Daily Archives: July 11, 2019

विशेष संपादकीय सबका साथ, सबका विकास!!

कर्नाटकच्या पावलावर पाऊल टाकत कॉंग्रेसचा दोन तृतीयांश आमदारांचा एक सत्तालोलुप कंपू काल पक्षांतर बंदी कायद्याला अलगद बगल देत सत्ताधारी भारतीय जनता पक्षात डेरेदाखल झाला. सदैव तत्त्वनिष्ठा, विचारधारा वगैरेंची बात करीत आणि ‘पार्टी विथ द डिफरन्स’ची शेखी मिरवत आलेल्या भारतीय जनता पक्षानेही त्यांना बिनबोभाट आपल्या पदराखाली घेतले आणि नरेंद्र मोदींचा ‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र अशा वेगळ्या प्रकारे साकार करून ... Read More »

सत्तेचा खेळ

कर्नाटकातील राजकीय पेचप्रसंग आता अधिकच गुंतागुंतीचा बनत चालला आहे. कॉंग्रेस नेते डी. शिवकुमार यांनी मुंबईत बंडखोरांची भेट घेण्याचा केलेला प्रयत्न, त्यांची व मिलिंद देवरांची स्थानबद्धता, कर्नाटक विधानसभेच्या सभापतींनी राजीनाम्यांसंदर्भात घेतलेली कडक भूमिका, त्याविरुद्ध बंडखोरांनी सर्वोच्च न्यायालयात घेतलेली धाव आणि भाजपाने कर्नाटकमध्ये सरकारविरुद्ध चालवलेली निदर्शने या सर्व नाट्यमय घटनांनी गेले दोन दिवस धामधुमीचे गेले असले तरी अजून तोडगा दृष्टिपथात नाही. सरकारमधून ... Read More »

क्रांतिकारी घडामोडीचा अन्वयार्थ

शैलेंद्र देवळणकर अमेरिकन कॉंग्रेसमधील सिनेट सभागृहाने नुकतेच भारताला नॉन नॅटो अलाय हा दर्जा देण्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण विधेयक मंजूर केले आहे. हे विधेयक अशा वेळी मंजूर करण्यात आले आहे ज्यावेळी व्यापारतुटीच्या प्रश्‍नावरुन तसेच भारतीय बाजारपेठेत अमेरिकन कंपन्यांना प्रवेश देण्याच्या प्रश्‍नावरुन, इराणच्या प्रश्‍नावरुन भारत व अमेरिकेमध्ये कमालीचा तणाव वाढला आहे. हा दर्जा मिळाल्यास हा तणाव काही प्रमाणात निवळण्याची शक्यता आहे. अमेरिकन कॉंग्रेसमधील सिनेट ... Read More »

गोव्यात कॉंग्रेसचे १० आमदार भाजपमध्ये

  कर्नाटक पाठोपाठ राज्यात कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाला मोठे भगदाड भाजपचे संख्याबळ २७ वर; कॉंग्रेसमध्ये उरले फक्त ५ बाबू कवळेकर, मोन्सेर्रात दांपत्य, नीळकंठ, सिल्वेरा, डिसा, क्लाफासियो, फिलीप नेरी, इजिदोर व टोनी फुटले! >> राजकीय घडामोडींना गोव्यात वेग >> मंत्रिमंडळात मोठे फेरबदल अपेक्षित >> राज्यपाल तातडीने गोव्याकडे >> गोवा फॉरवर्डवर गंडांतर येणार? >> नवे पाहुणे अमित शहांच्या भेटीस >> दोन तृतीयांशमुळे पक्षांतर ... Read More »

कर्नाटकातील सत्तानाट्य सर्वोच्च न्यायालयात

>> सभापतींकडून राजीनामा स्वीकारण्यास उशीर >> बंडखोर जेडीएस – कॉंग्रेस आमदारांचा आरोप कर्नाटकमधील राजकीय संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला असून कॉंग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर आमदारांनी विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी राजीनामा स्वीकारण्यास उशीर केल्याचा आरोप करीत न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. दरम्यान, मुंबईमध्ये असलेले कॉंग्रेसचे बंडखोर आमदार रमेश जारकीहोळी यांनी आणखी चार ... Read More »

