Monthly Archives: July 2019

तेरेखोल येथील गोल्फ कोर्स प्रकल्पाला स्थगिती

तेरेखोल, पेडणे येथील नियोजित गोल्फ कोर्स प्रकल्पाचे बांधकाम करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल अंतरिम स्थगिती दिली. या प्रकरणी पुढील सुनावणी २७ ऑगस्ट रोजी घेतली जाणार आहे. न्यायालयाने राज्य सरकारला उप जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार या प्रकरणी कोणतेही आदेश जारी करण्यास प्रतिबंध घातले आहे. लिडिंग हॉटेलला या आदेशाला आव्हान देण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तसेच जनहित याचिकेत दुरुस्ती करण्याची मुभा याचिकादाराला दिली ... Read More »

ज्योकोविच-फेडरर अंतिम लढत

सर्बियाचा स्टार टेनिसपटू तथा गतविजेत्या नोव्हाक जोकोविचा आणि स्वित्झरलंडचा दिग्गज खेळाडू रॉजर फेडरर यांच्यात विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. अंतिम सामना रविवार दि. १४ जुलै रोजी होणार आहे. काल झालेल्या पहिल्या उपांत्य लढतीत चार वेळच्या विम्बल्डन जेत्या ज्योकोविचने स्पेनच्या रॉबर्टो बावतिस्टा ऍगुतचा ६-२, ४-६, ६-३, ६-२ असा पराभव केला. ज्योकोविचचा हा गेल्या १३ ग्रँडस्लॅम स्पर्धांमधील उपांत्य ... Read More »

फुटबॉलमध्ये भारताच्या महिलांची भरारी

भारताच्या महिला फुटबॉल संघाने ताज्या फिफा क्रमवारीत सहा स्थानाची प्रगती करताना ५७वा क्रमांक मिळविला आहे. फिफाने आयोजित महिला विश्‍वचषक स्पर्धा अमेरिकेने जिंकल्यानंतर महिला क्रमवारी अद्ययावत करण्यात आली. स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारलेल्या नेदरलँड्‌सने पाच स्थानांची सुधापणा करत तिसरे स्थान मिळविले तर जर्मनीने आपले दुसरे स्थान कायम राखले. स्पर्धेच्या अंतिम चारांत प्रवेश करूनही इंग्लंडची पाचव्या स्थानी घसरण झाली. उपांत्यपूर्व फेरीत गाशा ... Read More »

अफगाण संघाचे राशिदकडे नेतृत्व

लेगस्पिनर राशिद खान याच्याकडे अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. विश्‍वचषक स्पर्धेत गुलबदिन नैब याच्या नेतृत्वाखाली संघाला सर्व सामने गमवावे लागल्यानंतर त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले आहे. विश्‍वचषकापूर्वी कर्णधारपदाहून हटविण्यात आलेला असगर अफगाण संघाचा नवीन उपकर्णधार असेल. अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने विश्‍वचषक स्पर्धेपूर्वी मोठे फेरबदल करताना असगर अफगाण याचे कर्णधारपद काढून नैबकडे वनडे संघाचे नेतृत्व सोपविले होते. तसेच राशिद खान ... Read More »

एसएससी लोटली अंतिम फेरीत

एसएससी लोटली संघाने राय स्पोर्टिंग क्लबचा टायब्रेकवर २-१ अशा गोलफरकाने पराभव करीत फोंडा फुटबॉलर्स आयोजित ३१व्या सेंट ऍनीस फेस्टिव्हल आंतरग्राम फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. कुर्टी फोंडा येथील ऍनिमल हस्बंडरी मैदानावर खेळविण्यात आलेला हा सामना पूर्ण वेळेत गोलशून्य बरोबरीत संपला होता. या सामन्याच्या प्रारंभीच राय स्पोर्टिंग क्लबने एक धोकादायक चाल रचली होती. परंतु एल्डनकडून मिळालेल्या अचूक पासवर ऑयलेकनसने घेतलेला ... Read More »

