ब्रेकिंग न्यूज़

Monthly Archives: July 2019

‘गोवा पथदीप धोरण’ आखणार

>> वीज मंत्र्यांची माहिती : राज्यात पथदीपांची समस्या बनली गंभीर गोवाभरातील पथदीपांच्या देखभालीसाठी वार्षिक फक्त एक कोटी रू. एवढाच निधी मिळतो. या पथदीपांची वीज बिले पंचायती व नगरपालिका फेडत नसून तिही एक मोठी समस्या बनून राहिली आहे. राज्यातील पथदीपांचा विषय हा गंभीर असून त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकार गोवा पथदीप धोरण तयार करणार असल्याची माहिती काल वीज मंत्री नीलेश काब्राल यांनी ... Read More »

ऑक्टोबर नंतर सोनसडो येथील कचर्‍याची विल्हेवाट लावणार

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती सोनसडो मडगाव येथील कचर्‍याच्या प्रश्‍नावरून विधानसभेत गरमा गरम चर्चा झाली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कचरा विल्हेवाटीस आवश्यक सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले असून गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ ऑक्टोबर महिन्यानंतर सोनसडोवरील कचरा डंपच्या विल्हेवाटीला सुरुवात करणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. दरम्यान, चर्चेच्या वेळी पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल, कुडतरीचे आमदार आलेक्स ... Read More »

साळावली धरण अखेर बुधवारी रात्रौ १० वाजून २० मिनिटांनी पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले. Read More »

जेसन रॉय कसोटी संघात

लॉडर्‌‌स मैदानावर आयर्लंडविरुद्ध २४ जुलैपासून होणार्‍या चारदिवसीय कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या एकदिवसीय संघाचा सलामीवीर जेसन रॉय याची निवड केली आहे. इंग्लंडच्या विश्‍वविजेतेपदात महत्त्वाचा वाटा उचलल्यामुळे कसोटी संघाचे दार प्रथमच त्याच्यासाठी उघडण्यात आले आहे. दुखापतीमुळे जोफ्रा आर्चरचे कसोटी पदार्पण मात्र लांबले आहे. ऍशेस मालिकेसाठी आर्चर तंदुरुस्त रहावा यासाठी इंग्लंड क्रिकेट मंडळाने आयर्लंडविरुद्धच्या १३ सदस्यीय संघात त्याला निवडणे टाळले आहे. आपला सरेचा ... Read More »

भारत, कतार एकाच गटात

‘फिफा २०२२ विश्‍वचषक’ स्पर्धेच्या आशियाई पात्रता स्पर्धेसाठी भारताचा समावेश आशियाई चॅम्पियन कतारसोबत करण्यात आला आहे. कतारव्यतिरिक्त ओमान, अफगाणिस्तान व बांगलादेश यांचा या ‘ई’ गटात समावेश आहे. या किचकट गटातून कतार संघाची आगेकूच निश्‍चित असून दुसर्‍या स्थानासाठी भारताला गल्फ कप विजेता ओमान व अफगाणिस्तान यांच्याकडून कडवा प्रतिकार अपेक्षित आहे. २०१८ विश्‍वचषक पात्रता स्पर्धेतही भारताला ओमानविरुद्ध झुंजावे लागले होते. त्यावेळी या अरब ... Read More »

भारताचा सामना पाकिस्तानशी

श्रीलंका बेसबॉल महासंघाने आशियाई बेसबॉल महासंघाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या पश्‍चिम अशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. तर दुसर्‍या उपांत्य लढतीत इराणचा संघ यजमान श्रीलंकेशी दोन हात करणार आहे. १५ जुलैपासून खेळविण्यात येत असलेली सदर स्पर्धा २० जुलैपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेसाठी भारत, नेपाळ व श्रीलंका यांचा एका गटात तर पाकिस्तान, इराण व बांगलादेश यांचा ... Read More »

दोषी कोण?

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये काल एक जुनी इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. मुंबईसाठी हे काही नवीन नाही. दरवर्षी पावसाळ्यात अशी एखादी भीषण दुर्घटना होतेच होते. दुर्घटना तर भीषण असतेच, परंतु त्यानंतर त्यामागची जी कारणे समोर येतात ती त्याहून भीषण असतात. काल कोसळलेल्या इमारतीच्या बाबतीतही तसेच झाले आहे. मुंबईच्या डोंगरी नावाच्या अत्यंत दाटीवाटीच्या भागात ही इमारत दुर्घटना घडली. दाटीवाटी एवढी की ... Read More »

लोकन्यायालयांचे यश

ऍड. प्रदीप उमप देशभरातील न्यायालयांमध्ये साडेतीन कोटींहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. यात सामंजस्याने निकाली निघू शकतील, अशा असंख्य प्रकरणांचा समावेश असतो. छोटे-मोठे वाद, महसुली आणि कौटुंबिक प्रकरणे लोकन्यायालयांच्या माध्यमातून निकाली काढणे शक्य झाल्यास न्यायालयांवरील बोजा कमी होईल. लोकन्यायालयांच्या माध्यमातून एकाच दिवसात ६१ हजार प्रकरणे निकाली निघाल्याची राजस्थानातील घटना यासाठीच महत्त्वपूर्ण ठरते. लोकन्यायालयाच्या माध्यमातून एकाच दिवसात ६१ हजार प्रकरणे निकाली निघण्याची ... Read More »

१३०० पोलिसांच्या भरतीची प्रक्रिया सुरू

>> पुढील महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करणार पोलीस खात्यातर्फे १३०० पोलीसांची भरती करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून पुढील महिन्यात त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत सांगितले. काल प्रश्‍नोत्तराच्या तासाला मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी मडगाव पोलीस स्थानकावर पोलिसांची संख्या कमी असून तेथे आणखी पोलीस देण्याची मागणी करणारा प्रश्‍न उपस्थित केला असता सावंत यांनी वरील माहिती ... Read More »

ड्रग्समध्ये गुंतलेल्यांची गय नाही ः मुख्यमंत्री

अमली पदार्थ व्यवसायात गुंतलेल्यांची सरकार गय करणार नसल्याचे काल गुहमंत्री प्रमोद सावंत यानी विधानसभेत सांगितले. ‘झिरो टॉलरन्स टू ड्रग्ज’ हे आमच्या सरकारचे धोरण असल्याचे सांगताना गोव्याच्या पर्यटनासाठी आम्हाला अमली पदार्थांची गरज नाही, असेही सावंत यांनी सांगितले. काल प्रश्‍नोत्तराच्या तासाला आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी हा प्रश्‍न विचारला होता. यावेळी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा म्हणाले की गोव्यातील युवक समुद्र किनारे, निर्जन डोंगर अशा ... Read More »