ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: July 18, 2019

साळावली धरण अखेर बुधवारी रात्रौ १० वाजून २० मिनिटांनी पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले. Read More »

जेसन रॉय कसोटी संघात

लॉडर्‌‌स मैदानावर आयर्लंडविरुद्ध २४ जुलैपासून होणार्‍या चारदिवसीय कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या एकदिवसीय संघाचा सलामीवीर जेसन रॉय याची निवड केली आहे. इंग्लंडच्या विश्‍वविजेतेपदात महत्त्वाचा वाटा उचलल्यामुळे कसोटी संघाचे दार प्रथमच त्याच्यासाठी उघडण्यात आले आहे. दुखापतीमुळे जोफ्रा आर्चरचे कसोटी पदार्पण मात्र लांबले आहे. ऍशेस मालिकेसाठी आर्चर तंदुरुस्त रहावा यासाठी इंग्लंड क्रिकेट मंडळाने आयर्लंडविरुद्धच्या १३ सदस्यीय संघात त्याला निवडणे टाळले आहे. आपला सरेचा ... Read More »

भारत, कतार एकाच गटात

‘फिफा २०२२ विश्‍वचषक’ स्पर्धेच्या आशियाई पात्रता स्पर्धेसाठी भारताचा समावेश आशियाई चॅम्पियन कतारसोबत करण्यात आला आहे. कतारव्यतिरिक्त ओमान, अफगाणिस्तान व बांगलादेश यांचा या ‘ई’ गटात समावेश आहे. या किचकट गटातून कतार संघाची आगेकूच निश्‍चित असून दुसर्‍या स्थानासाठी भारताला गल्फ कप विजेता ओमान व अफगाणिस्तान यांच्याकडून कडवा प्रतिकार अपेक्षित आहे. २०१८ विश्‍वचषक पात्रता स्पर्धेतही भारताला ओमानविरुद्ध झुंजावे लागले होते. त्यावेळी या अरब ... Read More »

भारताचा सामना पाकिस्तानशी

श्रीलंका बेसबॉल महासंघाने आशियाई बेसबॉल महासंघाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या पश्‍चिम अशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. तर दुसर्‍या उपांत्य लढतीत इराणचा संघ यजमान श्रीलंकेशी दोन हात करणार आहे. १५ जुलैपासून खेळविण्यात येत असलेली सदर स्पर्धा २० जुलैपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेसाठी भारत, नेपाळ व श्रीलंका यांचा एका गटात तर पाकिस्तान, इराण व बांगलादेश यांचा ... Read More »