Daily Archives: July 27, 2019

आरक्षण नव्हे, गुणवत्ता!

गोव्यात खासगी क्षेत्रातील ८० टक्के नोकर्‍या गोमंतकीयांसाठी राखीव ठेवणारा कायदा करणे शक्य नाही अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत केली. मात्र, स्थानिकांना रोजगारात प्राधान्य मिळावे यासाठी अन्य पर्यायांचा अवलंब केला जाऊ शकतो असेही ते म्हणाले. स्थानिकांना रोजगाराचा हा मुद्दा खरे तर आजवरच्या प्रत्येक विधानसभा अधिवेशनात चर्चेला येत असतो. सरकार स्थानिकांना रोजगारात आरक्षण मिळवून देण्यासाठी काय करणार आहे हा ... Read More »

दोन दशकांनंतर कारगिलच्या आठवणी

कर्नल अभय पटवर्धन कारगिल युद्धाचा सामरिक उहापोह करणारे खूप लिखाण झाले असले, तरी मानवी दृष्टिकोनातून याबद्दल फार कमी लिहिले गेले आहे. या युद्धात सक्रिय कार्यरत असल्यामुळे मला काही अनुभव आले, माहिती मिळाली. त्या अनुषंगाने आणि कारगिल युद्धाला २० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने या युद्धातील काही शूरवीर योध्दयांची आठवण काढताना, त्यांना आदरांजली वाहाताना ऊर भरुन आला आहे… मे ते जुलै ... Read More »

बायंगिणीत दुर्गंधीमुक्त कचरा प्रकल्प

>> मंत्री मायकल लोबो यांचे विधानसभेत आश्‍वासन >> २५० टन क्षमतेचा अत्याधुनिक प्रकल्प बायंगिणी, ओल्ड गोवा येथील जागेत कचर्‍यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करणारा २५० टन क्षमतेचा अत्याधुनिक कचरा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या कचरा प्रकल्पातून विजेची निर्मिती केली जाणार आहे. या कचरा प्रकल्पामुळे स्थानिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागणार नाही. दोन वर्षांत प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती ... Read More »

मुसळधार पावसाने काल दोडामार्ग तालुक्याला झोडपले. आंबेली धबधब्याकडे जाताना साटेली – भेडशी येथे कॉजवे पुलावर पाण्यात अडकलेली कळंगुट येथील कार. या दुर्घटनेतील कारमधील चारजणांना स्थानिकांनी वाचविले. Read More »

सेझ कंपन्यांच्या ताब्यातील ३८ लाख चौ. मी. जमीन परत

>> उद्योगमंत्र्यांची माहिती राज्याच्या हितासाठीच सेझवाल्यांना व्याजासकट त्यांचे पैसे परत करून सरकारने त्यांच्या ताब्यात असलेली ३८ लाख चौरस मीटर एवढी जमीन ताब्यात घेतल्याचे उद्योगमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल विधानसभेत सांगितले. प्रश्‍नोत्तराच्या तासाला विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली. अशा प्रकारे व्याजासकट पैसे फेडण्याची तरतूद कायद्यात आहे काय, असा सवाल यावेळी कामत यांनी केला ... Read More »

बाबुशवरील आरोप निश्‍चिती २९ ऑगस्टपर्यंत लांबणीवर

>> कथित बलात्कार प्रकरण येथील उत्तर गोवा प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाने पणजीचे भाजप आमदार बाबुश मोन्सेर्रात यांच्यावरील अल्पवयीन मुलीवरील कथित बलात्कार प्रकरणी आरोप निश्‍चिती २९ ऑगस्टपर्यंत तहकूब केली आहे. दरम्यान, आमदार मोन्सेर्रात यांनी याप्रकरणी दाखल केलेली उच्च न्यायालयातील आव्हान याचिका मागे घेतली आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी आमदार बाबुश मोन्सेर्रात यांच्यावर आरोप निश्‍चित करण्याचा आदेश ... Read More »

कर्नाटकात पुन्हा भाजपची सत्ता

>> येडियुरप्पा मुख्यमंत्रिपदी कर्नाटकात कॉंग्रेस-जेडीएस युतीचे कुमारस्वामी सरकार कोसळल्यानंतर पुन्हा एकदा भाजपचे कमळ ङ्गुलले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा चौथ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री विराजमान झाले. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राज्यपालांनी ३१ जुलैपर्यंत त्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. कर्नाटकातील एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जेडीएस-कॉंग्रेस आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर भाजपचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला ... Read More »

इंग्लंडच लॉडर्‌‌स!

>> आयर्लंडचा दुसरा डाव ३८ धावांत आटोपला इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या १८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडचा दुसरा डाव अवघ्या ३८ धावांत संपला. यामुळे इंग्लंडने या चार दिवसीय कसोटीच्या तिसर्‍याच दिवशी १४३ धावांनी विशाल विजय साकार केला. दुसर्‍या डावात जेम्स मॅक्कलमने सर्वाधिक ११ धावा केल्या. इंग्लंडचा गोलंदाज क्रिस वोक्सच्या भेदक मार्‍यापुढे आयर्लंडच्या फलंदाजांनी अक्षरश: नागी टाकली. ख्रिस वोक्सने ७.४ षटकांत १७ ... Read More »

लंकेचा ९१ धावांनी विजय

कुशल परेराचे पाचवे एकदिवसीय शतक तसेच आपला शेवटचा सामना खेळणार्‍या लसिथ मलिंगाने घेतलेल्या तीन बळींच्या जोरावर काल शुक्रवारी श्रीलंकेने बांगलादेशचा ९१ धावांनी पराभव केला. या विजयासह यजमानांनी तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने विजयासाठी ठेवलेल्या ३१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव २२३ धावांत संपला. नाणेफेकीचा कौल जिंकून लंकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशने अविष्काला बाद करत ... Read More »

भक्तीने अजिंक्यपद राखले

>> राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धा गोव्याची वुमन ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णीने कराईकुडी-तामिळनाडू येथील चेत्तिनाड पल्बिक स्कूलमध्ये कॅसल चेस अकादमीतर्फे आयोजित ४६व्या राष्ट्रीय महिला बुद्धिबळ २०१९ स्पर्धेचे अजिंक्यपद यशस्वीरित्या आपल्याकडे कायम राखले. नवव्या फेरीअंती भक्ती ८.५ गुणांसह आघाडीवर होती आणि तिला जेतेपदासाठी केवळ एक गुणाची आवश्यकता होती. काल झालेल्या दहाव्या फेरीत भक्तीने प्रियांका के. हिला पराभूत करीत पूर्ण एका गुणाची कमाई करीत ... Read More »