Daily Archives: July 16, 2019

‘इफ्फी’ पन्नाशीत!

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करीत असून गोव्यातील त्याचे आयोजन शानदार व्हावे यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीने कंबर कसली आहे. नुकतेच जावडेकर यांनी या महोत्सवात यंदा काय असेल त्याचे सूतोवाच पत्रकार परिषदेत केले. जावडेकर यांच्यासारख्या अनुभवी, कुशल नेत्याने जातीने या महोत्सवात लक्ष घातले असल्याने आणि राज्य सरकारची त्यांना सक्रिय साथ राहणार ... Read More »

व्यवस्थेच्या बधीरतेचे बळी कधी थांबणार?

देवेश कु. कडकडे आपल्या सत्तेच्या काळात दुर्घटना घडली तर त्याचे खापर मागील सरकारवर फोडले जाते. तर विरोधी पक्षाला सत्ताधारी पक्षावर आगपाखड करायला संधी मिळते. अशा घटनांना विशेष गांभीर्याने घेतले जात नाही. जनतेचा आक्रोश हळूहळू संपतो. काही ठिकाणी तर वरवरची मलमपट्टी करून डागडुजी केल्यासारखे दाखवले जाते. ‘स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही’, अशी एक म्हण प्रसिद्ध आहे. त्यानुसार म्हणावेसे वाटते की, दुर्घटनेत ... Read More »

खाणप्रश्‍नी तोडग्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

>> येत्या २० दिवसांत खनिजाचा ई-लिलाव, डंपवर सहा महिन्यांत निर्णय राज्यातील बंड पडलेल्या खाणप्रश्‍नी लवकरच तोडगा काढण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी काल गोवा विधानसभेत सांगितले. शून्य तासाला आमदार प्रविण झांट्ये यानी राज्यातील बंद पडलेल्या खाणींचा प्रश्‍न उपस्थित करून सरकारने खाणी सुरू करण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत असा प्रश्‍न विचारला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील खाण उद्योग ... Read More »

चार नव्या मंत्र्यांच्या समावेशानंतर राज्य मंत्रिमंडळातील खातेबदल

डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री गृह, कर्मचारीविषयक, अर्थ, दक्षता, सर्वसाधारण प्रशासन चंद्रकांत कवळेकर (नवे मंत्री) नगर व शहर नियोजन, शेती, पुराभिलेख, पुरातत्त्व, कारखाने व बाष्पक मनोहर आजगावकर पर्यटन, क्रीडा मुद्रण व लेखनसाहित्य, राजभाषा, सार्वजनिक गार्‍हाणी जेनिफर मोन्सेर्रात (नव्या मंत्री) महसूल, माहिती तंत्रज्ञान, मजूर व रोजगार, गोविंद गावडे कला व संस्कृती, आदिवासी कल्याण, नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार सहकार फिलीप नेरी रॉड्रिगीस ... Read More »

रेणुका डिसिल्वा यांचा एसजीपीडीएचा राजिनामा

दक्षिण गोवा नियोजन व विकास प्राधिकरण तथा एसजीपीडीए अध्यक्षपदाचा आपण राजिनामा देत असल्याची माहिती डॉ. रेणुका डिसिल्वा यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार विजय सरदेसाई उपस्थित होते. यावेळी डिसिल्वा यांनी आपण केलेल्या विविध कामांची माहिती दिली. एसजीपीडीएने विकासविषयक घेतलेल्या निर्णयांना फातोर्डा व मडगावमधील लोकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल विजय सरदेसाई यांनी आभार मानले. ताळसांझर, कबरस्थान, हॉलिस्पिरिट सीमेटरीजवळ पार्किंग विभाग, करमणुकीचे पार्क ... Read More »

सर्वांनाच सरकारी नोकर्‍या देणे अशक्य

>> मुख्यमंत्री ः खासगी नोकर्‍या व स्वयंरोजगाराकडे वळण्याचे युवकांना आवाहन विविध सरकारी खात्यांतील रिक्त पदे भरण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सध्या चालू असून ही प्रक्रिया पूर्ण होताच खात्यांतील ५ हजार पदे भरण्यासाठीचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी काल विधासभेत सांगितले. मात्र, सर्वांनाच सरकारी नोकर्‍या देणे सरकारला शक्य नसून राज्यातील युवक युवतींनी आता खासगी नोकर्‍या व स्वयंरोजगार ... Read More »

मडगावात सहा दुकानांना आग

मडगाव रेल्वे उड्डाण पुलाजवळील बहुमजली इमारतीतील सहा दुकानांना काल सकाळी आग लागून करोंडो रुपयांचे नुकसान झाले. आगीत सहाही दुकाने पूर्णपणे खाक झाली. तर वरच्या मजल्यावर अडकून पडलेल्या तीन ज्येष्ठ नागरिकांना अग्नीशामक दलाच्या जवानानी सुखरुप खाली उतरविले. काल सकाळी ९ वाजता लक्की इंटरप्रायझेज या बहुमजली इमारतीतील तळमजल्यावरील लक्की इंटरप्रायझीस, लक्की वर्ल्ड, साई ज्वेलर्स, ममता इलेक्ट्रॉनिक व एका कपड्याच्या मिळून सहा दुकानांना ... Read More »

पक्षांतराच्या घटना लोकशाहीला धरून आहेत काय? ः सुदिन

राज्यपाल डॉ. मुदुला सिन्हा यांनी आपल्या अभिभाषणामध्ये लोकशाही मजबूत करण्याचा संदेश दिलेला आहे. तथापि, राज्यात मागील पंधरा दिवसात किंवा त्यापूर्वी घडलेल्या राजकीय पातळीवरील पक्षांतराच्या घटना लोकशाहीला धरून आहेत का? असा प्रश्‍न माजी उपमुख्यमंत्री तथा मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर बोलताना काल उपस्थित केला. राज्यपाल डॉ. सिन्हा यांनी लोकशाही मजबूत करण्यावर भर दिलेला असून सर्वांना योग्य ... Read More »

कामगार कायदा दुरुस्तीच्या निषेधार्थ कामगारांची निदर्शने

केंद्रातील एनडीए सरकारच्या ४० कामगार कायद्यांमध्ये दुरुस्तीच्या प्रस्तावाच्या निषेधार्थ पाटो पणजी येथील मजूर आयुक्तालयासमोर (आयटक) च्या गोवा शाखेने काल निदर्शने केली. केंद्र सरकारचा ४० कामगार कायद्यांत दुरुस्ती करून ४ कामगार संहिता तयार करण्याचा प्रस्ताव आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाला कामगारवर्गाकडून विरोध केला जात आहे, अशी माहिती ख्रिस्तोफोर फोन्सेका यांनी दिली. कामगार कायद्यात दुरुस्ती कामगार वर्गाच्या हिताच्या विरोधात आहे. या कायद्याच्या ... Read More »

चार हजार लिटर दूध पर्वरीतील रस्त्यावर ओतले

>> सुमूलच्या निषेधार्थ उत्पादकांची कृती सुमूलने दूध नाकारल्याने संतप्त बनलेल्या साळ-डिचोली येथील दूध उत्पादक शेतकर्‍यांनी काल गोवा विधानसभेवर आणलेला मोर्चा पर्वरी येथील पोलीस स्थानकाजवळ अडविण्यात आला. यावेळी दूध उत्पादकांनी सुमुल कंपनी आणि सरकारचा निषेध करून सोबत आणलेले हजारो लीटर दूध रस्त्यावर ओतून निषेध नोंदविला. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत सुमूलचे अधिकारी, पशुसंवर्धन खात्याचे अधिकारी ... Read More »