Daily Archives: July 9, 2019

डू बेटर विथ लेस

फ्रुगल इनोव्हेशनची आगळी संकल्पना एडिटर्स चॉइस परेश प्रभू काही पुस्तकांचा विषय कितीही जटिल का असेना, परंतु लेखकापाशी अवघड विषय सोपा करून सांगण्याची हातोटी असेल आणि जर त्याच्यापाशी काही वेगळे आणि मूलभूत सांगण्यासारखे असेल, तर अशी पुस्तके तुमच्या मनावर नक्कीच गारूड करून जातात. आज कॉर्पोरेट संस्कृतीला अनुसरून अगणित नवनव्या संकल्पना मांडणारी पुस्तके सातत्याने प्रकाशित होत असतात, कॉर्पोरेट संस्कृतीमधील नवनव्या कार्यसंस्कृतीच्या कल्पना ... Read More »

दुसरा अंक

कर्नाटकातील यावेळच्या नव्या नाटकाचा कालचा दुसरा अंक परवाच्या पहिल्या अंकापेक्षाही अधिक नाट्यमय म्हणावा लागेल. सत्ताधारी कॉंग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांचे राजीनामासत्र सुरू झाले आणि त्याचा राजकीय फायदा उपटण्यासाठी भारतीय जनता पक्ष पुढे सरसावला असतानाच अमेरिकेहून परतलेल्या मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामींनी हा डाव परतवून लावण्यासाठी आगळीच खेळी रचली. सरकारमधील कॉंग्रेस आणि जेडीएसच्या सगळ्या मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदांचे राजीनामे सादर करून मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ फेररचनेची ... Read More »

पावसाळ्यात होणारे त्वचेचे आजार

 डॉ. अनुपमा कुडचडकर त्वचारोग तज्ज्ञ (हेल्थवे हॉस्पिटल, ओल्ड गोवा) केसपुळ्या येणे, ऍब्सेस होणे, सेल्युलायटीस, पायावर अल्सर (घाव) होणे ही जरा जास्त प्रमाणात पावसाळ्यात त्वचेवर होणारी बॅक्टेरियल इन्फेक्शन्स आहेत. मधुमेह झालेल्या आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांमध्ये इन्फेक्शन जास्त प्रमाणात होऊ शकतं. उन्हाळा संपत असताना गरमी एवढी वाढलेली असते की सगळीजणं पावसाळ्याची वाट बघायला लागतात. उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे घाम जरा जास्तच येत ... Read More »

दिवसभरात पाणी किती प्यावे?

डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) पाणी नेहमी घोट-घोट, गरम दूध पिताना जसे पितो तसे व बसूनच प्यावे. घोट-घोट पाणी प्यायल्याने लाळेतील क्षार पोटातील अम्लामध्ये मिसळते व पाण्यामुळे पोटात न्युट्रल धर्म येतो व ऍसिडिटी होत नाही. तेच घटाघट पाणी प्यायल्याने लाळेसकट पाणी पोटात जात नाही म्हणून व्याधी उत्पन्न होतात. पाणी कधी प्यावे – याचे उत्तर अगदी सोपे आहे. तहान लागल्यावर पाणी ... Read More »

शेतकर्‍यांच्या पदरी काय पडले?

डॉ. गिरधर पाटील भारताची अर्थव्यवस्था २०२२ पर्यंत पाच लाख कोटी अमेरिकी डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट या सरकारने ठेवले आहे. शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कारण औद्योगिक आणि सेवा क्षेत्र हे सध्या मंदीच्या छायेत आहेत. मेक इन इंडिया, स्टार्ट अप हे देखील रडतखडत चालू आहेत. अशा स्थितीत ही अर्थव्यवस्था ५ ट्रिलियनपर्यंत न्यायची असेल तर शेतीतील गुंतवणूक आणि उत्पन्न वाढवल्याशिवाय पर्याय नाही. मोदी ... Read More »

रायबंदरला गँगवॉर; चारजण जखमी

>> तलवार हल्ल्यात एकाचा हात तुटला >> दोन्ही गटातील सर्व संशयित फरारी नागाळी – ताळगाव आणि रायबंदर येथे रविवारी रात्री एका टोळक्याने पूर्व वैमनस्यातून तलवार, लोखंडी सळ्या आदींच्या साहाय्याने केलेल्या हल्ल्यात चार जण जखमी झाले असून कृष्णा कुर्टीकर (नागाळी, ताळगाव) याचा उजवा हात तलवारीच्या वार करून मनगटापासून तोडण्यात आला आहे. यासंबंधी ओल्ड गोवा पोलीस स्टेशन आणि पणजी पोलीस स्टेशनवर दोन ... Read More »

जायकाची जलवाहिनी फुटल्याने दक्षिण गोव्याचा पाणीपुरवठा ठप्प

शेळपे, सांगे येथे संपूर्ण दक्षिण गोव्याला पाणीपुरवठा करणारी जायका जलशुद्धीकरण प्रकल्पाची १०० एमएलडी व्यासाची जलवाहिनी काल सकाळी ८.१५ च्या दरम्यान शेळपे जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या मुख्य गेटजवळ केवळ दहा मीटरच्या अंतरावर फुटल्याने भर पावसात काल दिवसभर दक्षिण गोव्याचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला. रात्री उशिरा दुरुस्तीचे काम पूर्ण झाले होते. मात्र, रात्री उशिरा पाणी सोडण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. काल सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ... Read More »

बाबुश समर्थक नगरसेवकांमुळे टोंका कचरा प्रकल्प अधांतरी

>> भाजपच्या नगरसेवकांचा आरोप पणजी महापालिकेतील सत्ताधारी बाबुश मोन्सेर्रात यांचे पॅनल व भाजप नगरसेवकांचे पॅनल यांच्यात एकमत होऊ न शकल्याने टोंका येथे ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठीच्या १० टन प्रकल्पाची स्थिती त्रिशंकू बनलेली असतानाच काल भाजप पॅनलचे नगरसेवक मिनीन डिक्रुझ, शुभम चोडणकर व वैदेही नाईक यांनी बाबुश पॅनलचे काही नगरसेवक विनाकारण या प्रकल्पाला खो घालीत असल्याचा आरोप काल भाजप मुख्यालयातत घेतलेल्या ... Read More »

खाणी सुरू करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करा

>> विनय तेंडुलकर यांची संसदेत मागणी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी काल संसदेत गोव्याच्या खाणीचा मुद्दा उपस्थित करताना राज्यातील बंद पडलेल्या लोह खनिज खाणी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने कायद्यात आवश्यक ती दुरुस्ती घडवून आणावी, अशी मागणी केली. राज्यातील खाण उद्योग बंद पडल्याने खाणींवर अवलंबून असलेल्या राज्यातील ७५ हजार कुटुंबांवर थेट परिणाम झाला असल्याचे त्यांनी सभागृहाचा नजरेस आणून दिले. खाणअवलंबित ... Read More »

‘नाईक’ आडनाव बदलण्यास भंडारी समाजाची तीव्र हरकत

>> समाजातर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांच्या नेतृत्वाखाली काल भंडारी समाजाच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली व परराज्यातून येऊन गोव्यात स्थायिक होणारे काही बिगर गोमंतकीय आपले आडनाव बदलून ‘नाईक’ अशी दुरुस्ती करून घेऊ लागले असल्याचे त्यांच्या नजरेस आणून दिले. नाईक हे भंडारी समाजाचे एक प्रमुख आडनावांपैकी एक असून ओबीसींना मिळणारे लाभ मिळवण्यासाठी हे ... Read More »