Daily Archives: July 30, 2019

सुवर्णमध्य हवा

चेन्नईच्या नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंटने सादर केलेला गोव्याच्या किनारी व्यवस्थापन आराखड्याचा मसुदा मंत्री व आमदारांनी दर्शविलेल्या एकमुखी विरोधानंतर सरकारने फेटाळला असूनही राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांना ठिकठिकाणी ज्या प्रकारे हुल्लडबाजीला सामोरे जावे लागत आहे ते पाहाता या विषयाचे निव्वळ राजकीय भांडवल चालले असावे अशी दाट शंका येते. प्रस्तावित आराखड्यासंबंधी शंकाकुशंका असलेली जनता एकीकडे आणि सदैव शंकाकुशंकांचा बागुलबुवा उभा करून निव्वळ ... Read More »

त्वचाविकार आणि आयुर्वेद भाग – ६

डॉ. स्वाती हे. अणवेकर (म्हापसा) रोगाच्या प्रसर अवस्थेत लक्षणांची तीव्रता अधिक असते कारण ह्या अवस्थेत दोष त्यांच्या स्थानिक जागेतून अर्थात ते जिथे वाढलेले असतात तिथेच न राहता अन्य भागात पोहोचतात व तिथे तीव्र स्वरुपाची लक्षणे उत्पन्न करतात. व्याधी उत्पन्न होण्यापूर्वीची तिसरी अवस्था म्हणजे प्रसर होय. या अवस्थेचे वैशिष्ट्य असे की प्रकोप अवस्थेत जे दोष असतात ते पुढे जाऊन शरीरातील एका ... Read More »

स्तन्यपानाबद्दल गैरसमज दूर व्हावेत

 डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी, म्हापसा) ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा ‘जागतिक स्तन्यपान सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. स्तन्यपान हा प्रत्येक बालकाचा हक्क आहे. यासाठी स्तन्यपानाबद्दलच्या सर्व गैरसमजुती दूर करुन बाळंतिणीने स्वतःच्या आहार -आचरणाकडे लक्ष द्यावे. स्तन्यपान करत असताना बाळंतिणीच्या शरीरात ‘ऑक्सिटोसिन’ या संप्रेरकाचे स्रवण होते. बाळंतपणात गर्भाशयाचा वाढलेला आकार कमी होण्यास या संप्रेरकामुळे मदत मिळते. बाळंतपणात स्रीचे वाढलेले वजन ... Read More »

खाप पंचायत आणि सामाजिक दुष्परिणाम

देवेश कु. कडकडे आशा आणि विश्‍वास ठेवण्यास निश्‍चित जागा अहे की आणखी काही वर्षात अशी कृत्ये बंद होतील. परंतु हे तेव्हाच शक्य आहे. जेव्हा सारा देश सामूहिकरित्या अशा प्रकारांकडे एक कलंक म्हणून पाहील आणि पूर्ण सभ्य समाज एका स्वरात त्याची निर्भर्त्सना करील. एकविसावे शतक हे प्रत्येक नागरिकाचे हक्काचे रक्षण करणारे आहे असे म्हटले जाते. आपल्या संस्कृतीचा मोठा भाग हा गावात ... Read More »

शालेय कला गुण योजना यंदापासून सुरू

>> मंत्री गोविंद गावडेंची घोषणा ः ‘संजीवनी’ बंद करणार नाही ः घुमट वारसा वाद्य होणार कला व संस्कृती खात्याची शालेय कलागुण योजना चालू शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित केली जाणार आहे, अशी घोषणा कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी विधानसभेत काल केली. कला व संस्कृती, नागरी पुरवठा, आदिवासी खात्याच्या अनुदानित पुरवणी खात्यांच्या मागण्यावरील चर्चेला ते उत्तर देत होते. कला गुण ... Read More »

येडीयुरप्पा यांनी बहुमत सिद्ध केले

>> सभापती रमेश कुमार यांचा पदत्याग कर्नाटकमधील बी.एस. येडीयुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने काल विधानसभेत मांडलेला विश्‍वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने जिंकला. येडीयुरप्पा यांनी विधानसभेच्या पटलावर बहुमत सिद्ध केल्यानंतर लगेच सभापती रमेश कुमार यांनी पदत्याग केला. रविवारी सभापती रमेश कुमार यांनी १४ बंडखोर आमदारांना अपात्र जाहीर केल्यानंतर एकूण अपात्र आमदारांची संख्या १७ झाल्याने विधानसभेचे संख्याबळ कमी होऊन सरकारला बहुमत सिद्धतेसाठी १०४ ... Read More »

कोमुनिदादींच्या जमीन व्यवहारांची सरकार सखोल चौकशी करणार

राज्यातील सर्व कोमुनिदादच्या जमीन व्यवहारांची चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत बोलताना काल दिली. दक्षता खात्याशी संबंधित एका प्रश्‍नावरील चर्चेच्या वेळी रोहन खंवटे यांनी उपस्थित केलेल्या सेरुला कोमुनिदादमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणावर बोलताना सावंत यांनी वरील माहिती दिली. सेरूला कोमुनिदादमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणी योग्य चौकशी केली जाणार आहे. संबंधित अधिकार्‍याविरोधात कारवाईसाठी खातेनिहाय प्रक्रिया सुरू करण्यात ... Read More »

उन्नाव बलात्कार पीडितेच्या कारला अपघात ः पीडिता गंभीर

>> भाजप आमदारावर एफआयआर नोंद उन्नाव (उत्तर प्रदेश) बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीच्या कारला काल झालेल्या अपघातप्रकरणी संशयित आरोपी भाजप आमदार कुलदिप सिंह सेनगर, त्याचा भाऊ व अन्य आठजणांविरुद्ध पोलिसांनी एफआयआर नोंदविले आहे. पीडित तरुणी व तिच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी तीन पोलीस तैनात असतात. मात्र अपघातावेळी एकही पोलीस त्यांच्यासोबत नव्हता असे उन्नावचे पोलीस अधीक्षक एम. पी. वर्मा यांनी सांगितले. रायबरेली येथे बलात्कार ... Read More »

मच्छीमारी जेटींवर ‘माफिया राज’

>> चौकशी व कारवाईचे मंत्र्यांचे आश्‍वासन सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी मालिम जेटीवर माङ्गिया राज आणि गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप काल विधानसभेत केली. मालिम जेटीवर गोमंतकीय मच्छीमारांवर अन्याय केला जात असून याप्रकरणी चौकशीची मागणी आमदारांनी केली. या प्रकरणी पोलिसांच्या सहकार्याने सखोल चौकशी करण्याचे आश्‍वासन मच्छीमारी मंत्री ङ्गिलीप नेरी रॉड्रीगीस यांनी प्रश्‍नाला उत्तर देताना दिले. नीळकंठ हर्ळणकर यांनी यासंबंधीचा मूळ प्रश्‍न ... Read More »

मंत्री गावडेंच्या निषेधार्थ सुदिन ढवळीकरांचा सभात्याग

मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी खासदार आझम खान यांनी भाजप खासदार रमा देवी यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा काल गोवा विधानसभेत निषेध केला. तसेच कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी जानेवारी २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये वापरलेल्या जातिवाचक शब्दाचा निषेध करून काल सभात्याग केला. आमदार ढवळीकर यांनी शून्य तासानंतर हा मुद्दा उपस्थित केला. ... Read More »