Daily Archives: July 17, 2019

दोषी कोण?

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये काल एक जुनी इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. मुंबईसाठी हे काही नवीन नाही. दरवर्षी पावसाळ्यात अशी एखादी भीषण दुर्घटना होतेच होते. दुर्घटना तर भीषण असतेच, परंतु त्यानंतर त्यामागची जी कारणे समोर येतात ती त्याहून भीषण असतात. काल कोसळलेल्या इमारतीच्या बाबतीतही तसेच झाले आहे. मुंबईच्या डोंगरी नावाच्या अत्यंत दाटीवाटीच्या भागात ही इमारत दुर्घटना घडली. दाटीवाटी एवढी की ... Read More »

लोकन्यायालयांचे यश

ऍड. प्रदीप उमप देशभरातील न्यायालयांमध्ये साडेतीन कोटींहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. यात सामंजस्याने निकाली निघू शकतील, अशा असंख्य प्रकरणांचा समावेश असतो. छोटे-मोठे वाद, महसुली आणि कौटुंबिक प्रकरणे लोकन्यायालयांच्या माध्यमातून निकाली काढणे शक्य झाल्यास न्यायालयांवरील बोजा कमी होईल. लोकन्यायालयांच्या माध्यमातून एकाच दिवसात ६१ हजार प्रकरणे निकाली निघाल्याची राजस्थानातील घटना यासाठीच महत्त्वपूर्ण ठरते. लोकन्यायालयाच्या माध्यमातून एकाच दिवसात ६१ हजार प्रकरणे निकाली निघण्याची ... Read More »

१३०० पोलिसांच्या भरतीची प्रक्रिया सुरू

>> पुढील महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करणार पोलीस खात्यातर्फे १३०० पोलीसांची भरती करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून पुढील महिन्यात त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत सांगितले. काल प्रश्‍नोत्तराच्या तासाला मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी मडगाव पोलीस स्थानकावर पोलिसांची संख्या कमी असून तेथे आणखी पोलीस देण्याची मागणी करणारा प्रश्‍न उपस्थित केला असता सावंत यांनी वरील माहिती ... Read More »

ड्रग्समध्ये गुंतलेल्यांची गय नाही ः मुख्यमंत्री

अमली पदार्थ व्यवसायात गुंतलेल्यांची सरकार गय करणार नसल्याचे काल गुहमंत्री प्रमोद सावंत यानी विधानसभेत सांगितले. ‘झिरो टॉलरन्स टू ड्रग्ज’ हे आमच्या सरकारचे धोरण असल्याचे सांगताना गोव्याच्या पर्यटनासाठी आम्हाला अमली पदार्थांची गरज नाही, असेही सावंत यांनी सांगितले. काल प्रश्‍नोत्तराच्या तासाला आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी हा प्रश्‍न विचारला होता. यावेळी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा म्हणाले की गोव्यातील युवक समुद्र किनारे, निर्जन डोंगर अशा ... Read More »

ड्रग्स प्रकरणांचे वाढते प्रमाण चिंताजनक ः दिगंबर

राज्यातील कायदा व सुव्यवस्था हा चिंतेचा विषय बनला आहे. अमली पदार्थ, गँग वॉर, चोर्‍या, वेश्या व्यवसाय, खुनाच्या घटना घडू लागल्या आहेत. गोवा हे प्रमुख पर्यटन स्थळ असल्याने कायदा व सुव्यवस्थेकडे जास्त लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. कायदा व सुव्यवस्थेची स्थिती हाताबाहेर गेल्यास पर्यटनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. कायदा व सुव्यवस्था हा संवेदनशील विषय असून सरकारने या विषयावर गाङ्गील राहू नये, ... Read More »

साळमधील उत्पादकांचे दूध स्वीकारण्याची सुमूलची तयारी

सुमुल दूध सोसायटी बुधवारपासून दूध उत्पादकांकडील दूध स्वीकारण्यास सुरुवात करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. सुमुल दूध सोसायटीने साळ, डिचोली भागातील शेतकर्‍यांचे दूध सोमवारी स्वीकारण्यास नकार दिल्याने संतप्त बनलेल्या शेतकर्‍यांनी गोवा विधानसभेवर मोर्चा आणून शेकडो लीटर दूध रस्त्यावर ओतून निषेध नोंदविला होता. सुमुलने दुधाच्या केलेल्या तपासणीमध्ये दुधात अँटीबायोटिक्स आढळून आल्याने दूध स्वीकारण्यास नकार ... Read More »

कर्नाटक: बंडखोर आमदारांच्या याचिकेवर आज कोर्टात निर्णय

कर्नाटकमधील कॉंग्रेस व जेडीएसच्या १५ बंडखोर आमदारांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आपला निवाडा आज जाहीर करणार आहे. आपण आमदारकीचे दिलेले राजिनामे स्वीकारण्यात यावेत असा आदेश कर्नाटक विधानसभेचे सभापती रमेश कुमार यांना द्यावा अशी विनंती या १५ बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयाला या याचिकेद्वारा केली आहे. तसेच सभापती रमेश कुमार व मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या याचिकांसह बंडखोर आमदारांच्या याचिकांवर सरन्यायाधीश रंजत गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील ... Read More »

ट्रॅफिक सेंटीनलना ३७.८१ लाख रु. अदा

>> २१ लाख रुपये थकबाकी ः योजनेबाबत चर्चेअंती निर्णय ः मुख्यमंत्री वाहतूक पोलिसांच्या ‘ट्रॅफिक सेंटिनेल’ योजनेबाबत माजी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत कोणते आश्‍वासन दिले होते त्याची आपणाला कल्पना नसून ते जाणून घेतल्यानंतरच ह्या योजनेचे काय करायचे त्याबाबत आपण निर्णय घेणार असल्याचे आश्‍वासन गृहमंत्री ह्या नात्याने काल गोवा विधानसभेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सभागृहात दिले. गेल्या विधानसभा अधिवेशनात विचारण्यात आलेला हा प्रश्‍न पुढे ... Read More »

मुंबईत इमारत कोसळून ७ जण मृत्यूमुखी

मुंबई येथील डोंगरी भागातील एक अत्यंत जुनी चार मजली इमारत काल सकाळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत ७ जण मृत्यूमुखी पडले आहेत. ढासळलेल्या इमारतीच्या ढिगार्‍याखाली सुमारे ४० जण अडकल्याचे वृत्त आहे. मदतकार्य सुरू केल्यानंतर दोन बालकांसह एका महिलेला ढिगार्‍यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी १२ ... Read More »

सचिनच्या संघात पाच भारतीय

यजमान इंग्लंडने न्यूझीलंडला हरवून विश्‍वविजेतेपद पटकावल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने विश्‍वचषक स्पर्धेमधील आपला सर्वोत्तम ११ खेळाडूंचा संघ निवडला आहे. या संघात सचिनने भारताच्या पाच खेळाडूंना स्थान दिले आहे. सचिनने आपल्या संघाचे नेतृत्व उपविजेता न्यूझीलंडच्या केन विल्यमसन याच्याकडे सोपविले आहे. तर विश्‍वविजेत्या इंग्लंडच्या जॉनी बॅअरस्टोवला यष्टीरक्षक म्हणून निवडले आहे. सचिनच्या संघात रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत ... Read More »