Daily Archives: July 15, 2019

इंग्लंड विश्‍वविजेता!

चौकार-षटकारांच्या निकषावर यजमान इंग्लंडने काल विश्‍वविजेतेपदाला गवसणी घातली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात २४१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला देखील २४१ धावांपर्यंतच पोहोचता आले. निर्धारित षटकांत सामना बरोबरीत सुटल्याने निकालासाठी सुपर ओव्हरचा अवलंब करावा लागला. या सुपर ओव्हरमध्येदेखील उभय संघांनी समान १५ धावा केल्याने सामन्यात सर्वाधिक चौकार-षटकार ठोकलेला इंग्लंडचा संघ नवीन विश्‍वविजेता ठरला. केन विल्यमसनने मोडला ... Read More »

जशास तसे!

कॉंग्रेसमधून दहा जणांचा भाजप प्रवेश घडून येताच मंत्रिमंडळातून गोवा फॉरवर्डच्या मंत्र्यांची हकालपट्टी झाली. यामुळे पर्रीकरांचा वारसा संपल्याचे कितीही अकांडतांडव विजय सरदेसाई यांनी जरी चालवलेले असले, तरी जनतेची त्यांना सहानुभूती दिसत नाही. दहा कॉंग्रेसजनांच्या घाऊक पक्षांतराबद्दल जनता प्रचंड नाखुश असली, तरी गोवा फॉरवर्डला सरकारमधून घालवल्याचे तिला काही दुःख नाही. उलट सरकारमधील एक ब्याद गेली अशीच आज जनभावना आहे, त्यामुळे उगाच पर्रीकरांच्या ... Read More »

कॉंग्रेसमधील पळापळीला राहुलच जबाबदार

ल. त्र्यं. जोशी सामान्यत: भारतीय मतदारांना पक्षांतर आवडत नाही. अशा आमदारांना ‘दलबदलू’, ‘आयाराम गयाराम’ म्हणून हिणविले जाते. त्यांना थारा व सत्तेची पदे देणार्‍या पक्षांबद्दलही लोक नाराजी व्यक्त करतात. पण अलीकडे हेच लोक दलबदलू आमदारांची आणि त्यांना थारा देणार्‍या पक्षांची मजबुरीही समजून घेऊ लागले आहेत… सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील भाजपा व एनडीएच्या ऐतिहासिक विजयानंतर कॉंग्रेस पक्षात प्रथम आंध्रप्रदेशात, नंतर कर्नाटकात ... Read More »

आजपासून गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आज दि. १५ जुलैपासून सुरू होत असून ते ९ ऑगस्टपर्यंत चालू राहणार आहे. अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवरच विरोधी कॉंग्रेस पक्षातील १५ आमदारांपैकी १० आमदारांनी आपला वेगळा गट स्थापन करून तो सत्ताधारी भाजप पक्षात विलीन केल्याने विरोधी कॉंग्रेस पक्षाची स्थिती दयनीय झालेली आहे. ह्या फुटीचे पडसाद या अधिवेशनात उमटणार आहेत. गेल्या आठवड्यापर्यंत विरोधी पक्षनेतेपदावर असलेले चंद्रकांत कवळेकर यानी त्यांच्यासह ... Read More »

चांद्रयान – २ : आज पहाटे अवकाशात झेपावण्याआधी श्रीहरीकोटा तळावर सज्ज झालेले चांद्रयान. Read More »

गोवा फॉरवर्ड पक्षाच्या नेत्यांनी पर्रीकरांचा वारसा पुढे नेण्याची भाषा बोलू नये : भाजप

>> समाधी स्थळाचे पावित्र्यभंग केल्याचा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते व पदाधिकारी यांनी स्व. मनोहर पर्रीकर यांचा वारसा पुढे नेण्याची भाषा करू नये, असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामू नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. स्व. पर्रीकर यांचा वारसा पुढे नेण्याचे काम भाजप करणार असल्याचे सांगून कलंकित नेत्यांनी पर्रीकर यांचा वारसा पुढे नेण्याची भाषा करणे हे योग्य नसल्याचे नाईक म्हणाले. मनोहर ... Read More »

कर्नाटक आघाडी सरकारवरील धोका कायम

>> बंडखोर आमदार राजिनाम्यांवर ठाम : भाजपकडून विश्‍वासमताची मागणी सत्ताधारी कॉंग्रेस व जेडीएसच्या आमदारांच्या बंडाळीमुळे कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या कुमारस्वामी सरकारला सावरण्यासाठी या आघाडीतर्फे कालही शर्थीचे प्रयत्न केले गेले. मात्र बंडखोर आमदारांकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे सत्ताधारी आघाडीच्या प्रयत्नांना यश मिळू शकले नाही. सध्या बंडखोर आमदारांचा मुक्काम मुंबईत असून त्यांनी आपल्या राजिनाम्यांवर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान विरोधी भाजपने आघाडी ... Read More »

भाजपच्या महासचिवपदी बी. एल. संतोष नियुक्त

भारतीय जनता पक्षाचे नवे महासचिव म्हणून बी. एल. संतोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष सध्या संयुक्त महासचिव (संघटन) म्हणून काम पहात होते. महासचिव म्हणून सुमारे १३ वर्षे कार्यरत असलेल्या रामलाल यांना पुन्हा रा. स्व. संघात पाठविण्यात आल्याने संतोष यांना महासचिवपदी बढती देण्यात आली आहे. आपल्या नव्या पदाचा ताबा ते तातडीने घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा ... Read More »

सुवर्ण महोत्सवी इफ्फी थाटात साजरा करणार : जावडेकर

>> गोवा हेच इफ्फीचे कायम स्थळाबाबत दिली ग्वाही; सात शहरांमध्ये रोड शोचे आयोजन करणार इफ्फी महोत्सवाला यंदा ५० वर्षे पूर्ण होत असल्याने यंदाचा इफ्फी थाटामाटात साजरा करण्याचा निर्णय केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पणजीत काल झालेल्या इफ्फीच्या सुकाणू समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर पणजीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच सुकाणू समितीचे सदस्य ए. के. बीर, मधुर भंडारकर, ... Read More »

इंग्लंड विश्‍वविजेता!

चौकार-षटकारांच्या निकषावर यजमान इंग्लंडने काल विश्‍वविजेतेपदाला गवसणी घातली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात २४१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला देखील २४१ धावांपर्यंतच पोहोचता आले. निर्धारित षटकांत सामना बरोबरीत सुटल्याने निकालासाठी सुपर ओव्हरचा अवलंब करावा लागला. या सुपर ओव्हरमध्येदेखील उभय संघांनी समान १५ धावा केल्याने सामन्यात सर्वाधिक चौकार-षटकार ठोकलेला इंग्लंडचा संघ नवीन विश्‍वविजेता ठरला. केन विल्यमसनने मोडला ... Read More »