Daily Archives: July 12, 2019

केवळ नाचक्की!

गोव्यातील कॉंग्रेसमधून झालेल्या दहा जणांच्या घाऊक पक्षांतरामुळे भारतीय जनता पक्षाची आम जनतेमध्ये सध्या केवळ छीःथू चाललेली दिसते. भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनाही पक्षाचा हा निर्णय रुचलेला नाही. जी मंडळी भाजपाच्या आसर्‍याला आलेली आहेत, ती पक्षाच्या विचारधारेकडे, मोदींकडे वा मुख्यमंत्र्यांकडे आकृष्ट होऊन आलेली नाहीत. त्यांना केवळ सत्ता हवी आहे म्हणून स्वतःच्या फायद्यासाठीच ते आलेले आहेत. कॉंग्रेस विधिमंडळ गटाचे नेते बाबू कवळेकर हे त्यांच्यामध्ये ... Read More »

हरितक्रांती गोव्यात क्रांती घडवेल!

शंभू भाऊ बांदेकर खाण उद्योग बंद झाल्यामुळे राज्य वा केंद्र सरकारला हजारो कोटींच्या महसुलास मुकावे लागले आहे. हा उद्योग पुन्हा कधी सुरू होईल याचा अंदाज कुणालाच नाही. म्हणून खाण उद्योगाला शेती हा पर्यायी उद्योग म्हणून या भूमीत कसा रुजू शकेल यावर गांभीर्याने विचार करणे जरुरीचे आहे. १८ जूनला- क्रांतिदिनानिमित्त जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात क्रांतीपर्व साकारण्यासाठी ... Read More »

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

>> अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती >> आंतरराज्य वाहतूक सेवेवरही परिणाम राज्यात मागील चोवीस तासापासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. राजधानी पणजी जलमय झाल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. कित्येक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे आंतरराज्य वाहतुकीचे तीनतेरा वाजले. रेल्वेचे वेळापत्रकही विस्कळीत झाले. कुशावती नदीला आलेल्या पुरामुळे पारोडा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने कुडचडे-मडगाव येथील वाहतुकीवर परिणाम झाला. सत्तरीत ... Read More »

बंडखोरांविरुद्ध अपात्रता याचिका सादर करणार

>> चेल्लाकुमार : बाबुशना उमेदवारी घोडचूक पणजी पोटनिवडणुकीत बाबुश मोन्सेर्रात यांना कॉंग्रेसची उमेदवारी देऊन फार मोठी चूक केली. त्यांनी दोन महिन्यांत कॉंग्रेस विधिमंडळ गटात उभी फूट घातली. भाजपात गेलेल्या १० बंडखोर आमदारांविरुद्ध कॉंग्रेस सभापतींकडे तसेच उच्च न्यायालयात अपात्रता याचिका सादर करणार असल्याचे पक्षाचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार यांनी काल येथे सांगितले. कॉंग्रेसच्या १० आमदारांनी वेगळा गट करून विधिमंडळ पक्षच भाजपामध्ये विलीन ... Read More »

मंत्रिमंडळात आज फेरबदल शक्य

राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत आज गोवा भाजपशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. कॉंग्रेस पक्षापासून फारकत घेत वेगळा विधिमंडळ गट स्थापन करून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १० आमदारांनी भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची नवी दिल्ली येथे भाजप मुख्यालयात काल भेट घेऊन भाजपमध्ये रीतसर प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांची ... Read More »

खाण प्रश्‍नावर आज दिल्लीत उच्चस्तरीय बैठक

राज्यातील खाण प्रश्‍नावर आज शुक्रवार १२ जुलै रोजी संध्याकाळी ४ वाजता नवी दिल्ली येथे एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली होणार असलेल्या या बैठकीला केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह ऍडव्होकेट जनरल देविदास पांगम उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशामुळे गेले पंधरा महिने ... Read More »

कर्नाटकातील बंडखोर सभापतींसमोर हजर

कर्नाटकातील कॉंग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर आमदारांनी काल संध्याकाळपर्यंत सभापतींसमोर हजर राहावे तसेच राजीनाम्याबाबत सभापती के. आर. रमेश कुमार यांनी त्वरित निर्णय घ्यावा असा आदेश काल सर्वोच्च न्यायालयाने दिला. बंडखोर आमदारांनी पोलीस सुरक्षा द्यावी, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर कर्नाटकातील सर्व बंडखोर आमदार काल संध्याकाळी ६ वाजता विधानसभा अध्यक्षांना भेटले. त्यांनी पुन्हा योग्य नमुन्यात विधानसभा अध्यक्षांना राजीनामे ... Read More »

इंग्लंडची फायनलमध्ये धडक

>> ऑस्ट्रेलियावर ८ गडी व १०७ चेंडू राखून विजय काल गुरुवारी झालेल्या दुसर्‍या उपांत्य फेरीच्या सामन्यात यजमान इंग्लंडने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा ८ गडी व १०७ चेंडू राखून दारुण पराभव करत क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेची अंतिम फेरीत प्रवेश केला. रविवारी होणार्‍या फायनलमध्ये इंग्लंडची गाठ न्यूझीलंडशी पडणार आहे. त्यमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला नवीन विश्‍वविजेता मिळणार हे नक्की झाले आहे. ऑस्ट्‌ेलियाने विजयासाठी ठेवलेले २२४ धावांचे माफक ... Read More »

जेरेमीने मोडले तीन विक्रम

भारताचा युवा वेटलिफ्टर तथा यूथ ऑलिंपिकमधील सुवर्णपदक विजेत्या जेरेमी लालनिरुंगा यांने काल दमदार कामगिरी करताना अपिया, सामोओ येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये स्नॅच प्रकारात तीन विक्रम मोडित काढले. क्लीन आणि जर्क लिफ्टमध्ये मात्र त्याला अपयशी ठरले. १६ वर्षीय जेरेमीने संस्मरणीय कामगिरी करताना ६७ किलो विभागात १३६ किलो वजन उचलताना जागतिक यूवा, आशियाई आणि राष्ट्रकूल स्पर्धा विक्रम मोडित काढले. ... Read More »