Daily Archives: July 20, 2019

अखेर सजा!

अकरा वर्षांपूर्वी गोव्यातच नव्हे, तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ माजवलेल्या स्कार्लेट कीलिंग मृत्यूप्रकरणात अखेर दोनपैकी एका आरोपीला दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची सजा उच्च न्यायालयाने काल सुनावली. या हत्येची भीषणता पाहता या नराधमाला झालेली शिक्षा कमीच आहे, परंतु यापूर्वी बाल न्यायालयाने आरोपींना निर्दोष ठरवले होते, त्या पार्श्वभूमीवर किमान त्यापैकी एकटा दोषी सिद्ध झाला हेही नसे थोडके असेच या घडीस म्हणावे लागेल. ... Read More »

इम्रानचा स्विंगर, ट्रम्पचा त्रिङ्गळा!

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) दोन वर्षांच्या रुसव्याफुगव्या व दुराव्यानंतर पाकिस्तानने थोडा राजकीय व सामरिक धोका पत्करून, थोडे अमेरिकेच्या कलाने वागून आशियातील दहशतवादी सारीपाटाच्या खेळात परत एकदा भागीदार होण्याची संधी मिळवली आहे, किंबहुना अशी संधी खेचून आणली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे,पाकिस्तानने मागील अनेक दशके ज्यावर काहीही उत्तर शोधले नाही त्या प्रश्नाला तो सोडवू शकेल अशी भाबडी आशा ट्रम्पच्या मनात आहे. ऑगस्ट ... Read More »

स्कार्लेट खूनप्रकरणी आरोपी सॅमसनला १० वर्षे तुरुंगवास

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ब्रिटिश अल्पवयीन मुलगी स्कार्लेट किलिंग खून आणि बलात्कार प्रकरणी आरोपी सॅमसन डिसोझा याला १० वर्षे सक्तमजुरी आणि २.६० लाखांच्या दंडाची शिक्षा जाहीर केली. या प्रकरणी न्यायालयाने सॅमसन डिसोझा याला १७ जुलैला दोषी ठरविले होते. या प्रकरणातील दुसरा संशयित प्लासिडो कार्व्हालो याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या सॅमसन डिसोझा याला शिक्षा ... Read More »

दिनदयाळ योजनेसाठी नोडल अधिकारी नेमणार ः आरोग्यमंत्री

दिनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेचा लाभ घेणार्‍या रुग्णांची खासगी इस्पितळांकडून फसवणूक होऊ नये यासाठी एका नोडल अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल विधानसभेत सांगितले. रवी नाईक यांनी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. गोवा सरकारच्या दिनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेमुळे विमा कंपनी गब्बर बनली आहे, असे सांगताना सरकारकडून कंपनीला १०३ कोटी रु. मिळाले असून कंपनीला १३ ... Read More »

लाडली लक्ष्मी’चे २० हजार अर्ज लवकरच हातावेगळे

लाडली लक्ष्मी योजनेखालील अडून पडलेले १५ ते २० हजार अर्ज लवकरच हातावेगळे करण्यात येणार असल्याची माहिती काल महिला व बाल विकास मंत्री विश्‍वजित राणे यांनी विधानसभेत दिली. इजिदोर फर्नांडिस यांनी सदर प्रश्‍न विचारला होता. ‘गृह आधार’ व ‘लाडली लक्ष्मी’ या दोन्ही योजना चांगल्या असल्याचे फर्नांडिस यांनी यावेळी सांगितले. मात्र, काही अडचणींमुळे या योजनांसाठी नव्याने अर्ज करणार्‍या अर्जदारांना विविध अडचणींचा सामना ... Read More »

आत्माराम नाडकर्णी म्हादईप्रश्‍नी गोव्याच्या कायदा सेवेतून मुक्त

>> निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी गोवा मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत म्हादई पाणी तंटा प्रकरण तसेच खाणीसंबंधी गोवा सरकारच्यावतीने न्यायालयात बाजू मांडणारे वकील आत्माराम नाडकर्णी यांना सदर सेवेतून मुक्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. फोंडा येथे एक अद्ययावत ग्रंथालय उभारता यावे यासाठी फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत व जमीन कला व संस्कृती खात्याकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. फोंड्यातील प्राथमिक ... Read More »

गोवा डेअरीतील गैरव्यवहाराची निष्पक्षपणे चौकशी करणार

>> मुख्यमंत्री सावंत यांची विधानसभेत ग्वाही गोवा डेअरीतील विविध गैरव्यवहार प्रकरणांची निःपक्षपाती चौकशी केली जाणार आहे. सुमुल डेअरीला दूध उत्पादक शेतकर्‍यांचा थकीत बोनस देण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत काल दिली. आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, सुमुल डेअरीला दुधाच्या तपासणीबाबतच्या प्रक्रियेबाबत दूध उत्पादक शेतकर्‍यांना ... Read More »

कर्नाटक विधानसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

>> बहुमत सिद्धतेवरील मतदानाच्या राज्यपालांच्या आदेशांकडे केले दुर्लक्ष कर्नाटकाचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी कुमारस्वामी सरकारला विधानसभेच्या पटलावर गुरुवारी दीड वाजेपर्यंत व त्यानंतर पुन्हा ६ वा. पर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश देऊनही कॉंग्रेस – जे डीएस आघाडी सरकारने त्या निर्देशाकडे दुर्लक्ष केले. गुरुवारी दिवसभर केवळ चर्चाच झाली. बहुमत सिद्धतेसाठी मतदान घेण्यात आले नाही. या उलट मुख्यमंत्री कुमारस्वामी व सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाने ... Read More »

‘कन्कशन सबस्टिट्यूट’ला मान्यता

>> आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने घेतला मोठा निर्णय गंभीर जखमी खेळाडूंऐवजी ‘कन्कशन सबस्ट्यिट्यूट’ ठेवण्याची मुभा संघांना मिळणार आहे. एखादा क्रिकेटपटू डोक्यावर अथवा शरीरावर चेंडू लागून गंभीर जखमी झाल्यास आणि तो पुढे खेळणे शक्य नसल्यास त्याच्याऐवजी कन्कशन बदली खेळाडू मैदानात जायबंदी खेळाडूची जागा घेऊ शकेल. वेगवान गोलंदाज जायबंदी झाल्यास त्याची जागा बदली गोलंदाज घेईल आणि फलंदाज जखमी झाल्यास त्याच्या जागी बदली (कन्कशन) ... Read More »

मास्टर ब्लास्टरचा ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश

मास्टर ब्लास्टर विक्रमादित्य सचिन तेंडुलकरचा काल शुक्रवारी औपचारिकरीत्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) प्रतिष्ठेच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला. हॉल ऑफ फेममध्ये समावेश झालेला सचिन हा भारताचा सहावा क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी बिशन सिंह बेदी (२००़९), कपिल देव (२००९), सुनील गावस्कर (२००९), अनिल कुंबळे (२०१५) आणि राहुल द्रविड (२०१८) यांना हा मान प्राप्त झाला होता. क्रिकेटमध्ये अनेक अनेक विक्रम पादाक्रांत ... Read More »