Daily Archives: July 22, 2019

सुजाण, सुसंस्कृत

एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या निधनाची दखल संपूर्ण देशाकडून घेतली जाणे हे फार क्वचितच घडते आणि त्यात ते राज्य छोटे असेल तर असे होणे अधिकच दुर्मीळ असते. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनाची दखल संपूर्ण देशाने घेतली होती, परंतु त्यामध्ये त्यांची संरक्षणमंत्रिपदाची सफल कारकीर्द हाही एक भाग होता. नुकत्याच दिवंगत झालेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री दीक्षित यांच्या बाबतीत मात्र त्यांची कारकीर्द केवळ दिल्लीपुरती ... Read More »

भाजपच्या दक्षिण दिग्विजयाचा पुनःश्च हरिओम?

ल. त्र्यं. जोशी शुक्रवारी सायंकाळपर्यंत कर्नाटकातील कॉंग्रेस आणि जदसेचे कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार विधानसभाध्यक्षांच्या मदतीने शक्तिपरीक्षण टाळू शकले असले तरी ते आता भाजपाच्या दक्षिण दिग्विजयाचा पुनःश्च हरिओम करण्याचा मार्ग रोखू शकेल अशी शक्यता मुळीच दिसत नाही. राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही घडू शकत असले तरी परिस्थिती इतकी पुढे गेली आहे की, बंडखोरांना परत ङ्गिरण्यात काहीच स्वारस्य उरलेले नाही. शुक्रवारी सायंकाळपर्यंत कर्नाटकातील ... Read More »

कोलवाळचे एटीएम पळवून १०.६६ लाख लुटले

>> चोरीमागे ६ अज्ञात बुरखाधारी चोरटे >> रेवोड्यातील जंगलात सापडले पोलिसांना एटीएम कोलवाळ येथील श्रीराम मंदिरासमोर असलेल्या एच. डी. एफ्. सी. बँकेचे एटीएम मशिन अज्ञात सहा बुरखाधारी चोरट्यांनी रविवारी पहाटे २.२० च्या दरम्यान पळविले. त्यात अंदाजे १० लाख ६६ हजारांची रक्कम होती. दरम्यान, एटीएम मशिन सुमारे ४ कि. मी. अंतरावर रेवोडा येथील रानात फोडलेल्या अवस्थेत म्हापसा पोलिसांना सापडले आहे. म्हापसा ... Read More »

मांडवी नदीचे कॅसिनो बेटामध्ये रूपांतर करण्याचा सरकारचा घाट

>> गिरीश चोडणकर यांचा आरोप भाजप सरकार मांडवी नदीचे कॅसिनो बेटामध्ये रूपांतर करण्यासाठी प्रयत्न करीत आहे, असा आरोप गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी कॉंग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केला. डेल्टा कॅसिनो कंपनी मांडवी नदीतील जहाज बदलण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्नशील आहे. या कंपनीचे नवीन जहाज बंदर कप्तानाच्या नियमावलीच्या मार्गदर्शक तत्त्वात बसत नाही. बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो ... Read More »

राज्यात आतापर्यंत ६४ इंच पाऊस

राज्यात मागील आठ – दहा दिवसांत पडलेल्या जोरदार पावसामुळे मोसमी पावसाची तूट भरून निघाली असून आत्तापर्यंत ६३.९४ इंच पावसाची नोंद झाली आहे. सांगे तालुक्यात सर्वाधिक ७१.८३ इंच पावसाची नोंद झाली आहे. वाळपई येथे जोरदार पावसाची नोंद झाली आहे. परंतु, तेथील पावसाची माहिती गेल्या कित्येक दिवसांपासून उपलब्ध होत नाही. राज्यात यावर्षी मोसमी पावसाचे पंधरा दिवस उशिराने आगमन झाले होते. यंदा सुरूवातीला ... Read More »

भजनाचार्य सोमनाथबुवांना अखरेचा निरोप

भजनाचार्य पं. सोमनाथबुवा च्यारी यांना आज त्यांचे शिष्य, चाहते, मित्रमंडळी यांनी अखेरचा निरोप दिला. रायबंदर येथील मुक्तीधाम स्मशानभूमीत त्यांची अंत्ययात्रा टाळ-मृदंगाच्या गजरात दुपारी दीड वाजता निघाली. श्रीराम जयराम जयजय रामचा अखंड गजर चालू होता. स्मशानभूमीत त्यांच्या शिष्यमंडळीने आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, निरोप घेता देवा आम्हा आज्ञा असावी, हे सोमनाबुवांचे औचित्यपूर्ण अभंग म्हटले. उभी हयात ज्यांनी भजनसेवेत घालवली त्या सोमनाथबुवांच्या ... Read More »

दाबोळी विमानतळावर ५६ लाखांचे सोने पकडले

दाबोळी विमानतळावर कस्टम अधिकार्‍यांनी केलेल्या कारवाईत ताझाकिस्तान – दुबईमार्गे गोव्यात आलेल्या तीन विदेशी महिला प्रवाशांकडून वेगवेगळ्या भागात लपवून ठेवलेले १७८७ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. या एकूण सोन्याची किंमत ५६ लाख ३८ हजार एवढी होत आहे. कस्टम आयुक्त आर. मनोहर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताझाकिस्तान देशातील तीन महिला एअर इंडियाच्या एआय – ९९४ या विमानातून पहाटे गोव्यात दाबोळी विमानतळार उतरल्या होत्या. ... Read More »

विंडीज दौर्‍यासाठी टीम इंडियाची घोषणा

>> तरुण खेळाडूंना संधी >> हार्दिक पंड्याला विश्रांती विंडीज दौर्‍यासाठी भारताच्या कसोटी, वनडे व टी-ट्वेंटी संघांची काल रविवारी घोषणा करण्यात आली. निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये निवड समितीची बैठक झाली. कर्णधार विराट कोहली हा देखील या बैठकीला उपस्थित होता. या बैठकीनंतर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषदेत नव्या संघाची घोषणा करण्यात आली. भारताचा ... Read More »

सेंट अँथनी कोलवाला स्ट्रायकर्स करंडक

सेंट अँथनी क्लब कोलवा यांनी सेंट अँथनी स्पोटर्‌‌स क्लब असोल्डाचा टायब्रेकरवर ३-१ असा पराभव करत ३४व्या स्ट्रायकर्स करंडक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यंग स्ट्रायकर्स बाणावलीने दांडो मैदानावर या स्पर्धेचे आयोजन केले होते. निर्धारित वेळेत असोल्डाचा संघ सामना सहज जिंकणे अपेक्षित होते. परंतु, गमावलेल्या संधींचा फटका त्यांना बसला. पेनल्टी शूटआऊटवर कोलवाने सरस खेळ दाखवत बाजी मारली. सामन्याच्या पहिल्या पंधरा मिनिटातच असोल्डाला ... Read More »

 भारतीय गायीचे अर्थशास्त्र

डॉ. उदय देशमुख सरकारने विविध प्रकारच्या सवलती देऊनसुद्धा गोपालन हा तोट्याचा विषय बनला आहे. कारण आज गोपालन व शेती हे एकमेकांस पूरक व्यवसाय म्हणून बघितले जात नाहीत. बहुतेक लोकांना गायीच्या दुधाला मूल्य मिळते एवढेच माहिती असते; परंतु ‘गोमय’ आणि ‘गोमूत्र’ यांपासून दुधापेक्षाही अधिक अर्थलाभ करून घेता येतो, हे माहीत नाही. त्यामुळे स्वावलंबी गोशाळा आपल्या गोव्याच्या प्रत्येक गावात जर कार्यरत होऊ ... Read More »