Daily Archives: July 16, 2019

चर्चिल ब्रदर्सला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा

आय लीग व चर्चिल ब्रदर्स क्लबचे म्हणणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐकून घेण्यासाठी राज्य सरकारचा पूर्ण पाठिंबा असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सोमवारी सांगितले. युवा खेळाडूंचे भवितव्य, क्लबचा संपन्न इतिहास व देशाच्या फुटबॉलसाठी त्यांनी दिलेले योगदान नजरेसमोर ठेवून पंतप्रधानांनी या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली. क्लबचे अध्यक्ष चर्चिल आलेमाव, मुख्य कार्यकारी अधिकारी वालंका आलेमाव यांच्यासोबत झालेल्या ... Read More »

रोहित, बुमराहची निवड

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंचा समावेश करून १२ सदस्यीय संघ निवडला आहे. या संघात भारताच्या रोहित शर्मा व जसप्रीत बुमराह या केवळ दोघांना स्थान मिळाले आहे. जेसन रॉय आणि रोहित शर्मा यांच्यावर सलामीची जबाबदारी देण्यात आली आहे, तर केन विल्यमसनकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. आयसीसीच्या या संघात विश्‍वविजेत्या इंग्लंडच्या चार खेळाडूंचा समावेश आहे, ... Read More »

बार्टीचे प्रथम स्थान कायम

विंबल्डनच्या ‘अंतिम १६’मध्ये गारद होऊनही ऍश्‍ले बार्टी हिने डब्ल्यूटीए क्रमवारीत आपले अव्वलस्थान कायम राखले आहे. इवोन गुलागोंग कावली (१९८०) हिच्यानंतर विंबल्डन जिंकणारी पहिली ऑस्ट्रेलियन खेळाडू होण्याचे स्वप्न भंग पावल्यानंतरही फ्रेंच ओपन विजेत्या बार्टीच्या अव्वल स्थानाला तुर्तास धोका नाही. बार्टीला नुकत्याच संपलेल्या विंबल्डन स्पर्धेत ऍलिसन रिस्के हिच्याकडून अनपेक्षित पराभव पत्करावा लागला होता. नाओमी ओसाका व कॅरोलिना प्लिस्कोवा ही दुकली दुसर्‍या व ... Read More »

योगसाधना – ४१९ अंतरंग योग

 डॉ. सीताकांत घाणेकर डोळे बंद करून आपल्या मनातील विचारांवर लक्ष केंद्रीत करावे. सहसा मन एकाच विचारावर स्थिर राहात नाही. हे विचार कोणते याची नोंद मनातच ठेवावी. साधारण पाच विचार आले की डोळे उघडावे व हे पाच विचार किती वेळात आले हे आपल्या घड्याळात बघून एका कागदावर त्याची नोंद ठेवावी. अंतरंग योगातील धारणा- ध्यान- समाधी यांचा अनुभव घेण्यासाठी आपल्या मनावर चांगल्या ... Read More »

पावसाळ्यातील साथीचे रोग ः डेंग्यू ताप

 डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) घरात फक्त ‘ऑल-आऊट’ लावले म्हणून होत नाही. डासांचा नायनाट करण्यासाठी किरकोळ वाटल्या तरी महत्त्वाच्या बाबींवर विचार करून घरचा परिसर प्रथम स्वच्छ करावा. पाणी साठायला कुठेच वाव देऊ नये. साध्या बाहेर टाकलेल्या प्लॅस्टिक कपमध्ये जरी त्याला साचलेले पाणी सात-आठ दिवसांकरिता मिळाले तरी त्यात डासांचा जन्म होतो. या आजारात पाण्याचे प्रमाण कायम ठेवणे अत्यावश्यक असते. त्यामुळे पाण्याचा ... Read More »