित >> राज्यपाल तातडीने गोव्याकडे >> गोवा फॉरवर्डवर गंडांतर येणार? >> नवे पाहुणे अमित शहांच्या भेटीस >> दोन तृतीयांशमुळे पक्षांतर ... Read More »

कर्नाटकातील सत्तानाट्य सर्वोच्च न्यायालयात

>> सभापतींकडून राजीनामा स्वीकारण्यास उशीर >> बंडखोर जेडीएस – कॉंग्रेस आमदारांचा आरोप कर्नाटकमधील राजकीय संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला असून कॉंग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर आमदारांनी विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी राजीनामा स्वीकारण्यास उशीर केल्याचा आरोप करीत न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. दरम्यान, मुंबईमध्ये असलेले कॉंग्रेसचे बंडखोर आमदार रमेश जारकीहोळी यांनी आणखी चार ... Read More »

नदीत सांडपाणी; बार्देशमध्ये ४३२ घरमालकांना नोटिसा

सांडपाणी थेट नदीन सोडल्याप्रकरणी बार्देश तालुक्यातील ४३२ घरमालकांना कारवाईच्या नोटीसा पाठविण्यात आल्या. प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा न करता तो नदीत सोडणार्‍या या घरांना आरोग्य केंद्राकडून कारणे दाखवा नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. संबंधितांनी या नोटीसांची गंभीर दखल घेऊन ३० दिवसांच्या आत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या आदेशाची दखल न घेतल्यास आरोग्य कायदा १९८५ च्या कलम ... Read More »

ग्रंथपाल बडतर्फ

>> विद्यार्थी मारहाणप्रकरण ढवळी येथील इंदिराबाई ढवळीकर (आयव्हीबीडी) विद्यालयाच्या ग्रंथपालाने दोघा विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी या विद्यालयाचा ग्रंथपाल अमित रंगनाथ सावंत (३१) याला ङ्गोंडा पोलिसांनी अटक करून न्यायदंडाधिकार्‍यांसमोर उभे केले असता त्याला दोन दिवसांची कोठडी देण्यात आली. दरम्यान, अमित सावंत याला इंदिराबाई ढवळीकर विद्यालयाच्या एस. एस. समिती व्यवस्थापनाने कामावरून काढून टाकले. संशयित अमित सावंत याच्याविरोधात मंगळवारी ङ्गोंडा पोलिसांत जखमी झालेल्या विद्यार्थ्याच्या ... Read More »

गँगवॉरमध्ये पंजा छाटलेल्या जखमीचा गोमेकॉत मृत्यू

>> संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद रायबंदर येथे रविवार ७ जुलैला रात्री झालेल्या दोन गटातील गँगवॉरमध्ये धारदार शस्त्राच्या साहाय्याने उजव्या हाताचा पंजा शरीरापासून विभक्त करण्यात आलेल्या कृष्णा कुर्टीकर (ताळगाव) याचे गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना काल निधन झाले. दरम्यान, या गँगवॉर प्रकरणामध्ये पणजी पोलिसांनी आणखीन एका संशयिताला काल अटक केली आहे. दिपेश गावस (नागाळी, ताळगाव) असे संशयिताचे नाव आहे. ... Read More »

गुडे-शिवोलीत लहान भावाचा भाऊ व भावजयीकडून खून

गुडे शिवोली येथील सर्वेश खडपकर (३०) या आपल्या लहान भावाचा रविवार दि. ७ रोजी दुपारी राहत्या घरात मोठ्या भाऊ संदेश खडपकर (३८) व त्याची पत्नी लतिका खडपकर यांनी खून केला. त्यानंतर सर्वेश याचा मृतदेह वारपे पेडणे येथे दरीत फेकून दिला होता. तो मृतदेह मंगळवार दि. ९ रोजी पोलिसांना सापडला व २४ तासांच्या आत खुनाला वाचा ङ्गुटली. सर्वेश हा आपला थोरला ... Read More »

टॅक्सीचालकांचा आंदोलनाचा इशारा

>> गोवा माईल्स बंदची मागणी ऍप आधारित गोवा माईल्स ही टॅक्सीसेवा रद्दबातल करण्याची मागणी येत्या १० दिवसांत मान्य न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा काल टूरिस्ट टॅक्सी मालकांनी ताळगाव येथे आयोजित केलेल्या सभेत दिला. ताळगाव येथील सामाजिक सभागृहात असोसिएशन ऑफ टूरिस्ट टॅक्सी असोसिएशनने ही सभा आयोजित केली होती. या सभेत राज्यभरातील टूरिस्ट टॅक्सी मालकांची मोठी उपस्थिती होती. या सभेत कॉंग्रेसचे आमदार ... Read More »

उपांत्य फेरीतच भारत गारद

>> न्यूझीलंड अंतिम फेरीत दाखल >> मॅट हेन्रीचा भेदक मारा पावसाच्या व्यत्ययामुळे आरक्षित दिवशी खेळवल्या गेलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील रोमहर्षक उपांत्य सामन्यामध्ये काल भारताचा १८ धावांनी पराभव झाला. भारतीय संघाला न्यूझीलंडने उभारलेल्या २४० धावांचे किरकोळ आव्हान पार करण्यात अपयश आले. टीम इंडियाचा डाव २२१ धावांत संपल्याने न्यूझीलंडने अंतिम फेरीत प्रवेश केला. मॅट हेन्रीने आघाडी फळी कापून काढल्यानंतर रवींद्र जडेजा ... Read More »

द्युती चंदची ऐतिहासिक सुवर्णधाव

>> जागतिक विद्यापीठ स्पर्धा आपण समलिंगी असल्याचे जाहीर करून भारतीय क्रीडा जगतात खळबळ माजविलेली आघाडीची धावपटू द्युती चंद हिने इटलीमध्ये सुरू असलेल्या ‘उन्हाळी जागतिक विद्यापीठ स्पर्धेत’ सुवर्णपदक प्राप्त केले आहे. तिची ही सुवर्णधाव ऐतिहासिक ठरली आहे. कारण जागतिक विद्यापीठ स्पर्धेत १०० मी. शर्यतीत सुवर्णपदक प्राप्त करणारी द्युती ही पहिलीच भारतीय ठरली आहे. द्युतीने १०० मीटर शर्यतीत सुवर्णधाव घेताना अवघ्या ११.२ ... Read More »

ऑस्ट्रेलिया-इंग्लंड उपांत्य सामना आज

ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यात आज विश्‍वचषक स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना खेळविला जाणार आहे. भारताला नमवून अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या न्यूझीलंडशी या सामन्यातील विजेता संघ रविवारी होणार्‍या फायनलमध्ये खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीत द्वितीय स्थानासह तर इंग्लंडने तिसर्‍या स्थानासह ‘अंतिम चार’मध्ये प्रवेश केला होता. दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा या सामन्यात खेळणार नसून त्याची जागा पीटर हँड्‌सकोंब घेणार असल्याचे संघाचे प्रशिक्षक जस्टीन ... Read More »