ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: July 1, 2019

टीम इंडियाचा ३१ धावांनी पराभव

>> भारताच्या पराभवामुळे पाकिस्तान संकटात क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतील भारताच्या अपराजित घोडदौडीला काल यजमान इंग्लंडने लगाम घातला. टीम इंडियाचा ३१ धावांनी पराभव करत त्यांनी स्पर्धेतील आपल्या पाचव्या विजयाची नोंद केली. इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या ३३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला ५ बाद ३०६ पर्यंतच पोहोचता आले. विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. नऊ चेंडूंचा सामना केल्यानंतर भोपळाही न फोडता राहुलने ... Read More »

दुहेरी किताबाची संधी

>> शौर्य, लिडिया, रुद्र, सुशील, अर्जुन, तृषा, हर्ष, यशला शौर्य जोशी, लिडिया बार्रेटो, रुद्र दुकळे, सुशील नायक, अर्जुन फळारी, तृषा जोशी, हर्ष माने व यश देसाई या खेळाडूंना अखिल गोवा प्रमुख मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी किताब मिळविण्याची संधी आहे. मॉर्निंग बॅडमिंटन क्लब व शटलर्स क्लब यांनी गोवा बॅडमिंटन संघटना व गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेतील सामने पेडे क्रीडा ... Read More »

लढवय्या मोहन रानडे

 प्रभाकर सिनारी (शब्दांकन ः अनिल लाड) मोहन रानडे यांनी माझ्या हाताखाली प्रशिक्षण घेतले. रानडे फार धाडसी होते आणि सांगितलेले आदेश पाळायचे. त्यांचा स्वभाव खूप चांगला होता. मीच कॅम्प कमांडर होतो. आमचे नियम फार कडक होते… गोव्याच्या मुक्तिलढ्यातील त्यांच्या कार्याबद्दल सांगताहेत त्यांचे सहकारी प्रभाकर सिनारी. डॉ. राममनोहर लोहिया यांनी १८ जून १९४६ रोजी गोव्यामध्ये क्रांतीची ज्योत पेटवली आणि दुसर्‍या दिवसापासून म्हणजेच ... Read More »

गोवा मुक्तिलढ्यातील क्रांतिकारी स्वातंत्र्यसेनानी : मोहन रानडे

शंभू भाऊ बांदेकर श्री. मोहन रानडे यांच्या निधनाने शापित, पीडित, दुर्बलांचा, महिलांचा, हुशार पण आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांचा आधारस्तंभ कायमचा पडद्याआड गेला आहे. त्यांच्या कार्यातून आम्हास प्रेरणा मिळो व त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्राप्त होतो, हीच परमेश्‍वरापाशी विनम्र प्रार्थना! २५ जून रोजी पहाटे साडेपाच वा. मला स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्थेचे पदाधिकारी श्रीकांत कुलकर्णी आणि भाई ताम्हणे यांचा मोहन रानडे यांची प्राणज्योत मालवल्याचा ... Read More »

आयएएस अधिकार्‍याच्या अनुभवांचे संचित टायगर हंटिंग स्टोरीज

एडिटर्स चॉइस – परेश प्रभू आपल्या राज्याविषयी कळकळ असेल तर एखादा आयएएस अधिकारी कसे मौलिक काम करू शकतो याचा वस्तुपाठ म्हणजे के. प्रदीप चंद्रा यांची आंध्र प्रदेशमध्ये कार्यरत असतानाची कामगिरी. अन्य राज्यांत चाललेले उद्योग आंध्रकडे वळवणे असो वा जनसामान्यांसाठी हितकारक निर्णय घेणे असो, प्रत्येक सरकारी फाईल ही कोणाच्या तरी लाईफवर परिणाम करत असते याची जाणीव ठेवून कार्यरत कसे राहावे हे ... Read More »