नदीत सांडपाणी; बार्देशमध्ये ४३२ घरमालकांना नोटिसा

सांडपाणी थेट नदीन सोडल्याप्रकरणी बार्देश तालुक्यातील ४३२ घरमालकांना कारवाईच्या नोटीसा पाठविण्यात आल्या. प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा न करता तो नदीत सोडणार्‍या या घरांना आरोग्य केंद्राकडून कारणे दाखवा नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. संबंधितांनी या नोटीसांची गंभीर दखल घेऊन ३० दिवसांच्या आत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या आदेशाची दखल न घेतल्यास आरोग्य कायदा १९८५ च्या कलम ... Read More »

ग्रंथपाल बडतर्फ

>> विद्यार्थी मारहाणप्रकरण ढवळी येथील इंदिराबाई ढवळीकर (आयव्हीबीडी) विद्यालयाच्या ग्रंथपालाने दोघा विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी या विद्यालयाचा ग्रंथपाल अमित रंगनाथ सावंत (३१) याला ङ्गोंडा पोलिसांनी अटक करून न्यायदंडाधिकार्‍यांसमोर उभे केले असता त्याला दोन दिवसांची कोठडी देण्यात आली. दरम्यान, अमित सावंत याला इंदिराबाई ढवळीकर विद्यालयाच्या एस. एस. समिती व्यवस्थापनाने कामावरून काढून टाकले. संशयित अमित सावंत याच्याविरोधात मंगळवारी ङ्गोंडा पोलिसांत जखमी झालेल्या विद्यार्थ्याच्या ... Read More »

गँगवॉरमध्ये पंजा छाटलेल्या जखमीचा गोमेकॉत मृत्यू

>> संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद रायबंदर येथे रविवार ७ जुलैला रात्री झालेल्या दोन गटातील गँगवॉरमध्ये धारदार शस्त्राच्या साहाय्याने उजव्या हाताचा पंजा शरीरापासून विभक्त करण्यात आलेल्या कृष्णा कुर्टीकर (ताळगाव) याचे गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना काल निधन झाले. दरम्यान, या गँगवॉर प्रकरणामध्ये पणजी पोलिसांनी आणखीन एका संशयिताला काल अटक केली आहे. दिपेश गावस (नागाळी, ताळगाव) असे संशयिताचे नाव आहे. ... Read More »

गुडे-शिवोलीत लहान भावाचा भाऊ व भावजयीकडून खून

गुडे शिवोली येथील सर्वेश खडपकर (३०) या आपल्या लहान भावाचा रविवार दि. ७ रोजी दुपारी राहत्या घरात मोठ्या भाऊ संदेश खडपकर (३८) व त्याची पत्नी लतिका खडपकर यांनी खून केला. त्यानंतर सर्वेश याचा मृतदेह वारपे पेडणे येथे दरीत फेकून दिला होता. तो मृतदेह मंगळवार दि. ९ रोजी पोलिसांना सापडला व २४ तासांच्या आत खुनाला वाचा ङ्गुटली. सर्वेश हा आपला थोरला ... Read More »

टॅक्सीचालकांचा आंदोलनाचा इशारा

>> गोवा माईल्स बंदची मागणी ऍप आधारित गोवा माईल्स ही टॅक्सीसेवा रद्दबातल करण्याची मागणी येत्या १० दिवसांत मान्य न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा काल टूरिस्ट टॅक्सी मालकांनी ताळगाव येथे आयोजित केलेल्या सभेत दिला. ताळगाव येथील सामाजिक सभागृहात असोसिएशन ऑफ टूरिस्ट टॅक्सी असोसिएशनने ही सभा आयोजित केली होती. या सभेत राज्यभरातील टूरिस्ट टॅक्सी मालकांची मोठी उपस्थिती होती. या सभेत कॉंग्रेसचे आमदार ... Read More »