ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: July 8, 2019

दक्षिण आफ्रिकेचा शेवट गोड

शनिवारी झालेल्या विश्‍वचकातील शेवटच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा १० धावांनी पराभव केला. या विजयासह त्यांनी आपला समारोप गोड केला. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी ठेवलेल्या ३२५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव ३१५ धावांमध्ये आटोपला. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने शानदार शतकी खेळी करताना ११७ चेंडूंत १२२ धावा करत आपले सतरावे वनडे शतक झळकावले. यंदाच्या विश्‍वचषकातील त्याचे हे तिसरे शतक ठरले. याव्यतिरिक्त तीन ... Read More »

सौंदर्यवादी कवी बाकीबाब

–  पुष्पाग्रज बाकीबाबांचा उद्या स्मृतिदिन. ज्यांचं स्मरण होतं, त्याना मरण नसतं असं म्हणतात. बाकीबाब तर या सृष्टी आणि समष्टीच्या कणाकणात सामावून गेलेले आहेत. बोरकरांच्या निसर्ग आणि प्रेमकवितांचं एवढं मोठं गारूड मराठी काव्यरसिकांवर व्यापून राहिलं होतं की, ते काव्यगायनासाठी व्यासपीठावर नुसते उभे राहिले तरी टाळ्या आणि गजरांच्या सरीवर सरी सभागृहात कोसळायच्या. मुळात कविता हाच बाकीबाबांचा श्‍वास होता आणि तोच त्यांचा ध्यास ... Read More »

हिंदी विरोधाचे षड्‌यंत्र हाणून पाडले पाहिजे!

 दत्ता भि. नाईक हिंदी ही किती प्राचीन व किती समृद्ध भाषा आहे यावर चर्चा न करता ती देशातील सर्वजनतेला जोडणारी भाषा आहे हे सर्वांनीच जाणले पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरणाचे निमित्त करून हिंदीविरोधाचे षड्‌यंत्र हाणून पाडले पाहिजे. भारत सरकारचा शिक्षणविषयक दस्तावेज अलीकडेच प्रसिद्ध झाला. तो पूर्णपणे वाचून काढणे वा त्यावर चिंतन करणे यासाठी अजून पुरेसा वेळही मिळालेला नाही. यापूर्वी स्व. राजीव ... Read More »

प्रख्यात कादंबरीकार आणि व्यासंगी इतिहाससंशोधक प्रा. स. शं. देसाई

– डॉ. सोमनाथ कोमरपंत त्यांचा जीवनप्रवास हा प्रयत्नवादी कर्मयोग्याचा प्रवास आहे. एकलव्यनिष्ठेने प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी इतिहाससंशोधनाचे धडे गिरवले आणि नव्या पिढीसमोर अभ्यासक कसा असावा याचा वस्तुपाठ डोळ्यांसमोर ठेवला. प्रा. स. शं. देसाई यांच्या वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वाबद्दल माझ्या मनात सदैव अत्यंत आदराची भावना वसत आलेली आहे. याचे कारण ते आमच्या पाळोळे गावातील होते. मी प्राथमिक शाळेत असताना दोन नावे ऐकत आलेलो होतो. ... Read More »

अपेक्षाभंग!

–  शशांक मो. गुळगुळे या अर्थसंकल्पात प्रचंड घोषणा करण्यात आल्या, पूर्वी जाहीर झालेल्या घोषणांचे ढोल बडविण्यात आले पण सामान्य माणसाची त्याच्या ‘हाताला काहीच लागले नाही’ अशी प्रतिक्रिया आहे. रोजगार देणारा देश म्हणून भारताची ओळख करावयाची आहे, असे अर्थमंत्री म्हणाल्या. खरोखर त्या जर अशी ओळख निर्माण करू शकल्या तर ही पाचच काय.. पुढची २५ वर्षे यांचेच सरकार सत्तेवर असेल. २०१९-२० या ... Read More »

‘मन की बात’

माधुरी रं.शेट उसगावकर (फोंडा) आषाढातील पावसाचा महिमा तो काय वर्णावा? आपण आता मोठे झालो तरी पावसातील हौस विसरायची नाही. फेसबुक, व्हॉट्‌सऍपच्या अधीन झालेल्या मुलांना पावसात भिजवू. मुलांसंगे आपण ओलेचिंब होऊ. दिवसेंदिवस वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध होत होत्या… रणरणत्या उन्हात जिवाची लाही लाही, अति उष्णतेचे बळी, कडकडीत उष्म्याचे चटके… इतर राज्यातील बातम्या वाचताना गोवेकरांचा गोवा अपवाद कसा ठरेल? इतकी वर्षे आपण गोव्यातील हवामानाविषयी ... Read More »

‘खाली डोकं, वर पाय!’

प्रमोद ग. गणपुले (भटवाडी- कोरगाव) हातामध्ये पेन, पेन्सील नीट पकडतां यावी यासाठी हाताची बोटं, त्यांचे स्नायू, त्यांच्या पेशी यांची पुरेशी वाढ व्हावी लागते. त्यासाठी किमान पाच वर्षे लागतात. म्हणून वयाची पाच वर्षे पूर्ण होईपर्यंत मुलांच्या हातांत पेन, पेन्सिल देऊ नये, असा जागतिक सिद्धांत आहे. नंदूची आई शाळेतल्या बाईंशी मोठमोठ्याने भांडत होती. ‘‘काय हो बाई, नंदूला शाळेत पाठवून सहा महिने झाले, पण ... Read More »