Daily Archives: July 29, 2019

बायंगिणीचा तिढा

क्षुद्र राजकीय फायद्यासाठी वा आपल्या हितसंबंधांसाठी काही राजकारण्यांकडून राज्याच्या हिताकडे कसा काणाडोळा केला जातो याचे जिवंत उदाहरण म्हणजे बायंगिणीचा कचरा प्रकल्प. गेले जवळजवळ एक तप हा प्रकल्प हितसंबंधियांच्या विरोधामुळे रखडला आहे आणि आताही या प्रकल्पाच्या कार्यवाहीत खो घालण्याचे प्रयत्न चालले आहेत. या प्रकल्पाचे घोडे असे रखडलेले असताना त्यानंतर साळगावात दिमाखदार कचरा प्रक्रिया प्रकल्प उभा राहिला देखील आणि आता काकोडा येथेही ... Read More »

गोव्याच्या राजकारणाची ऐशी की तैशी

शंभू भाऊ बांदेकर पं. जवाहरलाल नेहरू यांनी एकदा ‘अजीब है ये गोवा के लोग’ असे म्हटले होते. ते गोव्यातील गेल्या दहा बारा वर्षातील राजकारणात ज्यांनी चंचुप्रवेश करून मग मुसळ प्रवेश केला आणि गोंय, गोंयकारपणाच्या नावाखाली गोव्याचे व गोंयकारांचे धिंडवडे काढून येथील राजकारणीही किती अजीब आहेत हे दाखवून दिले आहे. आपला गोवा हा येथील निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारे, मंदिरे, चर्च, धबधबे आणि येथील ... Read More »

कर्नाटकमधील १४ बंडखोर आमदार अपात्र

>> सभापती रमेशकुमार यांची पत्रकार परिषदेत घोषणा : आधी केले होते तिघांना अपात्र कर्नाटक राज्य विधानसभेचे सभापती रमेश कुमार यांनी काल घाईघाईत बोलावलेल्या एका पत्रकार परिषदेत पक्षांतरविरोधी कायद्याखाली आणखी १४ बंडखोर आमदारांना विधानसभेच्या २०२३ च्या मुदतीपर्यंत अपात्र केल्याची घोषणा केली. तीन बंडखोर आमदारांना याआधीच त्यांनी अपात्र जाहीर केले होते. त्यामुळे २२४ आमदारांच्या या विधानसभेतील अपात्र आमदारांची एकूण संख्या १७ झाली ... Read More »

ज्येष्ठ कॉंग्रेस नेते जयपाल रेड्डी यांचे निधन

>> शासकीय इतमामात आज होणार अंत्यसंस्कार; पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून दु:ख व्यक्त कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी येथील एका इस्पितळात उपचारांदरम्यान निधन झाले. उत्कृष्ट वक्ते म्हणून नावाजलेले रेड्डी पाच वेळा लोकसभेचे खासदार म्हणून निवडले गेले. तसेच राज्यसभेचे दोन वेळा खासदार होण्यासह आंध्रप्रदेशचे चार वेळा ते आमदारही बनले. आणिबाणी लागू करण्यास विरोध करून ते ... Read More »

किनारी व्यवस्थापन आराखडाप्रश्‍नी सरकारकडून फसवणूक : कॉंग्रेस

नव्या किनारी व्यवस्थापन आराखडा प्रकरणी (सीझेडएमपी) गोवा सरकार जनतेची फसवणूक करीत असल्याचा आरोप काल कॉंग्रेसने केला. पक्षाचे प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो म्हणाले की सरकारातील काही मंत्रीच अप्रत्यक्ष वा प्रत्यक्षपणे किनारपट्टीवरील जमीन विक्रीत गुंतलेले आहेत. या जमिनी विकता याव्यात यासाठी हे मंत्री भरती रेषा निश्‍चित करण्यास विलंब करीत असून ती आपणाला पाहिजे तशी मागे पुढे घेऊ लागले असल्याचा आरोप डिमेलो यांनी काल ... Read More »

