Daily Archives: July 18, 2019

हाफीज सईदला अटक

सततच्या आंतरराष्ट्रीय दबावापुढे अखेर पाकिस्तान झुकले. पाकिस्तानमधील पंजाबच्या दहशतवादविरोधी विभागाने अखेर लष्कर ए तोयबा आणि जमात उद दावाचा प्रमुख सूत्रधार हाफीज महंमद सईदच्या मुसक्या आवळल्या. काही दिवसांपूर्वीच हाफीज आणि त्याच्या डझनभर साथीदारांविरुद्ध गुन्हे नोंदवले गेले होते, त्या अनुषंगाने ही कारवाई झाली आहे. मुख्यत्वे बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांसाठी धार्मिक विश्वस्त संस्थांच्या नावे निधी गोळा करीत असल्याच्या आरोपाखाली हाफीज सईदला ही अटक ... Read More »

‘एनआयए’ चे सशक्तीकरण गरजेचेच!

शैलेंद्र देवळणकर राष्ट्रीय तपास संस्थेला असणार्‍या मर्यादा लक्षात घेऊन त्यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यासंदर्भातील सुधारित विधेयक संसदेत मंजूर झाले असले तरी त्यावरुन बरेच राजकारणही होताना दिसले. वास्तविक राष्ट्रीय सुरक्षेसाठी गरजेच्या असणार्‍या या विषयाला राजकारणापासून दूर ठेवणे हेच देशहिताचे आहे. नुकतेच लोकसभेमध्ये एका कलमामध्ये सुधारणा करण्याबाबतचे एक विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले. हे विधेयक मंजूर करताना ज्या प्रकारची ... Read More »

खाण मालकांनी कामगार कपात करू नये

>> तीन महिने कळ सोसण्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे विधानसभेत आवाहन सरकार खाण बंदीच्या प्रश्‍नी गंभीर असून खाण बंदीच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय हालचालींना गती देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील खाण मालकांनी कामगार कपात करण्याचा निर्णय घेऊ नये. आणखी तीन महिने कळ सोसावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी विधानसभेत चर्चेला उत्तर देताना काल केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ... Read More »

कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आयसीजेकडून स्थगिती

पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरीप्रकरणी भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या निवाड्याला काल आयसीजी तथा आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पुन्हा स्थगिती दिली. या विषयीचा निकाल १५-१ अशा फरकाने भारताच्या बाजूने लागला आहे. याआधी २०१७ मध्ये या न्यायालयाने फाशीच्या निवाड्याला पहिल्यांदा स्थगिती दिली होती, ती आता कायम करण्यात आली आहे. दक्षिण आशियाच्या आंतरराष्ट्रीय कायदा सल्लागार रिमा ओमर यांनी याविषयी माहिती दिली ... Read More »

कवळेकरांनी आता ‘ते’ अध्यादेश मागे घेऊन लोकांना न्याय द्यावा

>> कॉंग्रेस ः टीसीपीतील दुरूस्त्यांचे प्रकरण राज्याचे विद्यमान नगरनियोजन मंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी विरोधी कॉँग्रेस पक्षात असताना नगर नियोजन खात्याच्या टीडीआर, १६ बी, भूखंड विक्रीसाठी ना हरकत दाखला या दुरुस्त्यांना विरोध करून या दुरुस्त्या मागे घेण्याची मागणी केली होती. आता, कवळेकर यांच्याकडे नगर नियोजन खात्याचा कारभार असल्याने त्यांनी टीडीआर, १६ बी या दुरूस्त्यांच्या अंमलबजावणीचा अध्यादेश मागे घेऊन लोकांना न्याय द्यावा, ... Read More »

गोवा पर्यटन धोरणाच्या मसुद्याची चौकशी करणार

>> मंत्री आजगावकरांचे विधानसभेत आश्‍वासन गोवा पर्यटन धोरण २०१८ चा मसुदा तयार करण्यासाठी सल्लागार म्हणून नियुक्ती केलेल्या केजीएमजी ह्या कंपनीने मसुदा अन्य राज्याच्या धोरणाचा आधार घेऊन कॉपीपेस्ट केला आहे की काय त्याची चौकशी करण्यात येणार असल्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यानी काल गोवा विधानसभेत सांगितले. काल गोवा विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासाला कुठ्ठाळीच्या भाजप आमदार एलिना साल्ढाणा यानी विचारलेल्या एका प्रश्‍नाचे उत्तर देताना ... Read More »

संजीवनी साखर कारखान्याला आतापर्यंत १०१ कोटींचे नुकसान

>> महिन्याभरात तोडगा काढणार ः मंत्री गावडे संजीवनी सहकारी साखर कारखान्याला आतापर्यंत १०१ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून ह्या कारखान्याला वार्षिक १० कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागत असल्याचे, सहकार मंत्री गोविंद गावडे यानी काल प्रश्‍नोत्तराच्या तासाला विधानसभेत सांगितले. यावेळी काही विरोधी आमदारांनी सरकार अशा परिस्थितीतही हा कारखाना सुरूच ठेवणार आहे काय, अशी विचारणा केली व चर्चिल आलेमांव यांनी कारखाना बंद ... Read More »

साखळीत कार्डीयेक रुग्णवाहिका : विश्‍वजित

साखळी येथे कार्डीयेक रुग्णवाहिका सेवा उपलब्ध केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी मयेचे आमदार प्रवीण झांट्ये यांच्या एका लक्षवेधी सूचनेवर बोलताना विधानसभेत काल दिली. चोडण ते रायबंदर येथील फेरीबोटीतून रुग्णवाहिका नेण्यास मान्यता दिली जात नसल्याने मये मतदारसंघातील रुग्णांना त्रास सहन करावे लागत आहे. रुग्णांना वेळेवर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास उशीर होत असल्याने अनेक रुग्ण वाटेतच दगावले आहे. ... Read More »

‘गोवा पथदीप धोरण’ आखणार

>> वीज मंत्र्यांची माहिती : राज्यात पथदीपांची समस्या बनली गंभीर गोवाभरातील पथदीपांच्या देखभालीसाठी वार्षिक फक्त एक कोटी रू. एवढाच निधी मिळतो. या पथदीपांची वीज बिले पंचायती व नगरपालिका फेडत नसून तिही एक मोठी समस्या बनून राहिली आहे. राज्यातील पथदीपांचा विषय हा गंभीर असून त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकार गोवा पथदीप धोरण तयार करणार असल्याची माहिती काल वीज मंत्री नीलेश काब्राल यांनी ... Read More »

ऑक्टोबर नंतर सोनसडो येथील कचर्‍याची विल्हेवाट लावणार

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती सोनसडो मडगाव येथील कचर्‍याच्या प्रश्‍नावरून विधानसभेत गरमा गरम चर्चा झाली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कचरा विल्हेवाटीस आवश्यक सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले असून गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ ऑक्टोबर महिन्यानंतर सोनसडोवरील कचरा डंपच्या विल्हेवाटीला सुरुवात करणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. दरम्यान, चर्चेच्या वेळी पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल, कुडतरीचे आमदार आलेक्स ... Read More »