‘गुरू’ ः एक निराकार शक्ती

 पौर्णिमा सुखटणकर (निवृत्त मुख्याध्यापिका) ‘गुरुमाऊली’आपल्या लाडक्या भक्ताला, शिष्याला भेटायला कायम आतुरलेली असते- जगातील कोणत्याही गोष्टीची तुलना ‘गुरू-शिष्य’ या नात्याशी, त्यांच्यातील निरपेक्ष प्रेमाशी होऊ शकत नाही. एखाद्या गुरूचे भक्त अनेक असतात पण ‘शिष्य’ एखादाच असतो. वैज्ञानिक प्रगतीमुळे, तंत्रज्ञानाच्या क्रांतिमुळे हल्लीचे विद्यार्थी संगणक, मोबाइल, इ-बुक, इत्यादी यंत्रांमुळे स्वतःच किमान शिक्षण सहज घेऊ शकतात. विद्यालयातून ‘पर्यायी शिक्षक’ व्यवस्था होऊ शकते, पित्याकडून मिळालेला जन्म ... Read More »

वृक्ष संवर्धन ः गरज काळाची!

माधुरी रं. शे. उसगावकर निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं… आज हाच माणूस आपल्या उपकारकर्त्यावर उलटला आहे. मनमोही पावसाने निसर्गासारखेच माझ्या अंतर्मनाला मोहविले आहे. झिमझिमणार्‍या पावसात सृष्टीचे सुजलाम् सुफलाम् रूप न्याहाळताना नकळत तुकाराम महाराजांचे भावमधुर काव्य आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सुरेल स्वरांचा साज लाभलेले कर्णमधुर ... Read More »

‘रिस्पेक्ट’ मिळत नाही…

अनुराधा गानू आजच्या पिढीचे हेच दुर्दैव आहे की ‘पैसा’ म्हणजेच ‘मान’ असंच समीकरण त्यांना शिकवलं गेलंय. गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळत नाही म्हणजे रिस्पेक्ट नाही असंच त्यांना वाटतं. आपण मोठी माणसं त्यांना कसा आशीर्वाद देतो लक्षात घ्या, ‘बाबा, शिकून खूप मोठा हो, मोठ्या पगाराची नोकरी मिळव.’ हल्लीच नातवाचं आणि माझं बोलणं चालू होतं. १०वी पास झालाय. ११वीला ऍडमिशन घेतलीय. मला म्हणाला, ... Read More »

केवळ नाचक्की!

गोव्यातील कॉंग्रेसमधून झालेल्या दहा जणांच्या घाऊक पक्षांतरामुळे भारतीय जनता पक्षाची आम जनतेमध्ये सध्या केवळ छीःथू चाललेली दिसते. भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनाही पक्षाचा हा निर्णय रुचलेला नाही. जी मंडळी भाजपाच्या आसर्‍याला आलेली आहेत, ती पक्षाच्या विचारधारेकडे, मोदींकडे वा मुख्यमंत्र्यांकडे आकृष्ट होऊन आलेली नाहीत. त्यांना केवळ सत्ता हवी आहे म्हणून स्वतःच्या फायद्यासाठीच ते आलेले आहेत. कॉंग्रेस विधिमंडळ गटाचे नेते बाबू कवळेकर हे त्यांच्यामध्ये ... Read More »

हरितक्रांती गोव्यात क्रांती घडवेल!

शंभू भाऊ बांदेकर खाण उद्योग बंद झाल्यामुळे राज्य वा केंद्र सरकारला हजारो कोटींच्या महसुलास मुकावे लागले आहे. हा उद्योग पुन्हा कधी सुरू होईल याचा अंदाज कुणालाच नाही. म्हणून खाण उद्योगाला शेती हा पर्यायी उद्योग म्हणून या भूमीत कसा रुजू शकेल यावर गांभीर्याने विचार करणे जरुरीचे आहे. १८ जूनला- क्रांतिदिनानिमित्त जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात क्रांतीपर्व साकारण्यासाठी ... Read More »