मेहबुबा मुफ्ती यांचा केंद्र सरकारला इशारा

घटनेतील कलम ३५ ए च्या रक्षणासाठी आपल्या पीपल्स डेमॉक्रेटिक पक्षाच्या (पीडीपी) कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे आवाहन या पक्षाच्या नेत्या तथा माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी काल येथे केले. पक्षाच्या एका जाहीर सभेत त्या बोलत होत्या. हे कलम हटविण्याच्या विरोधात त्यांनी केंद्र सरकारला इशारा दिला. जम्मू काश्मीरमधील मूळ नागरिकांना या कलमामुळे मिळणारे खास अधिकार वरील कलम हटविले गेल्यास रद्द होणार असल्याचे ... Read More »

लंकेचा मालिका विजय

>> बांगलादेशविरुद्धचा दुसरा सामना ७ गडी राखून जिंकला यजमान श्रीलंकेने दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशचा ७ गडी व ३२ चेंडू राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. बांगलादेशचा डाव ८ बाद २३८ धावांत रोखल्यानंतर लंकेने विजयी लक्ष्य ४.४ षटकांत गाठले. आपले दुसरे एकदिवसीय अर्धशतक ठोकत ७५ चेंडूंत ८२ धावा केेलेला अविष्का फर्नांडो सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. मालिकेतील ... Read More »

पॅरिश युथ नुवेला ‘सुपर सॉकर’ जेतेपद

पॅरिश युथ नुवेने स्पोर्टिंग क्लब दवर्लीचा काल रविवारी टायब्रेकरद्वारे ५-३ असा पराभव करत ३०व्या सुपर सॉकर आंतरग्राम फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. युनायटेड बॉईज ऑफ दांडो कोलवा यांनी बाणावली येथील सेंट जॉन दी बाप्तिस्टा मैदानावर या स्पर्धेचे आयोजन केले होते. निर्धारित वेळेत उभय संघ १-१ असे बरोबरीत होते. जेसन वालिस याने ४७व्या मिनिटाला एससी दवर्लीला आघाडीवर नेणारा गोल झळकावला तर निकलाव ... Read More »

रस्ते नव्हे; मृत्यूचे सापळे!

  – प्रमोद ठाकूर रस्त्यांवरील खड्‌ड्यांची दगड आणि मातीचा वापर करून तात्पुरती डागडुजी केली जात आहे. परंतु पाऊस पडल्यानंतर खड्‌ड्यांत घालण्यात येणारी माती वाहून जात असल्याने रस्ता चिखलमय होत आहे. तसेच खड्‌ड्यांच्या दुरुस्तीसाठी घातलेले दगड वाहनचालकांसाठी डोकेदुखी बनत आहेत. खड्‌ड्यांतील दगडांमुळे दुचाकी वाहनचालकांना घसरून अपघात होत आहेत. याबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने वाहनचालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.   ... Read More »

तरुण तुर्काचा वेधक राजकीय प्रवास चंद्रशेखर ः द लास्ट आयकॉन ऑफ आयडियॉलॉजीकल पॉलिटिक्स

एडिटर्स चॉइस – परेश प्रभू   त्यांच्यातल्या बंडखोराला त्यांना दूर सारता आले नाही. ‘तरुण तुर्क’ ही त्यांची ओळखही त्यांच्या सोबत कायम राहिली. हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे या आठवड्यात हाती आलेले श्री. चंद्रशेखर यांचे सुंदर, विस्तृत चरित्र. हा केवळ चंद्रशेखर यांच्या राजकीय प्रवासाचा लेखाजोखा नाही. एका परीने भारताचाच हा सारा राजकीय इतिहास आहे!     भारताचे आठवे पंतप्रधान श्री. चंद्रशेखर ... Read More »