Daily Archives: July 10, 2019

गुन्हेगारीचा कणा मोडा

ताळगाव आणि रायबंदरमध्ये दोन टोळ्यांमध्ये तलवारींनिशी झडलेले टोळीयुद्ध ही अतिशय गंभीर बाब आहे. राज्यात संघटित गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढल्याची ही निशाणी आहे आणि सरकारने वेळीच या गुंडांचा बंदोबस्त केला नाही, तर परिस्थिती चिघळण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर किंवा रवी नाईक आदींनी आपापल्या कार्यकाळामध्ये ज्या खमकेपणाने अशा प्रकारच्या संघटित गुन्हेगारीला वेसण घातली होती, तशी कठोर ... Read More »

नेते आणि विशेषाधिकार

ऍड. प्रदीप उमप आपल्याला कोणतेही नियम आणि कायदे लागू नाहीत, अशी मानसिकता बनलेले नेते लोकशाहीतील राजे बनले आहेत. आपल्याला विशेषाधिकार प्राप्त आहेत, असे त्यांना वाटते. परंतु हे विशेषाधिकार त्यांना व्यक्तिशः बहाल केलेले नसून ते त्यांच्या पदाचे अधिकार आहेत, हे नेत्यांनी वेळीच ओळखलेले चांगले. शक्तिप्रदर्शनासाठी या विशेषाधिकारांचा वापर करणे टाळायला हवे. आपण बदललो म्हणजे नेमके काय बदलले? आपली मानसिकता आणि कार्यसंस्कृती ... Read More »

पतपुरवठा संस्थांच्या नोंदणीला लवकरच ब्रेक

>> मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्ट संकेत >> पाच वर्षे बंदीचा सरकारचा प्रस्ताव नवीन पतपुरवठा संस्थांच्या नोंदणीवर पाच वर्षे बंदी घालण्याचा विचार सरकार करीत आहे. राज्यात पुरेशा प्रमाणात पतपुरवठा संस्था कार्यरत आहेत. त्यामुळे नवीन सहकारी संस्थांनी शेती, डेअरी, हॉर्टीकल्चर, पर्यटन यांसारख्या नवीन क्षेत्राकडे वळण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल येथे केले. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात अळंब्याप्रमाणे ... Read More »

उर्वरित सामना आज

विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला उपांत्य सामना काल रंगतदार अवस्थेत असताना पावसाचे आगमन झाल्याने स्थगित करावा लागला असून उर्वरित खेळ आज होणार आहे. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या अचूक मार्‍यामुळे न्यूझीलंडने पाऊस आला त्यावेळी ४६.१ षटकांत ५ बाद २११ धावांपर्यंत मजल मारली होती. यानंतर रात्री उशिरापर्यंत सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे पंचांनी खेळपट्टीची पाहणी केल्यानंतर पंच आणि ... Read More »

कॉंग्रेस विधिमंडळ बैठकीत अधिवेशनाची व्यूहरचना

कॉंग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटाच्या काल झालेल्या बैठकीत विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली आहे. कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांनी नागरिक, टॅक्सी चालक, कर्मचारी वर्ग यांना भेडसावणार्‍या समस्यांना वाचा फोडण्याबाबत विचारविनिमय केला आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली. विधानसभेत प्रश्‍न, उपप्रश्‍न विचारण्याबाबत चर्चा केली. राज्यातील टूरिस्ट टॅक्सी मालक, गोवा मनुष्यबळ महामंडळ, बांधकाम खात्यातील कामगारांनी व ... Read More »

इंधन दरवाढ करून भाजपकडून फसवणूक

भाजपने पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ करून निवडणुकीवेळी दिलेल्या आश्‍वासनाला हरताळ फासला असल्याची टीका काल कॉंग्रेसने केली. इंधनदर वाढवल्याने सामान्य जनतेचे कंबरडेच मोडले असल्याचे कॉंग्रेस प्रवक्ते अमरनाथ पणजीकर पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. भाजपने २०१२ साली निवडणूक जाहीरनाम्यात जनतेला वेगवेगळी आश्‍वासने दिली होती. त्यात राज्याला विशेष दर्जा, ५० हजार जणांना नोकर्‍या, पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट रद्द करून दर खाली आणणे आदींचा ... Read More »

राज्यात कायदा – सुव्यवस्था बिघडल्याचा कॉंग्रेसचा आरोप

राज्यातील कायदा व सुव्यवस्था पार बिघडली असल्याचा आरोप काल विरोधी कॉंग्रेस पक्षाने पत्रकार परिषदेत केला. पक्षाचे प्रवक्ते उर्फान मुल्ला हे यासंबंधी बोलताना म्हणाले की, पणजी शहरात अशा प्रकारे गुंडांच्या दोन्ही टोळींत एकामेकांवर तलवारीने हल्ला करण्याच्या घटना कधीही घडल्या नव्हत्या. हा गंभीर स्वरुपाचा हिंसाचार असून गृहमंत्री ह्या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यात लक्ष घालून ह्या गुंडांचे कंबरडे मोडून टाकावे, ... Read More »

गँगवॉर प्रकरणी ४ जणांना अटक

ताळगाव आणि रायबंदर येथे रविवार ७ जुलैला रात्री झालेल्या दोन गटातील खुनी हल्ला प्रकरणी ४ जणांना काल अटक करण्यात आली आहे. ओल्ड गोवा पोलिसांनी तिघांना तर पणजी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. या हल्ल्यात चारजण जखमी झाले होते. त्यातील कृष्णा कुर्टीकर याच्या हातावर कोयत्याने वार करण्यात आल्याने मनगटापासून वेगळा झाला होता. या प्रकरणी जॅक डायगो ओलिवेरा (३०, ताळगाव), कमलेश ... Read More »

खासदार सुब्रमण्यम स्वामींविरोधात कॉंग्रेसची पणजी पोलिसांत तक्रार

>> राहुल गांधींच्या बदनामीचा आरोप राहुल गांधी यांची बदनामी केल्या प्रकरणी गोवा प्रदेश युवा कॉंग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांनी राज्यसभा खासदार सुब्रमण्यम् स्वामी यांच्याविरुद्ध पणजी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हार्दोळकर यांनी तक्रार केल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, ७ जुलै रोजी स्वामी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी हे अमली पदार्थांचे सेवन करीत ... Read More »

कुंकळ्‌ळीत व्यावसायिकाला लुटणार्‍या ६ जणांच्या मुसक्या आवळल्या

>> पोलिसांची २४ तासांत यशस्वी कारवाई >> रात्रीच्या वेळी घातला होता दरोडा कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील भाटे, वेरोडा येथे निर्जन रस्त्यावर व्यापारी व्हिसेंत पिरीस (७३) आपले दुकान बंद करून रात्री घरी जात असताना सहा जणांनी दरोडा घालून मारहाण करून त्यांच्या बॅगेतील ३५ हजार लुटण्याची घटना सोमवारी रात्री घडली. यानंतर पिरीस यांना जखमी अवस्थेत टाकून फरारी झालेल्या सहाही ... Read More »