Daily Archives: July 15, 2019

जोकोविच ठरला विंबल्डन चॅम्पियन

जागतिक क्रमवारीत प्रथम असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविच याने आठवेळचा विंबल्डन चॅम्पियन व जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर असलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर याचा ७-६ (७-५),१-६,७-६ (७-४),४-६,१३-१२ (७-३) असा पराभव करत पाचव्यांदा विंबल्डन किताब आपल्या नावे केला. सर्वात जास्त वेळ चाललेली ही ऐतिहासिक अंतिम फेरी ठरली आहे. पाचवा निर्णायक सेट तर तब्बल १०० मिनिटांहून अधिक वेळ सुरू होता. हा संपूर्ण सामना चार तास ... Read More »

दहा भुंगे ‘कमळा’त!

गुरुदास सावळ गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या दोन तृतियांश सदस्यांना भाजपामध्ये विलीन करून राजकीय आघाडीवर नवा इतिहास घडविला आहे. गेल्या महिन्यात मगो पक्षाचे दोन तृतीयांश आमदार अशाच प्रकारे भाजपात विलीन झाले होते. कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे विलिनीकरण तिन्हीसांजेला झाले, तर मगोचे विलिनीकरण मध्यरात्रीनंतर झाले होते. आपले राजकीय नेते वेळ आली की किती सक्रिय बनतात हे या ... Read More »

स्वतंत्र कुर्दिस्तान काळाची गरज

– दत्ता भि. नाईक कोणताही देश आपली भूमी नवीन राष्ट्रराज्य स्थापन करण्यासाठी सहजपणे देणार नाही हे सत्य आहे. परंतु नजीकच्या काळात इराक, सिरिया व तुर्कस्तानला शांतता हवी असल्यास स्वतंत्र कुर्दिस्तानचा मार्ग मोकळा करावाच लागेल! अलीकडेच केलेल्या वक्तव्यात कुर्द प्रादेशिक सरकारचे परराष्ट्र व्यवहारमंत्री फलाह मुस्ताफा यांनी सन २०२२ पर्यंत आम्ही तुर्कस्तानच्यामार्गे युरोपला गॅसचा पुरवठा करू असे आत्मविश्‍वासपूर्वक विधान केलेले आहे. उर्वरित ... Read More »

तरुण सैनिकांच्या अतुलनीय शौर्याच्या कहाण्या ‘इंडियाज् मोस्ट फिअरलेस – २’

एडिटर्स चॉइस परेश प्रभू भारतीय सैन्यदलांमध्ये असे अगणित जॉंबाज असतील, ज्यांच्या कहाण्या कधी समाजापर्यंत कदाचित येणारही नाहीत. त्यांच्या आजूबाजूच्या सहकार्‍यांमध्ये त्या चर्चिल्या जातील आणि कालांतराने विस्मृतीतही जातील. परंतु ‘इंडियाज् मोस्ट फिअरलेस – २’ सारखे असे एखादे पुस्तक येते तेव्हा या कहाण्या त्यातून अजरामर होतील. ‘‘जेव्हा तुम्ही घरी जाल, तेव्हा त्यांना आमच्याविषयी सांगा, आणि सांगा की तुमच्या ‘उद्या‘साठी आम्ही आमचा ‘आज’ ... Read More »